स्पर्धेसाठी
द्रोण काव्य रचना
विषय - पुन्हा ओला पाऊस
पुन्हा ओला पाऊस
दारी माझ्या आला
चिंब भिजून
ओला ओला
निसर्ग
झाला
हो
पुन्हा ओला पाऊस
लपेटून गेला
शरीरा माझ्या
बिलगला
व्यापला
ऊरी
तो
पुन्हा ओला पाऊस
स्पर्शून जीवाला
प्रेमी जीवांच्या
बहरला
आनंदी
झाला
रे
पुन्हा ओला पाऊस
अशांत जीवाला
शांत करून
असा गेला
स्वच्छंदी
झाला
तो
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड , ता.शिरोळ
जिल्हा .कोल्हापूर
No comments:
Post a Comment