Friday, 27 September 2019

चित्रकाव्य ( फुलपाखरू )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

फुलपाखरू

फुलांफुलांवरुन फिरत असते,
गोड ,नाजूक फुलपाखरू.
गौर असो वा गुलाबफुल,
लागते ते सर्वत्र भिरभिरु.

लाल रंग हा गौरी फुलांचा,
नाजूक देठ हा लवतो खाली.
कळ्या पोपटी शोभून दिसती,
पालवी हिरवी हसू लागली.

रोप उभे हे ताठ मानेने,
साहत भार हा सुमनांचा.
काळेपांढरे फुलपाखरू,
आस्वाद घेते मधुरसांचा.

शोषून मकरंद अलगदपणे,
आनंदाने घेते विश्रांती.
अंगी शोभे ठिपक्यांची नक्षी,
उजळून निघते मग ही कांती.

लालहिरव्या हिरवाईवर,
अलगद विहरते मुक्तपणे.
किमया निसर्गाची पाहून,
वेडे मन नाचते आनंदाने.

कवयित्री ©®

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment