Tuesday, 10 September 2019

सुधाकरी काव्य ( गणेश स्तवन )

स्पर्धेसाठी

सुधाकरी काव्य

गणेश स्तवन

गणपती बाप्पा ।
पार्वती नंदना ।।
करीतो वंदना ।
मनोभावे ।। 1 ।।

तूच त्राता जगी ।
तूच बुद्धी दाता ।।
भक्तीभाव आता ।
तुझ्यापायी ।। 2 ।।

मूषक वाहन ।
त्यावर बैसौणी ।।
जगा गवसणी ।
घालतोस ।। 3 ।।

दुर्वा,आघाड्याची ।
जुडी अर्पितात ।।
गारवा देतात ।
शरीराला ।। 4 ।।

मोदक आवडे ।
गणेशा तुजला ।।
देती पूजनाला ।
भक्तगण ।। 5 ।।

म्हणती तुजला ।
संकट निवारी ।।
समजती खरी ।
महानता ।। 6 ।।

सांभाळी भक्ताला ।
तूच सुखकर्ता ।।
देतसे सुवार्ता ।
सर्वांनाच ।। 7 ।।

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment