उपक्रम
सहाक्षरी
विषय -- आधार
सर्वांना हवासा
असतो आधार
वाटते कुणीही
नसो निराधार
आई व बाबांचा
सर्व कुटुंबाला
नेहमी दिलासा
संकट वेळेला
शाळेत गुरुजी
ज्ञानच देतात
साधार शिकणे
सदा सांगतात
समाजाची शाळा
खूप शिकवते
प्रत्येकाला मात्र
अनुभव देते
रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment