स्पर्धेसाठी
बडबड गीत
विषय- गणपती
आले आले गणपती बाप्पा,
नाचू गाऊ बागडू या.
रोज रोज आनंदाने,
आरती आता गाऊया .
लाडू , मोदक प्रसादाला,
नाही तोटा मौजमजेला.
बाप्पा खूप छान झाले,
सुट्टी मिळाली शाळेला.
दुर्वा ,आघाडा रोज तुला,
शोधून आणतो नियमाने.
बांधून जुडी एकवीसची,
देतो तुला काळजीने.
आरास पाहून तुझी,
जीव आमचा हरकला.
रोज रोज तुझ्यासमोर,
आवडते आम्हाला नाचायला.
दू:ख एकच बाप्पा मला,
पुराने सारे वाहून गेले.
पावसाला विचार ना रे जरा,
चुकीचे काय असे घडले ?
कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment