Sunday, 1 September 2019

कविता ( बाप्पाचे मनोगत )

स्पर्धेसाठी

कविता

     बाप्पाचे मनोगत

नाचत होते सर्वजण म्हणत
गणपती बाप्पा मोरया
घरी आणलं एकदा प्रेमाणे
खुष झालो पाहून माया.

आरास खूप छान होती,
मखर फुलांनी सजवलेले.
सजावट पाहून सुखावलो,
डोळे लोकांचे पाणावलेले.

धुवून नेलं महापुराने सारं,
उदासीनता होती पसरलेली.
वाटलं मला परतावं माघारी,
पण भक्तांची भुरळ पडलेली.

म्हणून राहिलो आठ दिवस,
आस्वाद घेत पक्वांनांचा
बदलते स्वरूप पाहून मात्र,
थरकाप उडाला मनाचा.

कान किटले ऐकुन गाणी
शांता , सोनू अन डीजेचा
थकले डोळे पाहुन आता
मर्कट नाच या भक्तांचा .

प्रत्येकजण होता नाचत धुंदीत
नावं माझं अन् गाव त्यांच.
कधी सुधरशील तू मानवा,
विचार कर जगकल्याणाचं.

     रचना
©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

No comments:

Post a Comment