आ.भा.शिक्षक साहित्य कला-क्रीडा मंच ( राज्य ) आयोजित कविता स्पर्धेसाठी
कविता
विषय - माझे जीवनगाणे
लेक लाडकी आईबाबांची,
लाडाकोडात वाढलेली.
सुसंस्काराच्या मुशीतून,
तावूनसुलाखून निघालेली.
शिक्षणाची आस मनाला,
कामाचा ध्यास जिवाला.
श्रमप्रतिष्ठा अंगी बाणली,
जगणे अर्पिले आत्मप्रतिष्ठेला
सुखावले मी मातृत्वाने,
संसारवेलीवरच्या फुलांसवे.
कर्तव्यदक्ष गृहीणीसारखी,
रमले मी आनंदाने पतीसवे.
ज्ञानमंदीरी जीव बहरला,
आदर्श बालक बनवण्यासाठी
विद्यार्थीप्रिय बनून शिक्षिका,
प्रेरित केले ज्ञानार्जनासाठी.
अघटित घडले जीवनामध्ये,
जिवनसाथी सोडून गेला.
पडद्याआड काळाच्या जावून,
पोरकेपणा मुलांच्या माथी आला.
दु:खाने मग आक्रंदले मन,
सैरभैर मुलांसह मी झाले.
सावरुन मग पाहून पिलांना,
कर्तव्याप्रती सजग मी झाले.
यशस्वीपणे भरारी मारून,
फडके पताका यशोशिखरी
कर्तृत्वाने छाती फुलली,
अभिमान दाटला माझ्या उरी.
असे हे माझे जीवनगाणे,
सोन्यासारखे झगमगले.
संघर्षातून स्वकर्तृत्वाने,
जगी स्वप्न हे साकारले.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530