Saturday, 30 June 2018

षटकोळी ( पहाट )

षटकोळी

पहाट

येते अलगद जाग
होता पहाट मजला
आळस सोडून बाजूला
उठते हळूच सहजी
कामाचा डोंगर पाहूनी
लागते कामे उरकायला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 27 June 2018

षटकोळी ( आम्ही सावित्रीच्या लेकी)

स्पर्धेसाठी

षटकोळी

आम्ही सावित्रीच्या लेकी

आम्ही सावित्रीच्या लेकी
लावूया रोपे वडाची
करुया पूजा श्रमाची
जगण्यासाठी आज जगी
ऑक्सिजनची पूर्तता करु
रक्षा करु पर्यावरणाची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर.

काव्यांजली ( आजची सावित्री )

स्पर्धेसाठी

काव्यांजली

विषय - आजची सावित्री

   आजची सावित्री
काम करते सत्यवानाबरोबर
    साथ खरोखर
          देतसे

   सत्यवानाच्या सावित्रीने
    प्राण वाचविले पतिचे
       रोखले यमास
           प्रयत्न

     वृक्षारोपण करते
  लावून झाडे वडाची
    रक्षा पर्यावरणाची
           करते

     मिळेल ऑक्सिजन
भरपूर प्रमाणात तुम्हाला
      फायदा जगाला
             होईल

   आजच्या सावित्रीने
अंधश्रद्धा सोडून द्यावी
    विज्ञानाची धरावी
            कास

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

Tuesday, 26 June 2018

चित्रचारोळी ( सौभाग्य )

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

घालून प्रदक्षिणा वडाला आज
आयुष्य मागता सौभाग्याचे तुम्ही
लावून रोप वडाचे निसर्गात
सत्यवानापरी प्राण वाचवा तुम्ही

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

षटकोळी वटसावित्री )

उपक्रम

षटकोळी

वटसावित्री

वटसावित्रीची करुन पूजा
वडाला फेऱ्या घालता
रोप लावा वडाचे
ऑक्सिजन देईल भरपूर
सत्यवानापरी या जगी
प्राण वाचतील सर्वांचे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर.

हायकू (गवत फुले )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय -- गवत फुले

गवत फुले
छान डुलती रानी
आनंद मनी

पाऊस धारा
रीमझीम अंगनी
मेघ गगनी

नाजूक फुले
सुंदर गवताची
भ्रांत क्षणाची

डोलती छान
वाऱ्यावर सुमने
गाई कवने

फुलती छान
बहरती सर्वत्र
होती पवित्र

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

Monday, 25 June 2018

षटकोळी (आयुष्यमान भव: )

स्पर्धेसाठी

षटकोळी

विषय - आयुष्यमान भव:

यशाची शिखरे गाठण्यासाठी
आयुष्यात पुढेच जाण्यासाठी
मनापासून देते आशिर्वाद
आयुष्यमान भव बाळा
आशिष सदैव आहे
यश तुझेच निर्विवाद.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

षटकोळी (आयुष्यमान भव)

स्पर्धेसाठी

षटकोळी

विषय - आयुष्यमान भव

आयुष्यमान भव बाळा
आशिष देते माता
शुभाशीर्वाद असोत तुजला
यशस्वी हो जीवनी
गगनभरारी पहायची तुझी
आस आहे मजला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

षटकोळी (आठवणीतला पाऊस )

स्पर्धेसाठी

षटकोळी

विषय - आठवणीतला पाऊस

मोहरवतो मनाला सदा
तो पाऊस आठवणीतला
रोमांचीत होते काया
आठवता धारा पावसाच्या
ओढते मन वेगाने
चिंब पावसात भिजाया

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

Sunday, 24 June 2018

षटकोळी ( धरणीमाता )

उपक्रम

षटकोळी

धरणीमाता

एकच माझी माय
म्हणती तिला धरणीमाता
अभिमान तीचा आम्हाला
गातो तीचेच गान
नाही थकत कधीच
गीत तिचे गायला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Saturday, 23 June 2018

चारोळी (काव्य )

उपक्रम
काव्य

स्फुरते काव्य मनी
रोज मनाच्या अंगणी
फुलतात शब्दसुमने
विचारांच्या प्रांगणी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

सहाक्षरी ( शिक्षण / शिक्षक )

आजचा उपक्रम

सहाक्षरी

शिक्षण / शिक्षक

शिक्षण घेताना
हवी संवेदना
जागी ठेवायला
मानवाच्या मना

शिक्षक देतात
चांगलेच ज्ञान
द्यायलाच हवा
त्यांना तुम्ही मान

नको शिक्षणाचे
बाजारीकरण
नको करायला
अंधानुकरण

करा गरीबांचा
विचार नेहमी
कशी शिकतील
ना पै ची बेगमी

शिक्षण हवय
मोफत सर्वांना
शासन योजना
पुरवा लोकांना

मधेच घपला
करु नका तुम्ही
संधी द्या समान
उपकृत आम्ही

होउन शिक्षित
जीवन घडवू
स्वतः बरोबर
समाजाला नेऊ

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

चारोळी (माणूस )

व्हायलाच हवे माणसाने माणूस
विवेककाच्या प्रांगणात
तेव्हाच समजेल माणूस
जीवनाच्या प्रांगणात

माणिक नागावे

चारोळी ( माणूस समजून घेताना )

आजचा उपक्रम

माणूस समजून घेताना

विवेकबुद्धी जागृत ठेवा
माणूस समजून घेताना
बाह्यरुपापेक्षा जाणून घ्या
आंतर्मन , जगी वावरताना

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Friday, 22 June 2018

चित्रकाव्य (सर्जा राजा )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

सर्जा राजा

जोडीनं खिल्लारी बैलांच्या,
शेत नांगरणी दादा करतोय.
दिवसभर घाम गाळून ,
कष्टाची भाकरी पिकवतोय.

काळी आई आमची माय,
सेवा तिची करु चला.
फाळ चिरतोय छाती मातीची,
मोत्याच दाणं पिकवू चला.

चल सर्जा चल राजा माझ्या,
नाही दमायच आता कधी .
पोसायचयं जगाला आपल्याला,
काम कष्टाचं करु आधी .

हिरवागार परिसर पाहून ,
जीव जातोय आनंदून .
तगमग जीवाची शांत होते,
हिरवाईची शोभा पाहून .

काळी माती आपली आई ,
सेवा तिची आज करायची.
जपून टाका पाऊल जरा ,
भविष्याची आखणी करायची.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 21 June 2018

षटकोळी ( योग )

षटकोळी

योग

आंतरराष्ट्रीय योग दिन
साजरा झाला जगभर
मूळ याचे भारतामध्ये
ऋषीमुनींनी याला अंगीकारला
जगाला महत्त्व समजले
रूजणार कधी आमच्यामध्ये

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

कविता हिंदी ( युवा और योग )

कविता

युवा और योग

बोल गये ऋषीमुनी ,
महत्व इस योगका ।
सुखी अपने जीवन के लीए
समझो महत्त्व योग का ।

युवावर्ग आज का ,
भरा है बुरे लतों से ।
उपाय इसका एकही ,
दोस्ती करो योग से ।

ताणतणाव जीवन से
परेशान आज युवा है ।
निकल सकता बाहर ,
गर की दोस्ती योग से ।

मन को बनाओ सकारात्मक,
चली जाएगी नकारात्मकता ।
सहज हो सकता है यह ,
योग,प्राणायाम की जागरूकता।

जागो युवक जागो तुम ,
नसीब अपना बदल डालो ।
योग को अपनाकर आज ,
जिंदगी अपनी बदल डालो ।

कवयत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

कविता ( आंतरराष्ट्रीय योग दिन )

स्पर्धेसाठी

विषय -आंतरराष्ट्रीय योग दिन

प्राचीन संस्कृती भारताची,
आज जगाने अनुभवली .
योग दिन केला साजरा ,
महती आज जगाला कळाली.

सांगून गेले ऋषीमुनी ,
आचरणाने आपल्या जगी.
योग,जप,तप करुनी ,
बनले ते महान त्यागी.

नको चिंता नको काळजी,
प्राणायामाची ही महती .
तणावरहित जीवनासाठी,
सकलजन योग करती .

आंतरराष्ट्रीय योग दिन ,
साजरा झाला जगामध्ये .
चालू ठेवा नियमीतपणे ,
रोज हवा आचरणामध्ये .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.9881862530

Tuesday, 19 June 2018

कविता ( शब्दांच्या गर्भात )

स्पर्धेसाठी

विषय- शब्दांच्या गर्भात

शब्दांच्या गर्भातून निपजले,
विचारांचे सुंदर माणिकमोती.
संदेश देऊनी सकलजनांना ,
शहाणे करुन ते सोडती .

कल्पना विलासांच्या झुल्यावर,
अलगद झुलती शब्दसुमने .
सुगंधाने शिंपण करती ,
शब्दप्रेमींची कोमल मने .

प्रसवून शब्दांचे भांडार ,
सामाजिक भान जोपासती .
अन्याय, अत्याचाराविरुद्ध ,
ठासून आवाज उठवती .

शब्दगर्भ आक्रंदतो मनात ,
साहित्यिकांच्या लेखणीतून .
जागृत करण्या जनमने ,
तरसतोय तो मनातून .

एकसंघ विचार पुस्तकातून ,
प्रकाशित होऊन आनंदतात .
जन्मोत्सवाच्या सोहळ्यात ,
सुखीसमाधानी ते होतात .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

कविता ( कर्तव्यदक्ष )

कर्तव्यदक्ष

कर्तव्यदक्ष करारी बाणा
ना कधी कसूर कर्तव्यात
हसतमुख व्यक्तीमत्वाने
प्रसिद्ध झाले जनमानसात

ना अहं ना गर्व कधी मनात
शिस्तप्रिय सदा कार्यात
प्रयत्न शांतता निर्मिण्याचा
सामंजस्य निर्मिला गावात

आठवणीत सदोदित
राहणार सर्वांच्या मनात
सुयश चिंतीतो आम्ही तुम्हा
यशकीर्ती बहरो अशीच जीवनात

नावलौकिक असाच वाढू दे
स्नेह आपला असाच राहूदे
आरोग्य संपदा लाभो तूम्हा
हीच मनीषा वर्धीत होऊ दे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Sunday, 17 June 2018

अष्टाक्षरी ( बाप )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

विषय -- बाप

बाप बाबा तिर्थरूप,
धैर्य धाडसाचे रूप.
आधारच त्याचा सर्वां,
जसे आई प्रतिरूप.

नाही अंत या प्रेमाचा,
नाही अंत या मनाचा.
धीरोदात्त सागर हा,
जसा अथांग खोलीचा.

जगी वंद्य असतो हा,
खरा सेतू कुटुंबाचा.
चालवतो सहजच,
रथचक्र संसाराचे.

सापडतो कधीतरी,
एकट्याने रडताना.
दाखवत नाही जगी,
दु:ख त्याचे सांडताना.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा.कोल्हापूर

षटकोळी (माझा लाडका कन्हैया )

झटपट षटकोळी स्पर्धेसाठी

विषय-माझा लाडका कन्हैया

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या लाडक्या कन्हैयाला
देताना मन आनंदते
यशपताका उंच गगनी
अशीच रोज तुझी
गरुडभरारी गगनी घेते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

लेख ( पितृछत्र )

लेख स्पर्धेसाठी

विषय -- पितृछत्र

मानव म्हटलं की घर,कुटुंब, संसार या सर्वांमध्ये तो गुंतलेला असतो.घर एकसंघ ठेवणे महत्त्वाचे असते.हे सर्व घरातील व्यक्तींच्यावर व त्यांना एकत्र बांधणारी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे बाप,बाबा,पिता,वडील होय.घराचे घरपण टिकवणारा व अबाधित ठेवणारा तो एक महत्त्वाचा घटक असतो.ज्याच्या आश्वासक छताखाली सारे निवांत असतात ते छत्र म्हणजे पितृछत्र.

  या पितृछत्राबद्दल , बाबांबद्दल लिखाण कमीच झालयं.आईवर सर्वचजण भरभरून लिहतात. आई मायेचा झरा,बाबा रागाचा पारा.असे समीकरणच करून ठेवले आहे. बापांबद्दल अनेक गैरसमज पसरवले आहेत, पण हे सर्व बाबांना समजून न घेतल्याच्या गैरसमजूतीतून होते. वडील रागीट आहेत असे म्हणत असताना त्यापाठीमागची त्यांची भूमिका व भावना जर आपण समजून घेतली तर बाप आपल्याला समजू शकतो.घरात कींवा सगळीकडेच शिस्त ही महत्त्वाची असते ती लावणारा एकच व्यक्ती म्हणजे बाप असतो.व ती लावण्यासाठी त्याला कडकच रहावे लागते.अन्यथा घरं विस्कटून गेली असती.

    आईवडील दोघेही एकमेकांना समजून घेतात.संसाराची पारडी समसमान राहण्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळायचा असतो.वडील रागावले की आई समजूत घालते,शांत करते.त्यामुळे कलह,अशांतता वाढत नाही. बाबा घरात असले की घर कसं भरल्यासारखे वाटते. आपण कीती निर्धास्त असतो.कुठल्याही संकटांची जाणिव आपल्याला होत नाही. सर्व काही कीती सहज, सोपे आहे असे वाटते पण याची खरी सत्यता ,महानता कळते ते पितृछत्र हरपल्यावर.कीती आगतीक होतात सगळे तेंव्हा!!! पदोपदी बाबांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. प्रत्येक गोष्टीत असुरक्षितता, अनिश्चितता वाटत राहते.ज्यांचे पितृछत्र हरपले आहे त्यांना याची जाणीव प्रकर्षांने जाणवते.म्हणून जोपर्यंत आपले बाबा आपल्याजवळ आहेत तोपर्यंतच त्यांचा आदर करायला हवा.त्यांना योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे.

   लहान असताना बाबा आपल्याबरोबर कीतीवेळा सहजपणे लहान होतात. आपल्या जास्तीत जास्त गरजा कचवत नसतानाही फक्त आणि फक्त मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पसरवण्याकरीता भागवत असतात.हे कुठे आपल्याला माहीत असते?पावसाळ्यात, उन्हाळ्यात पावसापासून व उन्हापासून वाचण्यासाठी आपण एखाद्या भक्कम अशा वृक्षाचा कींवा ईमारतीचा आसरा शोधतो व निवांत राहतो तसेच आपले बाबा आपल्या आयुष्यात आपल्या निवांतपणाचे छत्र असतात. आपल्याला आधार देतात. बाबा सगळं काही असतात.आपले मित्र, डॉ., प्रेम करणारर, प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक, प्रसंगी करमणूक करणारे असं सर्व काही असतात.कारण बाबांच असणच सर्व काही सांगून जातं,फक्त ते व्यक्त होत नसतं.पण जेंव्हा हे अव्यक्त व्यक्तीमत्व आपल्यात नसते तेंव्हा मात्र सर्वजण भरभरून व्यक्त होतात.असे आपले अस्तित्व राखून असणारे आपले बाबा,आपले प्राण बाबा,सदैव आपल्यावर मायेची पखरण करणारे छत्र म्हणजे बाबा . सदैव छत्र देणाऱ्या पितृछत्र बाबांना सलाम .

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

Saturday, 16 June 2018

शेल रचना ( सोबत )

उपक्रम
शेल रचना

विषय - सोबत/सोबती

सोबत हवी तुझी सदा मजला
मजला सोडून जाऊ नको कधी
सोबतीने तुझ्याच रंगविलाय
रंगविलाय स्वप्नमहाल आधी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

चित्रचारोळी ( बालपण )

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

नाही सरले हो बालपण माझे
बाबा मला अजून खेळायचयं
रंगबिरंगी चेंडू खेळून आज
निरागस हास्य फुलवायचयं

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता. शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर

षटकोळी ( दगा )

आजचा उपक्रम स्पर्धा

षटकोळी

प्रेमात दगा दिलेल्या प्रेयसीसाठी

कळलेच नाही तूला
प्रेम माझ्या मनातले
शोधत राहीलो मी
चरचरात रोज तूला
फसवेच निघाले सारे
दिवाना झालो मी

          ( 2 )

कसं सांगू समजावून
भाव माझ्या मनातला
सोडलेस तू सहजच
तोडल्यास त्या आणा-भाका
लाथाडून अशी गेलीस
जसा वाऱ्यावरचा पतंगच

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा कोल्हापूर

शेल काव्यरचना ( मन व्याकूळ )

शेल काव्यरचना

मन व्याकूळ

झालं व्याकूळ व्याकूळ मन
मन शोधतयं हो निवारा
कसं होईल ते शांत आज
आज मिळेल का हो आसरा

मन आक्रंदून सांगतय
सांगतय साऱ्या या जगाला
शांत करा हो मनाला माझ्या
माझ्या नाहीच चैन जीवाला

मन व्याकूळ आठवणीने
आठवणीने झाले बेजार
भेटायाची आस मनातच
मनातच उठवे काहूर

व्यक्त मनीच्या भावना आज
आज प्रकटण्या फुललेल्या
करुन आर्जव विनवण्या
विनवण्या हजार जाहल्या

व्याकूळ मनाच्या सतारीला
सतारीला छेडते प्रेमाने
गीत प्रेमाचे फुलु दे रोज
रोज मनी रुजू दे जोमाने.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

कविता ( ईद मुबारक )

रमजान ईद निमित्त
काव्यलेखन स्पर्धेसाठी

विषय -- ईद मुबारक

शिर्षक --- रमजान

चांद्रदर्शनाने फुलली मने ,
हर्षाची झालर शोभते .
त्यागाच्या त्या भावनेची ,
मनी भुरळ आज घालते .

रमजान आणि भाईचारा ,
संदेश मानवतेचा देतो .
ईद-उल-फितर म्हणजेच ,
आनंदाचे दान सर्वा देतो .

भावना बंधुभावाची मनी ,
रोज वाढीस लागते .
करुनी रोजा दिवसभर ,
मन कणखर ते बनते .

होते शुद्धी तना मनाची ,
दूर मन राहते मोहापासून .
ईद- मुबारक म्हणूया आज,
गळाभेट लहानथोरांपासून .

खाऊन गोड शिरखुर्मा ,
सांगता कठीण उपवासाची.
चला करुया आज अंत ,
संपवूया भावना वैरत्वाची.

कवयत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

Wednesday, 13 June 2018

शेल चारोळी ( प्रचार )

शेल चारोळी

प्रचार

प्रचार झालाय सुरू आता
आता नकोच विचारायला
नमस्काराचा चमत्कार तो
तो लावतोय विसरायला

श्रीमती माणिक नागावे

कविता ( भाववाढ )

स्पर्धेसाठी

विषय -- भाववाढ

वर्धिष्णू आहे सतत ,
दर भिडलेत गगनाला.
भाववाढ नाडत आहे ,
रोज सर्वसामान्य जनतेला

सरकार येवो कुठलेही ,
सामान्यांची परवडच आहे
भूलथापांना बळी पडून,
भाववाढ माथीच आहे .

माल शेतकरी-याचा रोज,
घेतला जातोय स्वस्ताईत
ग्राहकांच्या पदरात मात्र,
महागाई बनली ताईत .

जगायला तर हवे ईथे,
भाववाढीने जीव जातोय .
मरता पण नाही येत ,
मोह जीवनाचा खुणावतोय

कवयत्री
श्रीमती माणिक नागावे कुरूंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 12 June 2018

चारोळी ( हास्य )

उपक्रम

हास्य

हास्यच सांगून जाते आज
आनंद शाळा सुरू होण्याचा
हाती पाटी दफ्तर पाठीला
मार्ग सुखी झाला भविष्याचा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड

दर्पण काव्य ( स्वानंद )

DaRपण

स्पर्धेसाठी

विषय - स्वानंद

स्वानंद
आनंद स्वतःचा
स्वानंद
स्वावलंबनाने केलेल्या आपल्या कामाचा
स्वानंद
कठीण प्रसंगी स्वतःहून घेतलेल्या आपल्या निर्णयाचा
स्वानंद
स्वकष्टातून जिद्दीने, स्वतःच्या प्रयत्नातून मिळविलेल्या आनंद देणाऱ्या यशाचा
स्वानंद
पाहून दुःख दुसऱ्याचे दुःखी होऊन लागलीच मदतीला पुढे येणाऱ्या स्वमनाचा
स्वानंद

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

कविता ( आला पहिला पाऊस )

स्पर्धेसाठी

आला पहिला पाऊस

झेलून अंगी पहिला पाऊस
रोम रोम सारे शहारले.
मानवाबरोबर धरतीचेही,
कण न कण मोहरले .

पावसाच्या धारा झेलू ,
चिंब चींब भिजून नाचू .
ओठांमध्ये पावसाची,
असंख्य गीते आता रचू.

तरूण वेली फुले पाने ,
आससून पीऊ लागली.
तहान आर्त जीवांची ,
अशी आता भागू लागली

प्राणी पक्षी निसर्ग आता,
पाऊस पहिला झेलू लागली.
तगमग ग्रीष्माची आता
शितल शांत होऊ लागली

आला पहिला पाऊस
आनंदाने नाचू गाऊ
सुंदर भविष्याचे गोड
स्वप्न डोळ्यात साठवू .

कवयत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड, ता. शिरोळ
जिल्हा.  कोल्हापूर
8087337798

Monday, 11 June 2018

शेल रचना ( कुंकु )

उपक्रम

शेल रचना

कुंकु

सौभाग्याचे लेणे कुंकु
कुंकु चा मान स्रीत्वाला
कवच सुरक्षेचे ते
ते आव्हान जनतेला

श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड

Sunday, 10 June 2018

कविता ( काळी माती )

स्पर्धेसाठी

विषय- काळी माती

दिलासा देते काळी माती ,
जशी आई देते बाळाला .
शेतक-याचा आधारस्तंभ,
आज चाललीय उतरतीला.

खते वाढली सामू घटला,
रसायनांचा मारा केला.
कुठवर सोसेल अन्याय,
मानवाने तिच्यावर केलेला

मीठ फुटून झाली बेजार,
आता तरी टाहो ऐका.
काळी माती खरं सोनं ,
जपून तीजवर पाय टाका.

मोहापायी जादा पिकाच्या
परवड झाली मातेची.
थांबा सावध व्हा वेळीच,
जपा आयुष्यं स्वतःची .

कवयत्री
श्रीमती माणिक नागावे
जिल्हा - कोल्हापूर

शेल रचना ( निसर्ग )

उपक्रम

शेल रचना

निसर्ग

पहा किमया निसर्गाची या
या सारे आस्वाद आज घेऊ
नदी नाले ओसंडून गेले
गेले सर्व आपणही जाऊ

श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड

Saturday, 9 June 2018

कविता मुक्तछंद ( नको वृद्धाश्रमाची वाट )

स्पर्धेसाठी

मुक्तछंद

नको वृद्धाश्रमाची वाट

आठवतो मजला बाळा
लहानपणीचा तूझा थाट
तूझे बोबडे बोल अन् तुझा तो निरागस बालहट्ट .
नाही थकलो मी कधीही पुरवली सारी तुझीच हौस
केलं तूला लायक समाजात ,
पण मी मात्र ठरलो नालायक .
कळले  दाखवणार तू वाट मला वृद्धाश्रमाची......
पण ऐक बेटा मन लावून .नको दाखवू वाट
वृद्धाश्रमाची छप्पर डोक्यावर हक्काचं असूदे
माझा परिवार सभोवती असूदे .
एवढी एक ईच्छा पुरी कर
नको दाखवू तू वाट वृद्धाश्रमाची
नाही देणार सल्ला ना उपदेश,
पोटाला चार घास दे, ऊपास घडला तरी चालेल,
दूर घरापासून करू नको ... यासाठीच केला का प्रपंच ?
नव्हते ठाऊक मजला हे .
जगलो असतो आनंदाने , नसते मारले मन दुःखाने
.केली असती सोय माझी , नसता केला खर्च तुझ्यावर...
जगलो असतो आज मानाने .
चूक माझी मलाच भोवली , माझं माझं म्हणत बसलो.
लक्ष तूमच्यावर केंद्रित केलं.ठरलो वेडा आता या जगी
संपलयं सारेच आता , जोम अंगात नाही रे , पडून राहतो कोपर-यात एका, नको दाखवू तू वाट वृद्धाश्रमाची.....

कवयत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड , ता.शिरोळ ,
जिल्हा - कोल्हापूर

Friday, 8 June 2018

शेल ( फुलले रान माळ )

उपक्रम
शेल रचना

फुलले रान माळ

फुलले रान माळ
माळ हा सुखावला
झेलून पावसाला
पावसाला हासला

आनंदाने म्हणाला
म्हणाला फुललो रे
स्पर्शाने तुझ्या आता
आता शांत झालो रे

बरस तू असाच
असाच रानोमाळ
अशांत जीवाला या
या शांत कर गळ

फुलले रान माळ
माळ हा गंधाळला
परिमळाने त्याच्या
त्याच्या तो बहरला

श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड

द्रोण ( फुलले रान माळ )

उपक्रम

शेल काव्यरचना

फुलले रान माळ

फुलले रान माळ
झेलून पाऊस
छान ओघळ
  पावसाचे
    जवळ
     आले
       हो

फुलले रान माळ
फुलली सुमने
  पहा ओंजळ
   सूमनांनी
    गंधाळ
     झाली
       हो

फुलले रान माळ
आनंदले मन
झाले तेजाळ
  आपसुकच
    मधाळ
     झाले
       हो

फुलले रान माळ
सुखी झाले लोक
   तो परिमळ
    गंधाळला
      जवळ
      आला
        हो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड

दर्पण काव्य ( शतरंज )

राज्यस्तरीय दर्पणकाव्य प्रतियोगीता केलिए

विषय -- शतरंज

शतरंज
जाल है
शतरंज
जीवन का मेल है
शतरंज
हार-जीत का मानव का खेल है
शतरंज
कभी खुशी कभी गम देनेवाला जमानेका झोल है
शतरंज
बडे बडे तख्तोंको ऊलटनेवाला पलटनेवाला ये भयंकर एक आंतरजाल है।

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

कविता अष्टाक्षरी ( पावसाळी मेघ असे )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

पावसाळी मेघ असे

पावसाळी मेघ असे,
बरसले जोरदार .
आज पहा शिवार हे,
झाले हे हिरवेगार .

वेड लावती मेघ हे ,
शेतकरी होतो वेडा .
पावसाच्या वाटेकडे ,
डोळे लावतो हा खडा.

सगळेच झाले खुश,
मेघ आले हे भेटीला.
भ्रांत नसे आता काही,
कष्ट आहेत जोडीला .

पीक शेतात डुलले,
मन हरकून गेले .
शांत जीव शांत भाव,
समाधान मनी आले .

असा बरस तू मेघा,
तृप्त सारा आसमंत.
नाही काळजी कशाची,
मीच खरा भाग्यवंत .

कवयत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा- कोल्हापूर

कविता ( खरीप हंगाम )

कविता

    खरीप हंगाम

आला हंगाम खरीपाचा ,
लगबग पेरण्यांची झाली.
पावसाच्या आगमनाची ,
प्रतिक्षा सुरू आता झाली.

आला आला पाऊस ,
मन झालं र आनंदी .
शेतकरी राजाच्या ,
झाली जीवाची बेधुंदी .

तू बरस असाच रोज,
बिज अंकुरे खोल मातीत.
कल्पनेतील पीक माझ्या,
बहरू दे हिरव्या शेतीत.

नको आता फास दोरीचा,
माझ्या जीवनी कधीच.
सफळ जाऊ दे खरीप,
जुळणी करेन मी आधीच.

कवयत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड

शेल रचना ( मेघ )

उपक्रम

शेल काव्यप्रकार

विषय - मेघ

खरीप हंगाम आला
आला मेघांनी दाटून
सपान शेतक-याचे
शेतक-याचे खपून

श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड

Thursday, 7 June 2018

शेल रचना ( मेघ )

उपक्रम

शेल रचना

विषय- मेघ

गर्जतच मेघ आले
आले भुईवर पहा
तृप्त झाली ही धरती
धरती म्हणे वाहवा

    माणिक नागावे