चर्चासत्रासाठी मुद्दे
कोरोना या रोगाची महाभयंकर परीस्थिती पाहता शासनाने लाॅकडाऊन तीस एप्रिल पर्यंत वाढवले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. साहजिकच यामुळे रस्त्यावरची वाहनांची रहदारी कमी झाल्याने वायू प्रदूषण,ध्वनी प्रदूषण यात भरपूर फरक पडला आहे.कारण प्रदूषणाला सर्वात जास्त कोण कारणीभूत असेल तर तो मानव आहे.मानवाने जिथे जिथे पाऊल ठेवले आहे तिथे तिथे प्रदूषण केले आहे.मग ते वाहणांच्या अतिवापरामुळे त्यातून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईड चे वातावरणात मिसळणे असो वा सणसमारंभात लावलेला डीजेचा कर्णकर्कश आवाज असूदे. रोजचा गोंधळ,गजबजाट असूदे .मानवच या सर्वाला कारणीभूत आहे.पण आता हे सर्व थांबल्यामुळे प्रदूषण अजिबात होत नाही. त्यामुळे वातावरणात अतिशय स्वच्छता असल्याने आकाश निरभ्र दिसत आहे.कोणताही गोंगाट नसल्यामुळे कमालीची शांतता अनुभवायला मिळत आहे.पक्ष्यांचा कीलबिलाट स्पष्टपणे व मोठ्या आवाजात ऐकू येत आहे.. पशूपक्षी निवांतपणे फीरत आहेत
या अपरिहार्य कारणांमुळे सर्वांना घरातच थांबून रहावे लागले आहे याचा नाते संबंधांवरचा परिणाम चांगला व वाईट दोन्हीही होत आहेनोकरी व कामामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती ही सतत धावत होती.अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील मुले घरच्या लोकांपासून लांब होती.कुणाला एकमेकांची विचारपूस करायला वेळ नव्हता. पण आता सगळे एकाच छताखाली आले आहेत.एकमेकांना समजून घ्यायला भरपूर वेळ मिळाला आहे. चंगळवादी, भोगवादी संस्कृती ला आळा बसला आहे.जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे पूर्वीच्या दिवसांची आठवण व महत्त्व अधोरेखित झाले आहे.
सदर कालावधीत पैसा व माणुसकी याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे.आज पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व आले आहे.कारण अशा या भयंकर परिस्थितीत एकमेकांना आधार देणे,मदत करणे गरजेचे आहे.
या सगळ्या वातावरणात भटक्या जनावरांचे हाल मात्र अतिशय वाईट झाले आहेत. कारण मानवच घरात स्वतःला कोंडून घेतल्यामुळे सर्व हॉटेल, रेस्टारंट बंद असल्याने भटक्या जनावरांना खायला कुठुन मिळणार ? त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढी मदत,कींवा खायला या भटक्या जनावरांना देता येतील तेवढे दिले पाहिजे.
पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी यांचे सेवेसाठी असलेल्या समर्पणाबद्दलतर बोलायला शब्दच नाहीत. कारण समाजातील काही आडदांड, विकृत लोकांच्या बेबंदशाही मुळे कोरोना हा रोग पसरत जात असल्यामुळे यांना अटकाव करण्यासाठी पोलीस यंत्रणा दिवसरात्र झटत आहेत.तसेच वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी हेही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोग्यांना रोगमुक्त करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.त्यांचे आभार आम्ही कोणत्याही शब्दात प्रकट करु शकत नाही.या रोगाला हरवण्यासाठी सर्वजण घरीच राहू व ही साखळी तोडून टाकून सशक्त व सक्षम समाज बनवण्यासाठी कटिबद्ध होऊ या.
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment