Thursday, 30 April 2020

चारोळी (बालिका )

उपक्रम

चारोळी

बालिका

काळाच सारा करुन पेहराव 
निघाली बालिका रस्त्यावर
रंग गाडीचा काळा शोभे सुंदर
गॉगल काळा डोळ्यावर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

लेख मराठी (नशिब )

लेख

नशीब

" माझं नशिबचं फुटकं , कयम मी अशीच चडफडत राहणार." " नाही रे , माझं ना नशिबच बेकार आहे,मी असाच राहणार कायम ", " मी कीतीही अभ्यास केला ना तरीही मला पेपर अवघडचं जातो,माझं नशिबच असलं आहे "अशी अनेक वाक्ये आपण समाजात नेहमी ऐकत असतो.यावर मी नेहमी विचार करत असते.हे खरं असेलं का? माझ्यामते ही एक पळवाट आहे.

जीवन जगताना रोज सगळे चांगलच होईल ही अपेक्षा आपण गृहीत धरून कृती करत असतो.कोणत्याही गोष्टीचा शेवट हा चांगला की वाईट हे कशावरून ठरते? आपल्या कृतीवर ते अवलंबून असते.आपण जर प्रामाणिक प्रयत्न केले तर यश निश्चितच मिळते.काम करत असताना ध्येय न ठरवता जर जनावरांसारखे फक्त राबतच राहिलो तर दिशाहीन तारुसारखी आपली अवस्था होते व आपण भरकटतच राहतो.व शेवटी अपयशाला सामोरे जावे लागते.व आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो.नशिबाला दोष देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे स्वतःची सुटका करुन घेणे होय.स्वतःचा नाकर्तेपणा झाकून टाकायचा असेल तर नशिबाचा हवाला देणे होय.

काही लोकं नशीब म्हणजे त्यांचे पूर्वजन्मातील पाप-पुण्य समजतात.नशीब घडवायचे असेल तर ते आपल्या हातात आहे असे मला वाटते.आपले नशीब आपण कसे काय घडवू शकतो? असे तुम्हाला वाटेल.पण ते खरेच आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या मन,मनगट,व मेंदूवर विश्वास हवा.तरच कोणतीही जबाबदारी आपण लिलया पेलू शकतो.अपयश आले तर आपले प्रयत्न कुठे कमी पडले हे लगेच आपल्या लक्षात येते व पुढच्या वेळी ती चुक सुधारुन आपण यशस्वी होतो.

विद्यार्थ्यांनी जर वेळच्यावेळी लक्षपूर्वक अभ्यास पूर्ण केला तर साहजिकच त्यांना परीक्षेत धवल यश संपादन होते.यात कुठेही नशिबाचा, दैवाचा भाग येत नाही." कर नाही त्याला डर कशाला " अशी गत प्रयत्नशील व्यक्तीची होते." प्रयत्नांती परमेश्वर" हे ही तेवढेच खरे आहे." प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे " या उक्तीप्रमाणे दैवाचा,नशिबाचा भाग येथे गौणच आहे.म्हणून सर्वांनी नशिब , नशिब न म्हणता प्रयत्न, प्रयत्न म्हटले पाहिजे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना एका एका सेंकदासाठी आपले नंबर गमवावे लागतात.प्रयत्न थोडेसेच कमी पडलेले असतात.हे सकारात्मक विचार करणारा खेळाडूच स्विकारु शकतो. नाहीतर बाकीचे नशिब म्हणत बसतात.

एखादी व्यक्ती आयुष्यात सफल होते.एखाद्या बाईचा संसार सुखाचा होतो.कुणाला वाईट अनुभव येतात.कुणी अयशस्वी होते.अशावेळी आपण यशस्वी लोकांना भेटून त्यांचे जीवन जवळून पाहिले तर आपल्याला ही आशेचा कीरण दिसतो.तेंव्हा कधीही निराश होऊ नका.प्रयत्न करा व यश मिळवा.सर्व संतानीही आपल्याला हेच सांगितले आहे.सर्व शास्त्रज्ञ जर नशिब, दैव करत बसले असते तर इतके शोध लागले नसते.अश्मयुगातच मानव खितपत पडला असता.वेळेचा सदुपयोग करुन घ्या.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता अष्टाक्षरी( सावराया हवे आता )

अष्टाक्षरी

विषय- सावराया हवे आता

शिर्षक- निसर्गाचा कोप

निसर्गाचा कोप झाला,
सर्वत्रच हाहाकार.
सामसूम दाही दिशा,
सगळेच निराकार.

बंद झाले सर्वकाही,
हाल गरीबांचे झाले.
पोटासाठी वणवण,
कर्म सर्वांना भोवले.

दंभ विज्ञानाचा खुजा,
अहं मानवाचा खोटा.
आत्मप्रौढी बिनकामी,
उपयोगी नाही नोटा.

देव सारे बंद झाले,
भक्त शोधी कुठे त्राता.
आपल्याच मना सांगा,
सावराया हवे आता.

मदतीला धावणारे,
हात सेवकांचे पुजू.
ऋणाईत सदा राहू,
कायमच असू रुजू

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( लहर )

उपक्रम

चारोळी

लहर

लहर कधी कुणाची फीरेल
कशी कुठे का जिरेल मस्ती
दिवस अन् वासेही फीरतील
नको मानवा करु सुस्ती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 28 April 2020

लेख ( शाळेतील गमतीजमती )

लेख
शाळेतील गमतीजमती

लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा 
असे बालपणाविषयी बोलले जाते.लहानपण सर्वांना आवडते.त्याचप्रमाणे शाळा आहे.आपण मोठे होतो.पण शाळेच्या आठवणी नेहमीच ताज्या असतात.
मला माझी शाळा मनापासून आवडते.लहानपणी मी कन्या विद्या मंदिर नं.१ मध्ये शिकत होते.इयत्ता पहिली ते सातवी आम्ही बालमैत्रीणींनी खूप मजा केली.ते दिइआजहघ आठवले की मन हर्षोल्हासित होऊन नाचू लागते. माझ्या वर्ग शिक्षिका सौ.डिग्रजे बाई होत्या.तेंव्हा आम्ही बाईच म्हणायचो.कीती गोडवा आह त्या शब्दात!!! आम्ही पाचसहा जणांचा एक ग्रुप होता.मी बाईंच्या मैत्रीणीची मुलगी म्हणून असेल,कींवा थोडी हुषार, आगाऊ जास्त असल्याने असेल माझ्यावर बाईंचे सतत लक्ष असे.त्यामुळे आपसूकच बाकीच्या मुलींही माझ्या भोवती भोवती असत.आम्ही वेगवेगळ्या खेळात तरबेज होतो.सर्व स्पर्धांत भाग घ्यायचो.एकमेकांच्या घरी जाऊन दंगामस्ती करायचो,पालकांचा काव खायचो,पण काही बदल होत नव्हता.

शाळेत गरीब मुलीही होत्या. कधीतरी त्यांना परीस्थिती मुळे काही वस्तू मिळायच्या नाहीत. त्यावेळी आमच्या ग्रुपतर्फे त्यांना आम्ही थोडे थोडे पैसे काढून त्यांना हवी असलेली वस्तू कींवा फी भरायला मदत करायचो.तेंव्हा खूप छान वाटायचे.मग त्यापण आमच्या खेळात सामिल व्हायच्या.सातवीनंतर आठवघ ते दहावीला हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मग आमचा दंगा काय विचारता. खेळाच्या तासाची आम्ही आतुरतेने वाट पहायचो.एकदा का बेल झाली की सुसाट मैदानावर... कायकाय कीती खेळ खेळायचो ..बापरे..एक तर असा होता, आमच्या शाळेच्या मैदानावर ट्रक्टरची ट्राली उभी असायची.पाठशिवीचा खेळ त्यावर आम्ही खेळायचो.एकटी पाठ लागली की बाकीच्या पळायचो.फक्त पळायचो नाही तर त्या ट्रक्टरच्या वर चढायचो.मैत्रीण शिवायला आली की लगेच दुसऱ्या बाजूने उतरून ट्रक्टरच्या खालच्या बाजूने परत वर चढायचो.तेही अगदी लिलया.कसं जमतं होतं कुणास ठाऊक.

कुणीतरी एखादी वस्तू आणली तर सर्वजण त्याचा उपयोग करायचो.एखादे नवीन फळ आणले कुणीतरी तर चिमणीच्या दातांनी सर्वजण कुरतडायचो.आता कीळस वाटते ना ? पण तेंव्हा असले भाव मनातच येत नव्हते. अगदी निरागसतेने हे सर्व चाललेले असायचे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की कघ मीळेपर्यंत आम्ही गप्प बसत नव्हतो.वर्गात विद्यार्थीनी प्रतिनिधी मीच असल्याने मी सांगेल तेत बाकीच्या करायच्या अर्थात आवडीने.हं !! मी कधीच कुणावरही कुठल्याही गोष्टींची जबरदस्ती केली नाही. सगळे गोडीगुलाबीने रहात असू.
शाळेत असताना सर्व खेळ खोखो,कबड्डी, लपाछपी, शिवाशिवी, कींवा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम असूदे सर्वात सहभागी होत असू.एकदा " सुंदर ते ध्यान, उभे वीटेवरी" हा डान्स आम्ही बसवला होता.प्रत्यक्ष स्टेजवर आम्ही वारकरी, पांडुरंग इ.ची वेशभूषा करुन तल्लीन होउन नाचत होतो.तेंव्हा एक बाई स्टेजवर येउन पांडुरंगाच्या व आमच्या पाया पडून गेली.खूप छान वाटले तेंव्हा.टाळ्यांचा गजर अजून मला ऐकू येतो.

एक दिवस भाषण करायचे होते.मी पाठ केले नव्हते.शिक्षिकांनी माझे नांव पुकारले. मी म्हटलं, " माझं पाठांतर झाले नाही." त्या म्हणाल्या, " कख नि केलं? जेवढं केलयं तेवढं तरी बोल,उठ " मी उठले स्टेजवर गेले पण भाषण काही आठवेना. सुरवात केली.सगळ्यांची नावं घेऊन झाली. पण पुढे काय ? मला एक शब्द आठवेना. मराठी भाषा सोडून कन्नड ,इंग्रजी भाषा आठवायला लागल्या. रडू येतयं का काय असं वाटत होतं.शेवटी शिक्षिकेंनी रागानेच ये खाली म्हटल्यावरच सुटका झाली. तेंव्हापासून आजपर्यंत तसा अनुभव कधीच आला नाही कारण मी आधी तयारी करायची असते हे लक्षात ठेवले होते.

पण आता ते शक्य नाही. फक्त गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी एवढचं म्हणू शकतो.व पुन्हा बालपणात रमून जाऊ शकतो.खरंच रम्य होते बालपण .बालपणातील शाळा व शाळेतल्या आठवणी, गमतीजमती.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 26 April 2020

काव्यांजली ( सोनेरी सकाळ )

स्पर्धेसाठी

द्रोणकाव्य

विषय- सुवर्ण सकाळ

प्रकाश किरणांची
सुवर्ण सकाळ
सुनयनांची
उगवली
तेजांची
फुले
ही

सुवर्णमयी प्रभा
आसमंती आली
पसरे आभा
भूवरती
ती शोभा
पहा 
हो

कीलबिलती खग
प्रभात समयी
दिसती ढग
आनंदाचे
सजग
दृश्य
हे

ताजीतवानी हवा
आरोग्यदायक
सर्व मिळवा
व्यायामाने
पळवा
रोग
हे

भास्कर प्रकटला
सुवर्ण कांतीने
जणू पेटला
अग्नीगोळा
वाटला
मनी
तो

वर्धापनदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
जणू सोन्याच्या
शब्दधारा
मनाच्या
कुपीत
जमा
या

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( निरोप )

चारोळी

निरोप

निरोप शब्दानेच हेलावते मन
फुटू पाहतो बांध भावनांचा
आठवांच्या भाऊगर्दीत लपतो
डोंब हृदयातील यातनांचा

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

अष्टाक्षरी ( महालक्ष्मी )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

शिर्षक- महालक्ष्मी

महालक्ष्मी जगदंबा
रुप तुझे मनोहारी
शोभे हळद वदनी
चेहऱ्याचा रंग कारी

वक्षावरी अलंकार
साक्ष देती वैभवाचे
माळ कवड्यांची वरी
रुळे चिन्ह दैवतांचे

नक्षी पैठणी गुलाबी
जरतारी काठ झुले
डोईवर गजऱ्यांची
निशीगंधी छान फुले

कानी कर्णफुले मोठी
मत्स्याकारी चमकती
शिरावरी किरीटाचा
लालरत्न दमकती

सिंहासन सोनियाचे
नागफणी पाचफडी
गजराज दोन्हीबाजू
लकाकती सोनकडी

मोगऱ्याच्या सुवासिक
सुमनांचा पायी सडा
लालशुभ्र जरबेरा
घालतोय गोल कडा

ध्वज चामर सोन्याची
सोनवाळा पायी वसे
नथ नाकी मासोळीची
वाटे माता प्रेमे हसे

कवयित्री 
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 25 April 2020

चारोळी (वर्दी )

चित्रचारोळी

वर्दी

खांद्याला बंदूक वर्दी अंगात 
करारी बाणा संवेदना मनात
नजरेत धाक गरजूंना शोधते
निस्वार्थ मदतीने प्रिय जनात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( कप्पा )

चारोळी

कप्पा

सांडला जरी कैकदा
कप्पा मनाचा उघडून
आठवणी संपतच नाहीत
बसल्या खोलवर दडपून

श्रीमती माणिक नागावे

अभंग (अक्षय तृतीया )

स्पर्धेसाठी

सुधाकरी अभंग

विषय- अक्षय तृतीया

शिर्षक- मंगल दिन

अक्षय तृतीया।
मुहूर्त हा छान।।
मांगल्याचे पान।
मानतात।।१।।

महात्म्य भूवरी।
पूजन करुन।।
भावांनी भरुन।
ओवाळती ।। २ ।।

चैत्राचा महिना ।
दान धर्म करा ।।
सुखानेच भरा ।
याचकाला ।। 3 ।। 

पवित्र ही गंगा ।
आली या धरणी ।।
समृद्धी पेरणी । 
सर्वत्रच ।। ४ ।।

जन्मदिन खरा ।
परशुरामाचा ।।
नाश क्षत्रियाचा ।
पण केला ।। ५ ।।

पुरण पोळीचा ।
नैवैद्य देवाला ।।
वाटा गरीबाला ।
अन्नद्रव्य ।। ६ ।।

दिन हा भाग्याचा ।
खास मुहूर्तांचा ।।
झाला सुवार्तांचा ।
कायमच ।। ७ ।।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 24 April 2020

चारोळी ( मास्क )

चारोळी

मास्क

झोपडपट्टीत माझी वस्ती
फाटके मळके कपडे शोभती
आरोग्यासाठी स्वदेशी मास्क वदनी
सज्ज मी लढाया मला ना भिती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

लेख (खेळाचे महत्त्व )

लेख क्रमांक 6 

विषय- खेळ/क्रीडा

धकाधकीच्या जीवनात प्रत्येक मानव हा ताणतणावाखाली वावरत आहे.दररोजचा कामाचा व्याप यामुळे स्वतः कडे वेळ द्यायला वेळच कुणाकडे सापडेना.पण मन:शांती मात्र सगळ्यांना हवी आहे. यावर काय उपाय आहे का? 

याला उत्तर आहे , या समस्येवर उपाय आहे. आता तुम्ही म्हणाल की कोणता तो उपाय ? सांगते.. या सगळ्यावर उपाय म्हणजे खेळ खेळणे होय.चकीत झालात ? होऊ नका कारण खेळ हा एकमेव तंदुरुस्ती चा उपाय आहे.खेळ म्हणजे  सगळेच मैदानावर, घरात,नियमांत बंदिस्त राहून,मुक्तपणे खेळले जाणारे सगळेच खेळ होय.खेळाचे हे विविध प्रकार आहेत. जगाच्या विविध ठिकाणी विविध प्रकारचे खेळ खेळले जातात.खेळामुळे हे कसं शक्य आहे असे वाटते का ? हो अगदी खरे आहे.

खेळाडू आपला खेळ चांगला व्हावा यासाठी खूप मेहनत घेतात,सराव करतात.खूप त्रास सहन करतात.तेंव्हा कुठे ते यशाच्या जवळ जातात.या खेळाडूंच्या जीवनाकडे पाहिल्यावर आपल्याला प्रेरणा मिळते.,उत्साह येतो.भारतीय खेळ  हॉकी,कबड्डी, खो-खो. इ. तर क्रीकेटसारखे परदेशी खेळही भारतात खेळले जातात.आता खेळाडूंना ही शासन शिष्यवृत्ती देत आहे.यामुळे मुलं असो अथवा मुली खे आहे.ळात आनंदाने भाग घेत आहेत. वेटलिफ्टींगसारख्या,कुस्तीसारख्या खेळात मुलीही आता मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.

अनाथ दिव्यांग खेळाडूंनाही शासनाच्या विविध प्रकारच्या योजन माहिती करुन घेणे क्रमप्राप्त आहे.खेळात खेळताना योग्य समन्वय घालावा लागतो.अंदाज अचूक असावा .याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे  हॉकीचे जबरदस्त खेळाडू मेजर ध्यानचंद होय.त्यांना लोकं हॉकीचा जादूगार समजत . गोल करण्याचा त्यांचा परफेक्ट अंदाज होता.सर्वांना वाटे त्यांच्या स्टीकला लोहचुंबक लागले आहे की काय.तशी तपासणी ही झाली. त्याचप्रमाणे क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सनी म्हणजेच सचिन तेंडुलकर होय.अनेक विक्रम त्यांच्या नावावर नोंद आहेत. हे सगळं आपोआप नाही आले.तर त्या पाठीमागे त्याची मेहनत आहे.आज त्याचा वाढदिवस आहे.संपूर्ण जगातील लोक आज त्याला शुभेच्छा देत आहेत.

खेळामुळे अंगात उर्जा निर्माण होते.मन शांत होते.ताण सगळा निघून जातो. मनी सकारात्मक विचार येतात.ताजेतवाने वाटते.आमच्या लहानपणी शाळेतून आल्यानंतर आम्ही एक तखस खेळ खेळत असू.मग हातपाय धुवून अभ्यासाला बसायचो. त्यामुळे अभ्यास कधी कंटाळवाणा वापलाच नाही. कधी आळस आला नाही. आता खेळ ही संकल्पना बदलण चालली आहे. खेळ आजची मुले खेळ खेळतात पण मैदानावर नाही तर मोबाईल, कम्प्युटरवर खेळतात. तासंतास एकाजागी बसून वेळ घालवतात.पण याचा काहीच उपयोग नाही तर उलट नुकसानच आहे.एकाजागी बसल्यामुळे उर्जा खर्च होत नाही. शिवाय नजरेवर वाईट परिणाम होतात.

आरोग्य ही धनसंपदा मानली जाते. पण त्यासाठी आपण व्यायाम, योगासने, प्राणायामची जोड खेळाबरोबर द्यायला हवी.निरोगी शरीरात निरोगी मन वास करते असे म्हणतात.हे खरेही आहे. त्यासाठी आपण खेळले पाहिजे. जीवनात खेळाला महत्त्व दिले पाहिजे.


लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 23 April 2020

कविता ( शामची आई )

उपक्रम

कविता लेखन

विषय: मला स्मरणात राहिलेले पुस्तक

शिर्षक: शामची आई

मातृप्रेमाचा महन्मंगल झरा,
शामची आई बावनकशी सोनं
पांडुरंग सदाशिव साने लेखक
आहे शंभर नंबरी खरं नाणं

कारावासातील त्या रात्री,
दररोज एक कथा स्फुरली.
पत्थरदिल कैदीही गहिवरले,
सर्वांना आपली माता स्मरली.

संस्काराची खाण शामची आई
कर्तव्यदक्ष मातेची करुण कहाणी
शिकविले जगणे स्वाभिमानाने
नेहमीच तिची कोमल वाणी

पाठ भूतदयेचा,माणूसकीचा,
प्रेमाने सहजी शिकवला.
चटके गरीबीचे साहण्या,
स्वानुभवातून दाखवला.

आली भरल्या खानदानातून,
होती लक्ष्मी धनसंपत्तीची.
झाली लंकेची पार्वती संसारी
तमा न कुठल्या आपत्तीची.

दीनदुबळ्यांची केली सेवा,
पशूपक्ष्यांच्यावर केली माया
माणुसकी पुढे जातीयतेला,
सज्ज सदैव दूर फेकाया.

करुणावतार तर कधी करारी,
शिकवले पोहण्या शामला.
जरी दिले फटके पाठीवरती,
हात तेलाचा प्रेमाने लावला.

मुक्या कळ्या तोडण्या मनाई,
संदेश काळजाला भिडला.
स्मरणात सदैव राही माझ्या
प्रेरणाज्योतीसम जवळ दिसला.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 21 April 2020

अलक (फेसबुक पोस्ट )

अलक

" अगं,तुझं काय चाललयं हे ?" रमेशच्या अशा बोलण्याने राधा चमलीच."रोज नवीन थिम घेऊन फेसबुकवर फोटो सेन्ड करते आहेस,जरा त्या घरापासून लांब राहून ड्यूटी बजावणाऱ्या डॉ. पोलीस, नर्सेस यांच्या मनाचा जरा विचार तरी कर."
राधाचा चेहरा खर्रकन उतरला.आपली चूक तिच्या लक्षात आली. डोळ्यात अश्रू ओघळले.....कुणासाठी?का ?....

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

शायरी (कश्मकश )

उपक्रम

शायरी

विषय- कश्मकश

जिंदगी में कश्मकश तो होती ही है।
अधुरा जीवन है इसके बिना
ऐसे ही चली गर आरामसे यारों
उकता जाओगे यह तो बजती बिना

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

अलक (श्रुती )

अलक

श्रुती

गतीमंद श्रुती बोलताना अस्पष्ट उच्चार काढत म्हणाली," मॅलम,मी पण नातणार गॅदलींगमध्ये." मी अवाक,निरुत्तर.. पण तिच्या डोळ्यातील ठामपणा गप बसू देईना. बाकीच्यांना समजावलं व घेतलं डान्समध्ये."आता आमचा डान्स पडणार " बाकीच्यांची नाराजी. समजावले," नाही पडणार, उलट सगळ्यांना आवडणार" सराव झाला. न घाबरता श्रुतीला डान्स करताना व प्रोत्साहन देणाऱ्यांचा आरडाओरडा,तिचे ते माझ्याकडे पाहणे...  नकळत डोळ्याच्या पाणावल्या...

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

अलक (ती )

अलक

ती

ती...रस्त्यावर बेवारस फीरत होती.कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. भाषा कळत नव्हती." मुलं,मुली नाहीत का ? "उत्तर आले,"आहेत , तिकडे गावाकडे .चांगले मीळवतात." "जाणार का तिकडे" उत्तराच्या ऐवजी उदासीनता दिसली." निदान वृद्धाश्रमात तरी सोडते!! " तिच्या चेहऱ्यावर अविश्वास, जणू सांगत होता ," या जगात विश्वास तरी कुणावर ठेऊ ?" मी निरुत्तर...

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

अलक

अलक

तो आठ दिवस शिंकत होता.खोकत होता." मला काही होत नाही " समजूत घालत होता.नेहमी पॉझिटिव्ह रहा म्हणणारा .याच शब्दाला भीत होता.अखेर अहवाल आला....आणि.... त्याने शेवटचा श्वास घेतला....

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

लेख (लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम)

लॉकडाऊन चा सकारात्मक परिणाम

कधी वाटले नव्हते की हे जीव तोडून धावणारे जग असे अचानक थांबेल.लाखो करोडोंची रक्कम देऊनही कुणी राजी झाले नसते.सारे पर्यावरणवादी, सरकार ओरडून सांगत होते की,ग्लोबल वार्मिंग ,ओझोनच्या थराला पडत असलेले छिद्र, वाढते हवा,ध्वनी,जल प्रदूषण, नद्यांची झालेली गटारगंगा, पिवळा पडत चाललेला ताजमहाल, शहरीकरणामुळे, रस्तारुंदीकरणामुळे होत चाललेली वृक्षतोड. दिल्लीतील पसरलेले धुलीकण,अशा कीतीतरी प्रश्न आ वासून उभे होते.पण या सगळ्यांकडे जाणूनबुजून सारे दुर्लक्ष करत होते.म्हणतात ना निसर्ग आपला समतोल आपणच राखतो.तेंव्हा मात्र हा विज्ञानवादी मानव अगदी हतबल होऊन जातो.लाचार होतो.हे आपण 2019 च्या प्रलयंकारी महापुरात पाहिले आहे. त्यातून अजून सावरत नाही तोपर्यंत हा कोरोना विषाणू आज आपली झोप उडवत आहे.चीनमध्ये हा विषाणू पसरला आहे,असे म्हणता म्हणता तो साऱ्या विश्वात पोहचलासुद्धा....मी मी म्हणणारे सुद्धा काहीही करु न शकता असहाय्यपणे पाहण्यापलीकडे काहीच करु शकत नाहीत. कोरोना विषाणू एक जागतिक महामारी ठरला आहे.हा संसर्गामुळे वाढत असल्यामुळे शोशल डीस्टन्सिंगला पर्याय नसल्यामुळे शासनाने नाईलाजाने लॉकडाऊन हा पर्याय निवडला.

कोरोना या रोगाची महाभयंकर परीस्थिती पाहता शासनाने लाॅकडाऊन तीन दिवस म्हणत तीस एप्रिल पर्यंत तर आता तीन मे पर्यंत वाढवली आहे.जनजीवन विस्कळीत झाले.त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले.या लॉकडाऊनचे सकारात्मक व नकारात्मक दोन्ही परीणाम झाले.वाहतूक, दळणवळण बंद केले त्यामुळे रस्त्यावरची वाहनांची रहदारी कमी झाली. वाहनांच्या मधून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईड बंद झाला.परीणामी वातावरणात शांतता पसरली. वायू प्रदूषण,ध्वनी प्रदूषण यात भरपूर फरक पडला आहे.कारण प्रदूषणाला सर्वात जास्त कोण कारणीभूत असेल तर तो मानव आहे.मानवाने जिथे जिथे पाऊल ठेवले आहे तिथे तिथे प्रदूषण केले आहे.मग ते वाहणांच्या अतिवापरामुळे त्यातून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईड चे वातावरणात मिसळणे असो वा सणसमारंभात लावलेला डीजेचा कर्णकर्कश आवाज असूदे. रोजचा गोंधळ,गजबजाट असूदे .मानवच या सर्वाला कारणीभूत आहे.पण आता हे सर्व थांबल्यामुळे प्रदूषण अजिबात होत नाही. त्यामुळे वातावरण अतिशय स्वच्छ असल्याने आकाश निरभ्र दिसत आहे.कोणताही गोंगाट नसल्यामुळे कमालीची शांतता अनुभवायला मिळत आहे.पक्ष्यांचा कीलबिलाट जो गायबच झाला होता,भूतकाळात जमा झाला होता तो आता स्पष्टपणे व मोठ्या आवाजात ऐकू येत आहे.सकाळच्या प्रसन्न वातावरणात पक्ष्यांच्या कीलबिलाटाने जाग येते.त्यावेळी आमचे लहानपण आठवू लागते.अनेक ठिकाणी पशूपक्षी निवांतपणे नागरी वस्तीत फीरत आहेत.आकाशात पक्षी मुक्तपणे संचार करताना दिसतात.समुद्रकिनारी हरणांसारखे पशू निवांतपणे उड्या मारताना तर मुंबईतील सतत गजबजलेल्या समुद्र कीनारी डॉल्फीन माशांच दर्शन होत आहे.हे सर्व सकारात्मक परिणाम आहेत.

या संकटातून बाहेर पडायचे असेल तर सर्वांना घरातच थांबून रहावे लागणार आहे.सर्व लांब नोकरीस असणारी मुले,सुना आईवडिलांच्याकडे परतले आहेत.शहरीकरणामुळे गावातील जीवन अनुभवण्यास नाकारणाऱ्या लोकांना आता दुसरा पर्यायच नाही.अवास्तव गरजांशिवाय आपण जिवंतच राहू शकणार नाही हा खोटा गैरसमज आता दूर झाला आहे. मानवाच्या गरजाही कीती कमी आहेत याचाही अनुभव लोकांना येत आहे.हे जरी असले तरी याचा नाते संबंधांवरचा परिणाम चांगला व वाईट दोन्हीही होत आहेत.नोकरी व कामामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती ही सतत धावत होती.अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील मुले घरच्या लोकांपासून लांब होती.कुणाला एकमेकांची विचारपूस करायला वेळ नव्हता. पण आता सगळे एकाच छताखाली आले आहेत.एकमेकांना समजून घ्यायला भरपूर वेळ मिळाला आहे. चंगळवादी, भोगवादी संस्कृती ला आळा बसला आहे.जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे पूर्वीच्या दिवसांची आठवण व महत्त्व अधोरेखित झाले आहे.

 सदर कालावधीत पैसा व माणुसकी याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा झालाआहे.आज पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व आले आहे.कारण अशा या भयंकर परिस्थितीत एकमेकांना आधार देणे,मदत करणे गरजेचे आहे.आज पैसा असला तरी वस्तू सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. गरीब व श्रीमंत एका रेषेत आहेत.मी मोठा हा अहंभाव बऱ्यापैकी नष्ट होताना दिसत आहे.आज प्रत्येकाला एकमेकांना स्नेह, प्रेम ,आपुलकी ची गरज आहे.

या सगळ्या वातावरणात भटक्या जनावरांचे हाल मात्र अतिशय वाईट झाले आहेत. कारण मानवच घरात स्वतःला कोंडून घेतल्यामुळे सर्व  हॉटेल, रेस्टारंट बंद असल्याने भटक्या जनावरांना खायला कुठुन मिळणार ?ती अन्नाच्या शोधार्थ इकडेतिकडे भटकत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी करुन कींवा खायला देता येतील तेवढे दिले पाहिजे.

पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी यांचे सेवेसाठी असलेल्या समर्पणाबद्दलतर बोलायला शब्दच नाहीत. कारण समाजातील काही आडदांड, विकृत लोकांच्या बेबंदशाही मुळे कोरोना हा रोग पसरत जात असल्यामुळे यांना अटकाव करण्यासाठी पोलीस यंत्रणा दिवसरात्र झटत आहेत.तसेच वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी हेही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोग्यांना रोगमुक्त करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.पण काही ठिकाणी जनता त्यांना सहकार्य करत नसलेलं दिसून येते.डॉ. नर्स व पोलीसांच्यावर दगड फेकणे,त्यांना मारहाण करणे अशा मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत.ही अतिशय खेदाची बाब आहे.हे सर्व थांबले पाहिजे.या सर्व निस्वार्थीपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार आम्ही कोणत्याही शब्दात प्रकट करु शकत नाही.

फक्त आपण एवढेच करु शकतो,नव्हे जबाबदारीने केलेच पाहिजे. ते म्हणजे या रोगाला हरवण्यासाठी सर्वजण घरीच राहू व ही साखळी तोडून टाकून सशक्त व सक्षम समाज बनवण्यासाठी कटिबद्ध होऊ या.लॉकडाऊनचे नकारात्मक परीणाम समोर येण्याआधी हा काळ शक्य तितक्या लवकरच संपवण्यासाठी प्रयत्न करु.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Monday, 20 April 2020

काव्यांजली (नवलाई निसर्गाची )

उपक्रम

काव्यांजली

ऋतूरंग

नवलाई निसर्गाची

नवलाई निसर्गाची
पाहून भान हरपले 
आनंदाने हरकले
थुईथुई

आला पावसाळा
गर्दी मेघांची झाली
सर आली
पावसाची

थंडीची लाट
अंगी वाढे थरथर
काटा झरझर
उभारला

सुरु पानगळ 
उजाड बोडकी झाडे
झुकलेली माडे 
दिसतात

वसंतात फुलला
सुंदर ताटवा फुलांचा
कोवळ्या पानांचा
वृक्षराज

असे ऋतूरंग
विविध रंगात रंगले 
जन दंगले 
समाधानात 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( गाजर )

हायकू

गाजर

खावा गाजर
आहे कंदमूळ
छान समूळ

केसरी रंग
लांबलचक अंग
खाण्यात दंग

आवडे सर्वां
गाजराचा हलवा
प्रेमे बोलवा

कच्चेच खावा
जेवणा अगोदर
हे भरभर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

षडाक्षरी (जग हे कुणाचे )

स्पर्धेसाठी

फेरी क्रमांक १

विषय :- जग हे कुणाचे

काव्यप्रकार :- षडाक्षरी

शिर्षक- प्रश्न मनातला

छळतो मनाला
प्रश्न एक सदा
जग हे कुणाचे 
कुणाच्या या अदा 

प्रश्न मनातला
बाहेर येण्यास
धडपडतोय 
कविता होण्यास

जग हे कवींचे 
शब्द संपत्तीचे
मांडतात येथे
भाव आपत्तीचे

खेळ हा शब्दांचा
भाव भावनांचा 
मांडला बाजार
रोज यातनांचा

करण्या हलके 
बैचेन मनास
कवी लिहतोय 
तृप्तन्या जनास

तारेल मानवा
जग कवितेचे 
गरज व्यक्तन्या
काव्य सरितेचे

कोड क्रमांक 
LMD 114

Sunday, 19 April 2020

चारोळी (जल हेच जीवन )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - जल हेच जीवन


जल हेच जीवन सत्य आहे 
जलाशिवाय अशक्य आहे जगणे 
जपूण आणि काटकसरीने सारे
वापरु देत हेच आहे मागणे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Saturday, 18 April 2020

चारोळी (बालक )

उपक्रम

चित्रचारोळी

मृत्यूच्या या भयाण वातावरणात
परिचारिका स्वागत नवजन्माचे करते
मास्क,हातमोज्यांच्या सुरक्षिततेत
बालक प्रतिक्षेत मातेला स्मरते

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 17 April 2020

हायकू (केळी )

उपक्रम

हायकू

केळी

पौष्टिक केळी
गरज मानवाची
रोज खायाची

घड केळीचे
सुंदर दिसतात 
सजवतात

मान केळीला
मंगल प्रसंगाला
द्या प्रसादाला

करुया पूजा
सत्यनारायणाची
समाधानाची

जेवण घ्यावे
केळीच्या पानावर
सणा वापर

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

षडाक्षरी ( वैशाख वणवा )

स्पर्धेसाठी

षडाक्षरी

विषय -वैशाख वणवा

शिर्षक-काहिली जीवाची

वैशाख वणवा
काहिली जीवाची
तगमग झाली
साऱ्याच रानाची

वैशाख वणवा
पळस फुलला
सगळा अंगार
मानव भुलला

निष्पर्ण वृक्षांच्या
डहाळ्या बोडक्या
जणू वाटतात 
काटक्या मोडक्या

पालवी फुटली
फांदीला नाजूक
पोपटी हा वर्ण
दिसतो साजूक

लहान थोरांची
बाया बापड्यांची
रंक न रावांची
आग कपड्यांची

लगबग झाली
उन्हाळी कामाची
सांडगे पापड
वाळवणाची 

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 16 April 2020

हायकू ( करवंद )

हायकू

करवंद

नाजूक गोल
करवंदे असती
छान दिसती

पांढरा गर
 रसदार असतो
छान दिसतो

रान मेव्याला
म्हणती मैना काळी
दिसते जाळी

आंबट गोड
चव खूपच न्यारी
सर्वांना प्यारी 

खाऊन तृप्त
समाधानी सगळे
रुप वेगळे 

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

लेख (जागतिक पुस्तक दिन )

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त

लेख

पुस्तक माझ्या जीवनाचा सखा

 पुस्तकेच आहेत खरे मित्र
एकाकीपणा आपला घालवतात.
दु:खातसुद्धा सुखाच्या,
राजमार्गाचा रस्ता दाखवतात.

खरे आहे हे.कारण पुस्तके आपल्याला योग्य रस्ता दाखवतात.माझ्या आयुष्यात पुस्तकांना फार महत्त्व आहे. थोर साहित्यिक, मातृह्रदयी ,कवीमनाचा स्वतःच्या आईला साऱ्या जगात पोहचवणारे साने गुरुजींच्या शामची आई या पुस्तकाने माझ्या मनावर अधिराज्य केले आहे.मी कीतीतरी वेळा हे मातृप्रेमाचे महंन्मगल स्त्रोत असलेले पुस्तक वाचून काढले आहे.प्रत्येकवेळी डोळ्यात आसवांचा महापूर आलेला आहे.भावनेचा बांध फुटला आहे.या पुस्तकामुळेच माझ्या मनात गरीबांच्या बद्दल,प्राणीमात्रांबद्दल आपुलकी, सहानुभूती निर्माण झाली आहे. मीही लिहण्यास उद्युक्त झाले आहे. म्हणून पुस्तके आयुष्यात फार महत्वाची कामगिरी पार पाडतात.
माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे.तो समाजात राहतो.  समाजातील चालीरिती पाळतो. त्याला आई वडिलांच्या , पूर्वीच्या  बर्‍याच प्रथा आहेत ज्या पुस्तकांद्वारे मिळतात.पुस्तक हा समाजाचा आरसा आहे.पुस्तक साहित्याच्या एकत्रिकरणाचा एक मार्ग आहे.भारतात व भारताबाहेर अनेक साहित्य तज्ज्ञ आहेत.  इंग्रजी साहित्यात शेक्सपिअर चे मोठे योगदान आहे.  या जगप्रसिद्ध साहित्यिकांचा जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी झाला आहे, म्हणजे 23 एप्रिलला. 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.  पुस्तके आपल्याला त्यात्यावेळच्या युगाचे ज्ञान देतात.पुस्तकामुळेच आपल्याला भूतकाळाचे ज्ञान प्राप्त होते.

 गद्य, श्लोक,पद्य,बखर,कथा, कविता, कादंबरी इत्यादी अनेक प्रकारची पुस्तके आज आपल्याला पहायला मिळतात.या सर्व प्रकारच्या पुस्तकांची आज सर्वांनाच आवश्यकता आहे.पुस्तकाशिवाय आपल्याला  कशाचेही ज्ञान कसे मिळणार?अज्ञानाच्या अंध:कारामध्ये गटांगळ्या खाणारी व्यक्ती ज्ञानाच्या प्रकाशात येण्यासाठी पुस्तकाचा आधार घेते.जर आपण आपल्या आयुष्यात स्वतःचे ज्ञान वाढववायचे असेल तर,आयुष्य समृद्ध करायचे असेल, आपले जीवन विकासाच्या वाटेकडे न्यायचे असेल तर आपल्याला पुस्तके नेहमीच मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक असतात.जेव्हा आपण पुस्तके वाचतो त्यावेळी आपल्या मतांमध्ये फरक पडतो.सकारात्मक वा नकारात्मक विचारसरणी मनात आणण्यापूर्वी आपले मन रिकामे असते. पण पुस्तक वाचणानंतर आपला विचार बदलतो. पुस्तके वाचल्यास आपल्याला योग्य तो मार्ग मिळतो.पुस्तके आपल्या मेंदूला ज्ञानाचे भांडार उपलब्ध करुन देतात.आपण आयुष्य जगताना पुस्तक आपल्याला काय चांगले आणि काय वाईट आहे याबद्दल माहिती देतात पुस्तकप्रेमी नेहमीच पुस्तकावर बोलतात.आपले जीवन एक संघर्षमय जीवन आहे.पुढे काय होईल?हे आपल्यालामाहित नसते पण जेंव्हा आपल्याला या संघर्षपूर्ण जीवनात कोणत्याही समस्येचा सामना करावा लागतो, तेंव्हा त्या समस्येचपासून बचाव करण्यासाठी पुस्तके आपल्याला यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवतात. पुस्तके आपले खरे मित्र आहेत.  कारण जेव्हा आपण आनंदी असतो किंवा दु: खी असतो तेव्हा.सर्वप्रथम आपण आपल्या मित्रांना सांगतो.  आणि आपल्या मनावरचे दडपण कमी करतो.त्याच प्रकारे पुस्तके देखील आपल्याला आनंद देतात.जेंव्हा आपण दुःखात असतो तेंव्हा आपले मन खूप उदास असते. अशा वेळी आपल्या हातात एखादे चांगले पुस्तक सापडले तर ते वाचल्यानंतर आपले मन हलके होते.  एखाद्या व्यक्तीच्या मनात असणाऱ्या उदासी भावना बाहेर येतात.तो विचार करु लागतो.सारासार विचार केल्यानंतर त्याला योग्य दिशा सापडते.त्याच्या मनातील वाईट विचार बाहेर येतात. त्याच प्रकारे जेव्हा आपण दु:खी असतो तेव्हा आपण प्रसिद्ध यशस्वी लोकांच्या जीवनकथा वाचाव्यात.कारण तेंव्हाच आपल्याला कल्पना येते की या लोकांच्या जीवनात किती समस्या आल्या होत्या तरीही त्यांनी त्यांचा सतत सामना केला आणि शेवटी त्यांना यश, कीर्ती मिळाली.अशाचप्रकारे जेंव्हा जेंव्हा आपल्या मनात उदासीनता येते आणि आपण दु:खी असतो , तेंव्हा आपल्या मनात एक नवीन आशा पुस्तकांच्यामुळेच जन्माला येते आणि आपल्याला नवीन कार्य करण्यास भाग पाडते. त्याचप्रमाणे पुस्तकांच्यामुळे नेहमीच गौरवशाली जीवनाच्या महामार्गाचे दरवाजे उघडत असतात.

  पुस्तके नेहमीच योग्य मार्गदर्शन करतात. ते चांगले मार्गदर्शक आहेत.कारण आपली विवेकबुद्धी जागृत ठेवण्याचे काम पुस्तक करतात. समाजात चांगले काय आहे, काय वाईट आहे, नैतिक काय आहे, अनैतिक काय आहे हे आपल्याला पुस्तकातूनच समजू शकते. आपल्या मनात चांगल्या, वाईट भावना कधी येतात हेदेखील आपल्याला ठाऊक नसते.पुस्तके समाजभावनांचे सामाजिक आरसे असतात.जेंव्हा जेंव्हा साहित्यिक, कवी त्यांचे लेखन करतात,तेंव्हा त्यांच्या वेळेस समाजात ज्या घटना घडतात त्या सर्वांचा त्यांच्या मनावर परिणाम होत असतो.तेच त्यांच्या लेखनात येत असते. कधीकधी ते परमानंदी असतात, तर कधी विचलित होतात ते त्यांच्या मनातील विचार त्यांच्या लेखनातून प्रकट करतात.दररोज जे काही घडते ते त्यांच्या लेखनातून पुस्तकात येते. त्याच बरोबर साहित्यिकांच्या मनाचे प्रतिबिंबही पुस्तकात दिसते.जेंव्हा एखादा साहित्यिक उदास मनाने बसलेला असतो आणि त्याची प्रतिभा जागृत होते, तेव्हा दु:खद भाव त्याच्या लिखाणात येतात. आणि उदास मनाची व्यक्ती जेंव्हा ते वाचते तेंव्हा त्याला ते स्वतःचेच  दु:ख वाटते,आणि त्याला ते आवडते.त्याच्या मनाच्या भावनांचे प्रतिबिंब त्याला त्या पुस्तकात दिसते.आणि त्याला वाटते की माझेच दु:ख येथे व्यक्त केले गेले आहे.

   आयुष्यातील बर्‍याच समस्या आपल्याला त्रास देतात. जर आपणास काही सुचत नसेल तर अशावेळी जर आपण पुस्तक वाचले तर आपले मन त्या पुस्तकांच्या विचारांमध्ये भटकत राहते. खरोखरच हा योग्य मार्ग आहे.कारण यामुळे तर आपले चंचल मन स्थिर होते आणि चांगले विचार करण्यास सुरवात करते.पुस्तक वाचणे फार महत्वाचे आहे. कारण पुस्तके शेवटपर्यंत आपल्याला साथ देतात,आपल्या विचारांचे समर्थन करतात.म्हणून, प्रत्येक घरात ग्रंथालय व पुस्तकसंपत्ती असली पाहिजे.जर एखाद्यास एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचे असेल किंवा मनातील भावभावनांची आंदोलने चालली आहेत. अशावेळी पुस्तकांद्वारे आपला त्रास कमी करू शकतो. आपण बर्‍याच महान लोकांचे चरित्र पाहतो तेव्हा हे समजते की या लोकांना जीवनात पुस्तके वाचणे नेहमीच आवडत होते.त्यांनी खूप वाचनही केले आहे.अशा पुस्तकांमधून प्रेरित होऊन त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांनी स्वतःच त्यांचे जीवन एका पुस्तकात बंद केले जेणेकरुन ते वाचणाऱ्यांना,अनेक पिढ्यांमधील लोकांना प्रेरणा मिळेल.जेव्हा घरातील मोठी माणसे पुस्तके वाचतात, तेव्हा घरी असणारी छोटी मुलंही पुस्तके वाचण्यास सुरवात करतात.आजकालच्या मुलांचा बराचसा वेळ टीव्ही पाहण्यात किंवा मोबाइलवर गेम खेळण्यात घालवला जातो.त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते.संवेदनशीलता नष्ट होत आहे.ही सवय त्यांना भविष्यात त्रास देणारी आहे.शाळेत शिक्षकांना व घरात पालकांनाहीया मुलांचा त्रास होत आहे. यावर वेळीच उपाययोजना करायला हवी.पण जर मुलांना पुस्तके वाचण्याची आवड निर्माण केली तर हे सर्व हळूहळू थांबेल.कारण पुस्तके मुलांना योग्य मार्ग दाखवतात.मुलांना त्यांच्या प्रतिभेची जाणीव करुन देतात.आणि मुले अभ्यासामध्ये रस घेऊ लागतील.जेंव्हा आपण आपला,मुलांचा, घरच्यांचा वाढदिवस साजरा करतो,त्यावेळी आम्ही चॉकलेट व इतर वस्तू गिफ्ट म्हणून देतो.पण अशांवेळी जर आपण एखादे चांगले पुस्तक भेट दिले तर ती भेट नेहमीच आपल्याबरोबर राहते आणि चांगली माहिती देखील देते.माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनाही पुस्तकांची आवड होती.ते नेहमी पुस्तके वाचत असत.पुस्तकांवरील त्यांचे प्रेम पाहून सरकारने त्यांचा वाढदिवस " वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.ही चांगली गोष्ट आहे.त्यादिवशी मुलांना सर्व शाळांमध्ये वाचायला सांगितले जाते, पुस्तकांविषयी माहिती दिली जाते, लोकांना पुस्तकांचे महत्त्व सांगितले जाते. ही सर्वांसाठी प्रेरणा आहे.जेंव्हा जेंव्हा आम्हाला मोकळा वेळ मिळेल तेंव्हा आपण त्या वेळेचा उपयोग केला पाहिजे, पुस्तके वाचली पाहिजेत, आपले ज्ञान वाढविले पाहिजे.

   जागतिक पुस्तक दिनानिमित्त संपूर्ण जग हा दिवस आनंदाने साजरे करते मला आशा आहे की या पुस्तकाविषयी आपुलकी सर्वांच्या मनात रुजावी. आणि त्यांनी आपला मोकळा वेळ वाचनात घालवावा. जेणेकरून त्यांच्या मनात जे काही दुःख आहे,ते दूर होईल.हा आपला सखा नेहमी आपल्या बरोबर राहतो.सदैव प्रेरणा देत राहतो.

 लेखिका
 श्रीमती माणिक नागावे 
 कुरुंदवाड, जि. कोल्हापूर
 9881862530

Wednesday, 15 April 2020

चारोळी (भाव )

चारोळी

भाव 

भावभावनांच्या मेळ्यात
विचारांना वाट मिळावी
मोकळ्या मनाने वावरताना
समाधानाशी नाळ जुळावी

रचना
माणिक नागावे
कुरुंदवाड

चारोळी ( भाव )

चारोळी

भाव

भाव मनातल्या विचारांचे 
भाव बाजारातल्या मालाचे
भाव एकमेकांच्या मनातले
भाव काव्यातील बोलाचे 

रचना
माणिक नागावे

चारोळी ( भावी जीवन )

स्पर्धेसाठी

चारोळी

भावी जीवन

सावरण्या भावी जीवन माझे
भावनांना वेळीच बांध घातला
कर्तव्यनिष्ठा जबाबदारीने श्रमले
संस्कारी पाया मुलांचा रचला

रचना 
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (अधुरी प्रेम )

उपक्रम

चारोळी

विषय - अधुरे प्रेम

पूर्णत्वाला येता येता प्रिती
नकळतपणे कशी बिनसली 
अधुरे प्रेम अधुरी कहाणी 
हृदयी वेदना खोल सलली 

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 13 April 2020

चारोळी (विश्वरत्न बाबासाहेब )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विश्वरत्न बाबासाहेबांच्या संविधानाने
आधार दिला पददलितांना
जागृतीने संघर्षाचा दिला नारा
मानवतेचा संदेश देशवासियांना

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Sunday, 12 April 2020

लेख (कोरोना काळातील पर्यावरण )

चर्चासत्रासाठी मुद्दे 

कोरोना या रोगाची महाभयंकर परीस्थिती पाहता शासनाने लाॅकडाऊन तीस एप्रिल पर्यंत वाढवले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. साहजिकच यामुळे रस्त्यावरची वाहनांची रहदारी कमी झाल्याने वायू प्रदूषण,ध्वनी प्रदूषण यात भरपूर फरक पडला आहे.कारण प्रदूषणाला सर्वात जास्त कोण कारणीभूत असेल तर तो मानव आहे.मानवाने जिथे जिथे पाऊल ठेवले आहे तिथे तिथे प्रदूषण केले आहे.मग ते वाहणांच्या अतिवापरामुळे त्यातून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईड चे वातावरणात मिसळणे असो वा सणसमारंभात लावलेला डीजेचा कर्णकर्कश आवाज असूदे. रोजचा गोंधळ,गजबजाट असूदे .मानवच या सर्वाला कारणीभूत आहे.पण आता हे सर्व थांबल्यामुळे प्रदूषण अजिबात होत नाही. त्यामुळे वातावरणात अतिशय स्वच्छता असल्याने आकाश निरभ्र दिसत आहे.कोणताही गोंगाट नसल्यामुळे कमालीची शांतता अनुभवायला मिळत आहे.पक्ष्यांचा कीलबिलाट स्पष्टपणे व मोठ्या आवाजात ऐकू येत आहे.. पशूपक्षी निवांतपणे फीरत आहेत

या अपरिहार्य कारणांमुळे सर्वांना घरातच थांबून रहावे लागले आहे याचा नाते संबंधांवरचा परिणाम चांगला व वाईट दोन्हीही होत आहेनोकरी व कामामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती ही सतत धावत होती.अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील मुले घरच्या लोकांपासून लांब होती.कुणाला एकमेकांची विचारपूस करायला वेळ नव्हता. पण आता सगळे एकाच छताखाली आले आहेत.एकमेकांना समजून घ्यायला भरपूर वेळ मिळाला आहे. चंगळवादी, भोगवादी संस्कृती ला आळा बसला आहे.जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे पूर्वीच्या दिवसांची आठवण व महत्त्व अधोरेखित झाले आहे.

 सदर कालावधीत पैसा व माणुसकी याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे.आज पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व आले आहे.कारण अशा या भयंकर परिस्थितीत एकमेकांना आधार देणे,मदत करणे गरजेचे आहे.

या सगळ्या वातावरणात भटक्या जनावरांचे हाल मात्र अतिशय वाईट झाले आहेत. कारण मानवच घरात स्वतःला कोंडून घेतल्यामुळे सर्व  हॉटेल, रेस्टारंट बंद असल्याने भटक्या जनावरांना खायला कुठुन मिळणार ? त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढी मदत,कींवा खायला या भटक्या जनावरांना देता येतील तेवढे दिले पाहिजे.

पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी यांचे सेवेसाठी असलेल्या समर्पणाबद्दलतर बोलायला शब्दच नाहीत. कारण समाजातील काही आडदांड, विकृत लोकांच्या बेबंदशाही मुळे कोरोना हा रोग पसरत जात असल्यामुळे यांना अटकाव करण्यासाठी पोलीस यंत्रणा दिवसरात्र झटत आहेत.तसेच वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी हेही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोग्यांना रोगमुक्त करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.त्यांचे आभार आम्ही कोणत्याही शब्दात प्रकट करु शकत नाही.या रोगाला हरवण्यासाठी सर्वजण घरीच राहू व ही साखळी तोडून टाकून सशक्त व सक्षम समाज बनवण्यासाठी कटिबद्ध होऊ या.

श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर
9881862530

कविता (मनीमाऊ )

काव्यस्पंदन राज्यस्तरीय समूह आयोजित महास्पर्धा

तृतीय फेरीसाठी

बडबडगीत

विषय- दुधावरची साय

शिर्षक-- मनीमाऊ

मनीमाऊ मनीमाऊ हवा का खाऊ
दुधावरची साय आणायला जाऊ

लपत छपत फीरतेस घरात
दिसतोय का उंदीर बिळात ? 

अंग कीती मऊ मऊ छान
गुबगुबीत आहे तुझी मान

डोळे इवले इवले घारे घारे
लुकलुक पाहून आनंदी पोरे

लालचुटुक नाक गारगार
मला तर आवडते फार फार

वाघाची मावशी म्हणती तुला
मिशा तुझ्या टोचतात मला 

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 11 April 2020

चारोळी ( क्रांतिसूर्य जोतिबा )

उपक्रम

चारोळी

क्रांतिसूर्य जोतिबा

स्त्री-शिक्षणाचा रचून पाया
जगी वंद्य क्रांतिसूर्य जोतिबा
सावित्री माता तयांची सावली 
डंका द्वयींचा अजूनी दबदबा 

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( सत्यशोधक )

चारोळी

सत्यशोधक

करुन सत्याचा पाठपुरावा
सत्यशोधक लढले समाजात
ज्योतिबा, सावित्री दैवत महान
क्रांती केली सनातनी समाजात

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर

चारोळी ( दुष्काळ )

उपक्रम 

चारोळी

दुष्काळ

दुष्काळाचे सावट डोक्यावर
पोशिंदा उभा भेगाळल्या भुईवर
काठी आधाराला कर कपाळी
अंगी बंडी फडके रक्षण्या डोईवर

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( घरटे )

उपक्रम

हायकू

घरटे

बेट बांबूचे
उंचच टोकावर
खूप सुंदर

घरटे छान
निवांत बसे पक्षी
नाजूक नक्षी 

तांबूस रंग
टोकदार शेपूट
नाते अतूट

निरागसता
डोळ्यातून स्रवते
मनी भावते

चोच बारीक
धारदार वाटते
भीती दाटते

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 10 April 2020

चारोळी (समाजसेवा )

चारोळी

समाजसेवा

व्रत हे निस्वार्थीपणे करण्याचे 
आत्मसुख मन:शांतीसाठी 
नसतो गाजावाजा ना स्पर्धा 
लढणे असते दु:खीतांसाठी

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 9 April 2020

चारोळी ( पतिव्रता )

चारोळी

पतिव्रता

कोणते आहेत नियम कळेना
पतिव्रता सिद्ध करण्यासाठी
लावलीय फुटपट्टी प्रत्येकाने 
आपापल्या स्वार्थासाठी

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी( निशब्द )

चारोळी

निशब्द

निशब्द आज चराचर पाहून
अवगत झाली प्रकृतीची किमया 
शब्द खोटे अभिमान खोटा
दंभ मानवाचा खुडला लिलया

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 8 April 2020

चारोळी ( निशब्द )

चारोळी

निशब्द

निशब्द झाली मानवजात 
विज्ञानालाच पडलाय घोर
कवडीमोल सारे निसर्गासमोर 
विषाणूच ठरलाय आता शिरजोर 

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता, अष्टाक्षरी ( दोन शब्द )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

विषय - दोन शब्द

शिर्षक- भाव मनातले

दोन शब्द आज ऐका,
सांगतात सद्यस्थिती.
भाव मनातले माझ्या,
स्पष्टतात परीस्थिती.

बंद सारे कामकाज,
घरातच कर्मचारी.
दोन शब्द मांडताना,
स्वतःचीच वर्गवारी.

समजली मानवाला,
निसर्गाची कोपावस्था.
सावरता सावरेना,
कुटुंबाची दुरावस्था.

हाव केंव्हाच संपली,
अकारण गरजांची.
समाधान मनी आले,
विण पाहता नात्यांची.

शब्दातून बरसल्या,
विचारांच्या भावकळा.
सावरुन एकमेकां,
घालवूया अवकळा.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता (मला पडलेला प्रश्न )

उपक्रम

काव्यलेखन

विषय-- मला पडलेला प्रश्न


वावरती अजूनही बिनघोर,
 हे समाजकंटक समाजात.
प्रश्न मला पडला खरोखर,
भिती दाटली काळजात.

असता संचारबंदी कडक,
तोडून निर्बंध मस्तवालपणे.
वावरतात जणू तो वळू,
करावी कारवाई कठोरपणे.

सांगता वाजवायला टाळी,
घुसखोरांसारखा झाला दंगा.
नव्हते माहीत अडाण्यांना,
घेताहेत ते कुणाशी पंगा.

दिपक लावण्यावरुनही चर्चा, 
घनघोर वादविवादात जनता.
करुन कानाडोळा हेतुपुरस्सर, 
दिसली कुचकामी महानता.

पसरतो संसर्ग सानिध्याने,
जाणूनही हरताळ फासला.
का वाढवतात ही मुर्ख माणसे
मनातला प्रश्न मनातच राहिला

कधी होतील शहाणे बांधव,
काय शिकवणार मुलांना ?
स्थिरता नसेल तुमच्या अंगी,
आदर्श कुणाचा चिमुकल्यांना?

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

मुलाखत (माझा परिचय )

माझा थोडक्यात परिचय


*१) आपले संपूर्ण नाव*

श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे

*२)आपले गाव,शहर याविषयी ....... काही विशेष असल्यास त्याबद्दल थोडक्यात......*

रा.कुरुंदवाड, 
सध्या- जयसिंगपूर, 
ता. शिरोळ,जिल्हा. कोल्हापूर
कुरुंदवाड ला संस्थानकालीन कृष्णा घाट आहे.अतिशय सुंदर परीसर आहे.या घाटावर साने गुरुजींनी भाषण केले होते.महात्मा गांधीजींच्या रक्षेचे विसर्जन येथे केले आहे.दरवर्षी बारा फेब्रुवारी ला इथे त्या स्मरणार्थ कार्यक्रम घेतला जातो.तसे इथे प्राचीन संस्थानकालीन विष्णुमंदीर आहे.कोरीव काम अप्रतिम आहे. कुरुंदवाड गावची बासुंदी खवा पेढे व कृष्णाकाठची वांगी प्रसिद्ध आहेत. सर्कशीचे जनक पं. विष्णुपंत मोरेश्वर छत्रे साहेब,शास्त्रीय संगीतकार पं.विष्णु दिगंबर पलुसकर यांचा जन्म कुरुंदवाडला झाला. राष्ट्र सेवादलाचे क्रियाशिल केंद्र.

*३) साहित्य लेखनात आपण केव्हापासून आलात?*

साहित्य लेखनात तीस वर्षापूर्वी हायस्कूलमध्ये असतानाच झाली.

*४)साहित्य क्षेत्रात आपण कसे आलात आणि याची आवड कशी निर्माण झाली?*

राष्ट्र सेवादलाच्या विचाराने चालणारे आमचे वडील होते.त्यामुळे अनेक विचारवंत बौद्धिक घ्यायला यायचे. आमच्या घरीही ते जेवायला, वस्तीला असायचे.तेंव्हा त्यांच्या संपर्कात आल्यामुळे व त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मला वाचनाची आवड लागली.शिवाय माझे वडील लेख , कविता लिहायचे ते पाहून मलाही प्रेरणा मिळत असे.मीही शाळेतील वक्तृत्व व निबंध स्पर्धेत भाग घ्यायची व वाचून स्वतः भाषण ,निबंध तयार करायची व स्पर्धेत भाग घ्यायची.कॉलेजमध्ये असताना भित्तिपत्रकामध्ये, मासिकामध्ये लिहायला सुरवात केली,ती आजतागायत.

*५)आपले काही साहित्य प्रकाशित झाले आहे का?असल्यास त्याबद्दल थोडक्यात.....*

माझा एक कवितासंग्रह-
            भावतरंग
दोन चरीत्र संग्रह--
1) समतेचे पुजारी- एस.एम.
                               जोशी
2) चारीत्र्य चक्रवर्ती- शांतिसागर महाराज   

शिवाय विविध मासिकामध्ये, दिवाळी अंकांमध्ये, वृत्तपत्रात
विविध विषयांवर लेख,कथा, कविता ,समीक्षणं प्रकाशित झाले आहेत.
           

*६)साहित्य लेखनात आवडता काव्यप्रकार कोणता?*

साहित्य लेखनात आवडता प्रकार कविता, चारोळ्या लिहणे हा आवडता प्रकार आहे.

*७)आपली सर्वात आवडती रचना कोणती आणि ती आपण येथे पाठवावी*

माझी सर्वात आवडती रचना 
" सय माहेराची " ही अष्टाक्षरी रचना होय.

विषय - सय माहेराची

सय माहेराची येता ,
जीव कासावीस होतो.
माय माझी बोलावते,
गांव मज आठवतो.

जन्म घेतला ऊदरी,
पांग कसे फेडायाचे.
ऋण नाही फिटणारं
कीती जन्म घालायाचे?

प्रेम माझ्या भावंडाचे ,
डोळा आणतयं पाणी .
सय माहेराची येता ,
ओठी स्फुरतात गाणी .

बाबा माझे मुर्तीमंत 
रुप देवाचे दिसते .
नमस्कार चरणी या ,
आशीर्वाद सदा घेते .

सय माहेराची माझ्या ,
आहे सोबतच माझ्या .
साद घालते आईला ,
म्हणे अंतरीच तुझ्या .

कीती आठवू तुम्हाला ,
मन नाही हो भरत .
पाण्यावीण मासा जगी ,
नाही मला हो स्मरत .

अशी सय माहेराची ,
सर्व लेकींनाच येते .
गेली नाही आईकडे ,
तरी मनानेच जाते.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापू

*८)साहित्य क्षेत्रातील आपले आदर्श कोणते?त्यांच्याबद्दल थोडक्यात.....*

साहित्य क्षेत्रातील माझे आदर्श म्हणजे साने गुरुजी, सुधा मुर्ती आहेत.

साने गुरुजींनी शामची आई या पुस्तकातून आपल्या आईला उच्च स्थानी नेऊन ठेवले.व सर्व जगाला दाखवून दिले की आई- संस्काराची खाण कशी असते.फक्त आणि फक्त आईमुळेच ते कसे घडले हे साऱ्या जगाला दाखवून दिले.आज अजूनही साऱ्या जगात साने गुरुजींचे शामची आई हे पुस्तक प्रसिद्ध आहे. विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे.चित्रपट ही निघाला आहे.कीतीही कठोर  हृदयाचा माणूस असला तरीही तो हे पुस्तक वाचताना रडलाच पाहिजे. एवढी ताकत साने गुरुजींच्या लेखणीत आहे.साने गुरुजींची धडपडणारी मुले,मोरी गाय,कथा दारुबंदीच्या,इ. अनेक प्रकारचे लेखन मनाला भावते,भिडते.

सुधा मुर्तींचे वाईज अदरवाईज,हरवलेल्या मंदिराचे रहस्य,महाश्वेता इ.साहित्य प्रसिद्ध आहे. या लेखिका काल्पनिक न लिहता आयुष्यात घडलेल्या घटनांचे वर्णन आपल्या लेखनात करतात.त्यामुळे वाचताना ते मनात घर करतात.

साने गुरुजी व सुधा मुर्ती यांचा साधेपणा,सच्चेपणा, व वैचारीक प्रगल्भता मला आवडते.


*९)भविष्यात आपणास कोणकोणते काव्यप्रकार  शिकायला आवडतील?*

भविष्यात मला गझल हा प्रकार शिकायला खूप आवडेल.

*१०) अव्यक्त अबोली साहित्य परिवराबद्दल आपले थोडक्यात मत व्यक्त करा?*

अव्यक्त अबोली या साहित्य समुहात साहित्यातील अनेक प्रकार हाताळले जातात. नवोदितांना प्रोत्साहन मिळते.आपल्या कल्पना शक्तीला इथे फार मोठा वाव आहे.विशेष म्हणजे इथे वाद होत नाहीत. सर्वांशी सलोख्याने वागले,व वागवले जाते.मी कुणीतरी आहे, माझेच सर्वांनी ऐकायला पाहिजे ही भुमिका नसते.

*११) आपल्या समूहात असलेल्या अडचणी,कमी,चुका कोणत्या?किंवा कोणते नवे बदल आपणास आवश्यक वाटतात......*

अडचणी,कमी,चुका काही नाहीत.
नवीन बदल म्हणजे गझलेसंबंधी एक ऑनलाइन कार्यशाळा घ्यावी.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. ता.शिरोळ,जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Tuesday, 7 April 2020

समीक्षण ( मनुदांच्या कथा)

लेखक मनोहर भोसले यांच्या मनुदांच्या कथा या पुस्तकाचे केलेले परीक्षण

दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक सुखदुःखाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. कालांतराने आपण ते विसरूनही जातो. काही घटना अशा असतात की त्या आपल्या कायम स्मरणात राहतात. ज्यांचा पिंडच साहित्यिकाचा असतो ते आपले प्रसंग शब्दरुप करुन चिरंतन ठेवतात. असाच विचार करून लेखक मनोहर भोसले यांनी त्यांच्या "मनुदांच्या कथा" या पुस्तकात त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगाचे अतिशय सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे. सर्वांना समजेल अशा ओघवत्या भाषेमध्ये त्यांनी लेखन केले आहे. पात्रानुरुप भाषा,  त्यांचे आपापसातील  संवाद, गोष्टीतील वर्णनात्मक भाषा वाचताना ते प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.व ती गोष्ट अनुभवतो आहोत असा भास होतो.एकुण पंधरा कथा या पुस्तकात आहेत.आयुष्यभर निस्वार्थी सेवा करणाऱ्या शिक्षकाची शेवटी कशी वाईट परीस्थिती होते हे "चहा आणि बिस्किटे" या कथेतून मांडत असतानाच संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते हा मोलाचा संदेश देणाऱ्या मास्तरीणबाईंना छान शब्दबद्ध केले आहे.शेवट मनाला चटका लावून जातो.कारण लेखक शेवटी लिहतात की मी प्रत्येकवेळी बिस्कीट पुडा घेऊन जातो पण आता मला चहा मिळत नाही.

व्यक्ती तितक्या प्रकृती असतात.कुणाच्या जीवनात कधी कलाटणी मिळेल सांगता येत नाही. मनात ठरवले की कोणतीही गोष्ट साध्य होते हे "गणपती बाप्पा" या कथेतून छान मांडल आहे. "मेजर साहेब "कथेतून सहनशीलतेचा अंत बघू नये हे मेजरसाहेबांच्या उदाहरणावरून त्यांनी छान व्यक्त केले आहे. आजही तृतीयपंथीयांच्याकडे एका विचित्र नजरेने पाहिलं जातं. त्यांची हेटाळणी केली जाते.  पण या लोकांच्यातही एक संवेदनशील मन असते व तेही एखादं चांगलं काम करू शकतात हे "होय, मी देव पाहिलाय"  या कथेतून आपल्याला पाहायला मिळते. सीमेवर रात्रंदिवस लढणाऱ्या जवानांची मनस्थिती व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनस्थितीचे वर्णन व जवानांच्या पत्नींना आयुष्यभर वाट पाहणेच कसे नशिबी येते याचे सुंदर वर्णन " अविस्मरणीय दिवाळी" या कथेमध्ये केले आहे. लहान मुलांची मने किती निरागस असतात. योग्य त्या पद्धतीने पटवून सांगितले तर त्यांच्या बालमनाला ते किती सहज पटते व आपल्या हातून एखादे चांगले कार्य सहज घडून जाते याचे वर्णन" अजब आहे ना...?" या कथेतून केले आहे.समाजामध्ये काही असे लोक असतात की जे फक्त देवाचे नाव घेतात पण त्यांची कृती मात्र त्याच्या विरोधी असते. माळकऱ्यांच्या पंक्तीत बसलेल्या माणसाला तिथून उठवले जाते. उठल्यानंतर त्याचा अपमान होतो. त्याचा स्वाभिमान जागा होतो. तो रागाने न जेवताच निघून जातो हे जेव्हा कीर्तनकारांना समजते याबद्दल ते लोकांना खडे बोल सुनावतात. फक्त भजन कीर्तन करून काहीच उपयोग नाही. देव हा भावाचा भुकेलेला आहे हे लोकांना पटवून सांगतात." हरी मुखे म्हणा...."  या कथेतून हाच विचार लेखकाने मांडला आहे.तसेच"माळकरी झाला धन्या" या कथेत मानवी मनाच्या निग्रहाचे उदाहरण खूप छान पद्धतीने रेखाटले आहे.दारु पिणारा धन्या जेंव्हा मनोनिग्रहाने दारु सोडतो,तेंव्हा लोकं त्याची खूप चेष्टा करतात.त्याला अमिष दाखवले जाते ,पण निग्रह कसा तडीस जातो याचे प्रत्यंतर या कथेतून येते."महापूर" या  कथेतून जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी जे खरे गरजू असतात अशा लोकांना मदत मिळत नाही.पण ते लोक आपले जीवन विनातक्रार जगत असतात. वर्तमान पत्रकातील बातम्यांचे कात्रण लेखकांनी ठेवलेले आहे व महापुरानंतर जेव्हा ते त्या व्यक्तींना भेटतात त्यांचे फोटो त्यांना दाखवतात तेंव्हा लोकांना किती आनंद होतो याची मोजदादच नसते. समाजात चांगले आणि वाईट असे दोन्ही लोक राहत असतात. पण गरिबीतही सुख शोधणारे कमीच असतात. स्वतः गरीब असून सुद्धा हरवलेले पैशाचे पाकीट जेव्हा एखादी व्यक्ती परत देते व मी फार सुखी आहे असे म्हणते.तेंव्हा माणुसकी आपल्याला जवळून पाहायला मिळते. अशा एका घटनेचे वर्णन" माणुसकीच्या जातीचा" या कथेत लेखकाने केले आहे. झाडांच्या पासून आपल्याला ऑक्सिजन मिळते. म्हणून झाडांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. पण हे जतन करताना लोकांना कोणत्या पद्धतीने समजावून सांगितले पाहिजे म्हणजे लोकांना पटेल हे सखाराम वॉचमन, फुकट  ऑक्सिजनसाठी प्रयत्न करणारा माणूस या कथेत लेखकाने सांगितले आहे. शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातले स्थान नेहमीच प्रेरणादायी ठरत असते. जेव्हा आपला एखादा विद्यार्थी मोठ्या पदावर पोहचतो, तेव्हा शिक्षकांना खूप आनंद होत असतो. जेव्हा एखादा विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटायला जातो तेव्हा त्या शिक्षकाच्या घरची परिस्थिती पाहिल्यानंतर शिक्षक किती निस्वार्थीपणे काम करत होते हे लक्षात येते. पण गुरुजींचा अंत झाल्यामुळे त्याला त्यांचा आशीर्वाद मिळत नाही. याचे त्याला खूप दुःख होते. पण जाताजाता उतराई म्हणून चेक त्यांच्या घरी देऊन येतो. पण बाहेर आल्यानंतर त्याला आपल्या भावनांचा बांध आवरता येत नाही.मानवजातीचे भाव भावनिक शब्दांमध्ये लेखकाने व्यक्त केले आहे. समाजात अनेक प्रकारची माणसे आपल्याला भेटत असतात." पश्चाताप आणि माफी"  या कथेत लेखकाने एका गरीब पालकाचे वर्णन केलेले आहे. आपल्या मुलाच्या वाचनाची आवड लक्षात घेऊन, परिस्थिती नाही हे लक्षात आल्यामुळे आपल्या मुलाच्या वाचनाची आवड पूर्ण करण्याकरता दुकानाच्या मालकाने लेखकाच्या बॅगेतील पुस्तक न सांगता घेतले. पण शेवटी त्याला पश्चाताप होतो व तो माफी मागतो,  तेव्हा लेखकाने त्याला मोठ्या मनाने त्याला माफ केले.हा प्रसंग ही छान रेखाटला आहे . भ्रष्ट आचरण करनारे लोक लाच घेऊन काम करतात.फण ते त्यांना ते सुफळ जात नाही.  अतिशय काटकसरीने व कष्टाने जो जीवन व्यतीत करतो, त्याला जीवनामध्ये पैसा जरी कमी मिळत असला तरी त्याला आत्मिक समाधान मिळते. हे   "पिसाळसाहेब  " या कथेतून लेखकाने वाचकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे."मला कृतज्ञ व्हायचं आहे"  या कथेतून आपल्या मुलीच्या ऑपरेशन साठी एक आई  आपली किडनी विकायला निघते. व ही बातमी जेव्हा पेपरमध्ये येते त्यावेळी संवेदनशील मनाचे लेखक यांना काहीतरी करावेसे वाटते, त्या मुलीला मदत करावीशी वाटते. म्हणून ते त्यांच्या एका ओळखीच्या गृहस्थाकडे जातात,ऑपरेशन बद्दल सांगतात. ते गृहस्थ तातडीने मदत द्यायला तयार होतात. दवाखान्यात गेल्यानंतर जेव्हा लेखक त्या मुलीला विचारतात की शाळा शिकून तू कोण होणार आहेस?तेंव्हा त्या मुलीने दिलेले उत्तर अतिशय मार्मिक आहे.ती मुलगी म्हणते,मला कृतज्ञ व्हायचे आहे. हे वाचून नकळत डोळ्याच्या कडा ओलावतात. त्या मुलीचे ऑपरेशन होते.ऑपरेशन झाल्यानंतर त्या मुलीने लेखकाला कृतज्ञता व्यक्त करण्याकरता पत्र लिहिते व आपल्या भावना व्यक्त करते. हा प्रसंग मनाला खूप भावला.खरंच अजून अशी माणसे समाजामध्ये आहेत म्हणून तर हा समाज आपला समतोल टिकवून आहे.

एकुणच लेखकाने समाजातील भावभावनांचे प्रतिबिंब आपल्या कथासंग्रहात दाखवले आहे.रोजच्याच घटना असल्या तरी आपण त्याकडे आपण कशा पद्धतीने पाहतो याला महत्त्व आहे.एक साहित्यिकच हे करु शकतो.एका बैठकीत हे पुस्तक वाचून होते.मुखपृष्ठावर लेखकाचे त्यांच्या पुस्तकसंग्रहाबरोबरचा फोटो लेखकाचे साहित्य प्रेम दाखवून जातो.मलपृष्ठावर  प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार यांचे या कथासंग्रहबद्दलचे मत वाचता लेखकाची उंची आपल्याला समजून येते.

  प्रकाशक माननीय दादासाहेब जगदाळे, तेजश्री प्रकाशन यांनी हे पुस्तक  मजबूत बायडींग व छपाई व कागदाचा चांगला दर्जा वापरून पुस्तकाला देखणे केले आहे.वाचकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल,अशी आशा बाळगून  लेखकाच्या भावी लेखन कार्यास, साहित्य प्रवासास मनःपूर्वक शुभेच्छा देते.

समिक्षक
श्रीमती माणिक नागावे
साहित्यिक, समिक्षक,शिक्षिका
सुपरवायजर,साने गुरुजी विद्यालय,
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

Monday, 6 April 2020

चारोळी ( स्वप्नात तू येतेस जेंव्हा )

चारोळी

स्वप्नात तू येतेस जेव्हा
कवटाळून बसतो मी तिला
नकळत सरकते जवळ मग
विसरून जातो मीच मला

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( वाढदिवस )

चारोळी

प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुरारोग्याची मनी कामना 
वर्धिष्णू आयुष्य भरभराटीचे 
यशच दिसू दे आमच्या नयना

रचना
श्रीमती माणिक नागावे

चारोळी ( व्यक्त )

चारोळी

व्यक्त

अधीर मन तडफडते 
व्यक्त होण्या संधी शोधते
मिळता शब्द प्रकट होण्या
समाधानाने भरुन पावते

रचना
माणिक नागावे

हिंदी लेख (विश्व किताब दिन )

विश्व किताब दिन

मनुष्य एक सामाजिक प्राणी है। वह समाज में रहता है। समाज के रीति-रिवाजों को मानता है। पुरखों से चली आ रही अनेक रीति रिवाज है जो किताबों के माध्यम से अवगत होते हैं। किताब समाज का आईना है। किताब साहित्य का एक प्रकार है। अनेक साहित्यिक माहिर होते हैं। जैसे कि अंग्रेजी साहित्य में सेक्सपियर का बड़ा योगदान रहा है।  विश्व विख्यात साहित्यकार का जन्म और मृत्यु एक ही है वह है 23 अप्रैल। 23अप्रैल विश्व किताब दिन के तौर पर पूरे विश्वा में मनाया जाता है। किताब हमें तत्कालीन युग का ज्ञान देते हैं।किताब के कारण ही हमें भूतकाल का ज्ञान होता है।

कीताबोंके अनेक प्रकार होते हैं।गद्य,पद्य,खंड बखर,इ.।आज हमें इन सभी कीताबोंकी बहुत जरुरत हैं।  किताब के बिना हमें किसी भी चीज का ज्ञान नहीं होता। अज्ञान के अंध:कार में गोते खाते हुए व्यक्ति को किताब ही ज्ञान के प्रकाश में ले जाते हैं। अगर हमें अपने जीवन में विकास करना है। जीवन समृद्ध बनाना है। अपने जीवन मार्ग को विकास मार्ग की तरफ ले जाने के लिए किताबों की जरूरत हमेशा पड़ती है। कोई भी विचारधारा को अपने मन में लाने से पहले जब हमारा मन रिक्त होता है। किसी भी चीज की हमें मालूमात नहीं होती अब हमारा मस्तक भी खाली ही रहता है। ऐसे समय में जिस चीज की हमें मालूमात कर लेनी चाहिए अगर उसके बारे में हम पढ़ते हैं तो वह हमारे दिमाग को भी ज्ञान का भंडार सौंप देते हैं। जिंदगी जीते समय जीवन बिताते है तब क्या अच्छा है क्या बुरा है इसकी जानकारी भी हमें किताब ही देते हैं। किताबप्रेमी किताब से हमेशा बात करते हैं। हमारा जीवन संघर्षमय जीवन है। आगे क्या होगा पता नहीं चलता। लेकिन जब हमें इस संघर्षमय जीवन में अगर कोई समस्या आती तो उस समस्या से परे रहने के लिए किताबही हमें यशस्वी जीवन का रास्ता दिखाते हैं। किताब  हमारे सच्चे मित्र होते हैं। क्योंकि जब हमें आनंद होता है,या दुख होता है। तो सबसे से पहले हम अपने मित्रों को बताते हैं। और अपने मन का भार हल्का कर देते हैं। ठीक उसी तरह किताब भी हमें सुख ,आनंद देते हैं। जब हम कभी दुखी होकर जीवन - यापन करने लगते हैं, तब हमारा मन बहुत ही उदास हो जाता है। ऐसे समय में अगर हमारे हाथ में कोई अच्छी किताब लगती है तो उसे पढ़ने के बाद मन हल्का हो जाता है। व्यक्ति के मन में जो उदासीनता की भावनाएं होती है वह निकल जाती है। वह विचार करने पर बाध्य होता है। जो बुरे विचार होते हैं वह निकल जाते हैं। उसी तरह जब हम दुखी होते हैं तब यशस्वी व्यक्तियों का जीवन चरित्र हम पढ़ते हैं, तब हमें यह पतख चलता हैं की इन व्यक्तीयों के जीवन में कितनी समस्याएं आई फीर भी वे उनका डटकर सामना करते रहे और आखिरकार उन्हे यश मिला यह हमें ज्ञात होता है और हमारे मन पर आई हुई उदासी जाती है और हम जो दुखी मन से बैठे होते हैं ,एक नई आशा हमारे मन में पैदा होती है और हम नया काम करने के लिए बाध्य हो उठते हैं। इसी तरह किताब हमें यशस्वी जीवन के राजमार्ग का दरवाजा खुला कर देते हैं।

 किताब हमेशा हमें सही मार्गदर्शन करते हैं। अच्छे मार्गदर्शक हैं। क्योंकि हमारी विवेक बुद्धि को जागृत रखने का काम किताब ही करती है। समाज में क्या अच्छा है, क्या बुरा है, क्या नैतिक है, क्या अनैतिक है यह सब हम किताब के द्वारा ही समझ सकते हैं। अच्छे भाव हमारे मन में कब आते हैं इसका पता भी हमें नहीं चलता। किताब अपना, समाजका आईना होते है। साहित्यिक, कवि जब भी अपना लेखन करते हैं तब उनके मन में समाज में जो आए दिन घटनाएं घटती हैं, इन सब का उनके मन पर प्रभाव होता है । वे कभी आनंदित होते हैं,तो कभी व्याकुल हो उठते हैं।अपने मन के विचार वे अपनी लेखनी द्वारा कागज पर प्रकट करते हैं। हररोज जो घटता है वही किताब में आता है। साथ ही साथ साहित्यिकके मन का प्रतिबिंब भी किताब में दिखाई देता है। जब कोई साहित्यिक उदास मन से बैठा हुआ होता है और उसकी प्रतिभा जागृत होती है तो लेखन उदास की भाव में लिखता है। और वही अगर किसी उदास मन का व्यक्ति उसे पढ़ता है तो उसे वह अपना ही दुख लगता है। और वह उसे अच्छा लगता है । उसके मन के भाव का प्रतिबिंब उसे उस किताब में दिखाई देता है। और उसे लगता है कि यह तो मेरा ही दुख यहां पर प्रकट किया हुआ है।

  जीवन में अनेक सारी समस्याएं हमें सताती है। कुछ सुझता नहीं तब अगर हम किताब पढ़ते हैं तो हमारा मन उन कीताब के विचारों में घूमता रहता होता है।मन को हलका करने का काम कीताब करती हैं। यह एक सही रास्ता है। और चंचल मन स्थिर होकर अच्छे विचार करने लगता है। किताब को पढ़ना अति आवश्यक है। पुस्तक हमेशा की तरह अंत तक हमारा साथ देते हैं। इसलिए हर एक घर में ग्रंथ संपदा होनी चाहिए। कोई किसी चीज की जानकारी कर लेनी है या कोई दुखी होते हैं तब हम इन किताबों के द्वारा जान लेते हैं ये हमारा दुख कम कर सकते हैं। अनेक महान व्यक्तियों का चरित्र जब हम देखते हैं  तो यह बात समझ में आती है कि इन लोगों को जीवन में हमेशा किताबों को पढ़ना ही उन्हें अच्छा लगता था। किताबों से प्रेरित होकर ही उन्होंने अच्छा काम किया। और खुद भी उन्होंने अपना जीवनचरित्र एक किताब में बंद कर दिया ताकि उन्हें पढ़कर आने वाली पीढ़ियों के लोग उन्हें पढ़कर प्रेरित हो जाए। जब बड़े लोग किताब पढ़ते हैं तो घर में जो छोटे-छोटे बच्चे होते हैं वह भी किताब पढ़ने लगेंगे। उनका सारा समय टीवी देखने में,या मोबाइल पर खेलने में व्यतीत होता है। इससे उनका नुकसान ही होता है यह सब बंद हो जाएगा। किताब बच्चों को सही मार्ग दिखाएंगे। बच्चों की प्रतिभा को जागरूक करेंगे। और बच्चे पढ़ाई में रुचि लेने लगेंगे। जब हम जन्मदिन मनाते हैं तब उपहार के स्वरुप में चॉकलेट नहीं तो हम एक दूसरे को किताब देते हैं तो वह उपहार हमेशा अपने साथ रहेगा और अच्छी जानकारी भी देगा। भूतपूर्व राष्ट्रपति डॉ अब्दुल कलाम इन्हें भी किताबों से बहुत प्यार था। वे हमेशा किताब पढ़ते उनका किताबों के प्रति प्यार देखकर उनका जन्मदिन वाचन प्रेरणा दिन के तौर पर मनाने की घोषणा शासन ने की। एक अच्छी बात है। उस दिन सभी स्कूलों में बच्चों को पढ़ने के लिए कहा जाता है, किताबों के बारे में जानकारी दी जाती है, किताबों का महत्व लोगों को समझाया जाता है। यह प्रेरणादाई बात है। जब भी हमें कोई खाली समय मिलता है तब उस समय का हमें उपयोग करना चाहिए किताबों को पढ़ना चाहिए अपनी जानकारी, ज्ञान बढ़ाना चाहिए।

  विश्व किताब दिन के अवसर पर पूरी दुनिया इसे हर्षोल्लास से मनाते हैं। मैं आशा करती हूँ कि लोगों के मन में किताब के प्रति स्नेह पैदा हो और वे अपना खाली समय पढ़ने में लगाएं ताकि उनके मन में कैसीभी उदासी हो ,जो भी दुख हो वह दूर हो जाए।

Sunday, 5 April 2020

चारोळी (चिमणी )

स्पर्धेसाठी

चारोळी

काळ्याकरड्या रंगांची चिमणी
ऐटीत उभी रोखून नजर 
लोंबीतून दाणे टिपण्यास 
दिसतेस तू खूपच अधीर

रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर

कविता (कर्तव्याची दोरी )

स्पर्धेसाठी

कविता

विषय- कर्तव्याची दोरी

आज कळे मानवाला,
त्याच्या कर्तव्याची दोरी.
नाही उपयोग काही,
किती केली शिरजोरी.

राखू स्वच्छता घरीदारी,
शाकाहार महत्त्वाचा.
प्रेम प्राण्यांवर करा,
नको विचार खाण्याचा.

देशहीत राखण्यास,
राहू सदैव तयार.
देऊ सहकार्य त्यांना,
नको त्रस्त न बेजार.

बाणा स्वाभिमानी राखू,
दक्ष कर्मचारी सारे.
प्रेमभावे सहकार्य,
जागवून प्रितवारे.

जगी वंद्य भारतीय,
संस्कृतीचा अभिमान.
राखण्यास बाध्य आम्ही,
उंच राखू स्वाभिमान.

दोरी कर्तव्याची आहे,
मजबूत, बाणेदार.
पराजय ना मंजूर,
आम्हा आम्ही ठाणेदार.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर
9881862530

कविता ( चिमणी पाखरं )

स्पर्धेसाठी

कविता

विषय- चिमणी पाखरं


थांबले जग हे सारे अचानक,
बंद व्यवहार अन् कारखाने.
प्रदुषण करण्या नाही कोणी,
चिमणी पाखरे गाती आनंदाने

चिवचिवाट पहाटे ऐकू येता,
जाग आली तृप्त कान झाले.
भास्कराच्या प्रकाशातून ,
खग आनंदाने विहरु लागले.

मुक्त संचार नव्हता केला,
सारी गर्दी पाहून भेदरलेले.
प्रदुषणाच्या कराल कवेतून,
सुटण्या सारे फडफडलेले.

कीती शांतता अनुभवली ही,
जणू राज्य आमचेच आले.
मानव सारा बंदिस्त घरातून,
नकळत बदल सारे झाले.

कोकीळ कुहूकुहू आलाप घेते
राघूमैना ठुमकत रिझवी मना.
मोर नाचरा,फुलवीतो पिसारा,
सारे पक्षी सोडून आले वना.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Saturday, 4 April 2020

चारोळी (क्षितिज )

चारोळी

क्षितिज

नाही जाऊ शकत आपण
क्षितिजापल्याड कधीही
जसे मृगजळ ना गवसते
तहानलेल्या जीवा कधीही

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

चारोळी ( क्षितिज )

चारोळी

क्षितिज

भास्कर क्षितिजापल्याड गेला
अंधारात सापडली धरणीमाय
प्राचीच्या आगमना आसुसली
जशी आतुर लेकीसाठी माय

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

चारोळी ( क्षितिज )

चारोळी

नाही मर्यादा प्रेमाला माझ्या
न तमा कधीही क्षितिजाची
अमर्याद कर प्रेम सखे तू
न कर पर्वा तू जीवाची

माणिक नागावे
कुरुंदवाड

चारोळी ( क्षितिज )

क्षितिज

इंद्रधनू चे रंग उधळले
क्षितिजावर नवशोभा आली
सानथोर हे स्मितीत झाले
नवतेजाची आभा प्रकटली

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Friday, 3 April 2020

अभंग (आरोग्य राखू )

स्पर्धेसाठी

अभंग रचना

विषय- आपले आरोग्य

शिर्षक- राखू आरोग्य


राखूया आरोग्य।आपण आपले।
शरीर चांगले।ठेवायचे।।1।।

रोज प्राणायाम।नित्य करोनिया
श्वास भरोनिया।हृदयात।।2।।

सफाई घराची।रोजच करावी।
आरोग्य सांभाळू। आपणच।।3।।

कोरोना आलाय।संसर्ग झालाय
संपर्क नकोय।अजिबात।।4।।

घरीच रहावे। व्यायाम करावे ।
रोजच करावा।प्राणायाम।।5।।

साबण वापरा।धुवा स्वच्छ हात 
ऐका माझी बात।खरोखर।।6।।

कर्तव्य आपले।पार आम्ही पाडू
हाती घेतो झाडू।लोटावया।।7।।

बोलते माणिक।ऐका तुम्ही सारे 
आपण सोयरे।सगळेच।।8।।

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 1 April 2020

चारोळी (मर्यादा )

चारोळी

मर्यादा

मनावर आहे ताबा ज्याचा
तो न मर्यादा ओलांडणार 
स्वतः बरोबर दुसऱ्यांचेही 
खऱ्या अर्थाने उजळविणार 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड