स्पर्धेसाठी
साने गुरुजी
पावन झाले साने गुरुजी नांव,
प्रकाशात आले पालगड गांव.
पांडुरंग नांव तयांचे मंगल,
नसे कधी विचार अमंगल.
दिला संस्कार ती शामची आई
असे बालपण ते आकार घेई.
दिले शामला कृतीतून शिक्षण
दाखवले त्याने अनेक सुलक्षण
सत्य अहिंसा जीवनातील मूल्य
जपून ठेवली ठेव ती अमूल्य.
आवडते गुरुजी विद्यार्थ्यांचे,
निर्मळ, पावन उत्तुंग हृदयाचे.
केला पतित, हरिजन उद्धार,
होऊन स्वतःच्या जीवावर उदार
पार केली आलेली संकटं
केला स्वतःच आयुष्याचा शेवट
साहित्य, वचन,कार्याने अमर
मांडून समस्तांसाठी विचारसागर
वंदन करून स्मरतो आम्ही,
सदैव प्रेरणा द्यावी तुम्ही.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment