स्पर्धेसाठी
कविता
रानवाटा
नागमोडी घेत वळणे ,
धावल्या पहा रानवाटा.
गारगार वारा छेडतो,
येतो अंगावरी काटा.
सरसरून राहिले उभे,
रोमांच कांतीवरती.
वाटा पोहचवती शेवटी,
हिरव्यागार रानावरती.
ओळखून ध्येय आपल्याला,
रस्ता योग्य निवडायचायं,
रस्त्यावरचे काटेकुटे,
एक एक वेचून काढायचयं.
रानवाटा तुडवताना खाली,
आकाशात नजर रोखायचीयं
साध्य करण्या ध्येय आपले,
अखंडपणे चालायचयं.
झाली पायवाट हळूहळू,
रानवाटा विस्तारलेल्या.
शेतकऱ्यांना सरावाला,
नाही लागत सांगायला.
पडलयं अंगवळणी सर्वांच्या,
सराव चालण्याचा हवा,
रानवाटेमुळेच मिळतील,
यशाच्या हमरस्त्यावरील
दीपस्तंभ मानवतेचे.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment