स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
संसार
लेकरासाठी माय राबते,
गरीबीतही सुखात राहते.
फाटला जरी उघडा संसार,
नेटाने सहजच ती चालवते.
केला संसार निगुतीने,
मांडला उघड्यावर पसारा.
मांडली चूल कौशल्याने,
जरी नसला डोई निवारा.
पोळी लाटते पाटावर,
भाजते खरपूस तव्यावर.
जाळ पेटता पेटेना बाई,
तेल हवे काटक्यांवर.
मळकटली भांडीकुंडी,
जळण शेजारी पडलेले.
हौद पाण्याचा शेजारी,
समाधान मनी पेरलेले.
निळ्या लुगड्यात माय ,
वैधव्याची खूण भाळी.
परी समाधानी भाव वदनी,
जरी नसे नशिबी चंद्रमौळी
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment