स्पर्धेसाठी
पाककृती कविता
मिरचीचा ठेचा
जेवताना हवाय सर्वांना,
झणझणीत मिरचीचा ठेचा.
मग करुया बरं तयार आता,
लक्ष देऊन काळजीने वाचा.
आणल्या मिरच्या पावशेर,
स्वच्छ धुऊन पुसून घेतल्या.
देठ टाकले पटपट तोडून,
मग भाजायला तयार झाल्या.
तव्यावर टाकून तेल,
चरचरीत मिरच्या भाजल्या.
वास आला भाजलेला,
शिंका येऊ लागल्या.
खाली उतरवून गार केल्या,
खलबत्त्यात बारीक केल्या. चवीनुसार मीठ घातले,
नाकी झिणझिण्या उठल्या.
घातले जिरे अन् कोथिंबीर,
कुटून सर्व एकजीव केले.
लिंबू पिळला मिश्रणात,
तोंडाला पाणीच सुटले.
ताटात घेतला वाढून ठेचा,
होतेच दही सोबतीला .
भाकरीबरोबर मारला ताव,
समाधान मिळाले पोटाला.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment