Tuesday, 11 June 2019

हायकू ( पर्जन्यवृष्टी )

हायकू

पर्जन्यवृष्टी

आला पाऊस
झाली पर्जन्यवृष्टी
आनंदी श्रुष्टी

वाहीले वारे
गारवा शरीराला
तृप्ती मनाला

स्पर्श पाण्याचा
फुलवती अंगाला
शांत जीवाला

धरणीमाता
प्रसन्न झाली आता
आमची त्राता

हिरवीगार
पांघरली दुलई
गर्भार बाई

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment