स्पर्धेसाठी
पुस्तक परीक्षण
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्
एखादं रेकॉर्ड करायचा म्हणजे त्यासाठी इतरांच्यापेक्षा वेगळी, जी सहजासहजी शक्य नसते अशी गोष्ट करणे होय.आज आपल्या नावावर कोणते ना कोणते तरी रेकॉर्ड असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लागते जबरदस्त इच्छाशक्ती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड हे आपणाला माहीतच आहे. आता त्यात भर टाकली आहे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् ने. आणि या सामाजिक संस्थेची निर्मिती केली जयसिंगपूर येथील कविता प्रकाशन चे मालक, संस्थापक, लेखक माननीय श्री डॉक्टर सुनील पाटील यांनी. त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. व तीच सवय त्यांना पुढील आयुष्यात उपयोगी पडली. वाचन ,लेखन करता करता प्रकाशनाचे कार्यही ते उत्तम रीतीने करतात. महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् या पुस्तकामध्ये मराठी माणसाचे महत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर जावे व त्यांना प्रसिद्धी मिळावी हाच निरपेक्ष भाव या पाठीमागे आहे. राज दुधाट यांनी इंग्रजी पुस्तकांचे सर्वात जास्त मराठी मध्ये अनुवादन केल्यामुळे, अनिल तुकाराम शिनकर यांनी सर्वाधिक दिवाळी अंकाचा वैयक्तिक संग्रह केल्यामुळे, अभिषेक ज्ञानेश्वर ठमके हे मराठीतील सायफाय लेखक यांनी एकाच वेळी 11 प्रकाशकाकडून त्यांचे पुस्तक "पुन्हा नव्याने सुरुवात "प्रकाशित केल्यामुळे , योगेश रमेश पाटील भाषिक कलाविष्कार मराठी कविता संग्रह "वेलांटी" कवितासंग्रह की ज्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये वेलांटी आपल्याला पाहायला मिळेल. शुक्राचार्य महादेव उरुणकर यांनी सर्वाधिक ऐच्छिक म्हणजे 82 वेळा रक्तदान केल्यामुळे, या सर्वांच्या विक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् ने घेऊन त्यांना विशेष राष्ट्रीय पुरस्कार 2019 सन्मानपूर्वक दिला आहे. त्याचबरोबर या पुस्तकात भारताचे पहिले रेल्वे विद्यापीठ - बडोदा, जगातील सर्वात श्रीमंत गाव-हुआस्की, भारतातील सर्वात श्रीमंत गाव -धरमाज, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गाव -अजनाळे, याचीही सविस्तर माहिती देऊन वाचकांच्या ज्ञानात भर पाडली आहे. तसेच सर्वाधिक जास्त मर्दानी खेळाचे मोफत प्रशिक्षण रोहित कुंतीनाथ गाडवे यांनी दिल्यामुळे, अधिक गणित विषयक उपक्रम राबविणारा शिक्षक दिपक मधुकर शेटे 18 वर्षापासून गणित हा विषय विविध उपक्रमांनी शिकवतात त्यामुळे त्यांचा निकाल नेहमी शंभर टक्के असतो, त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे, शिरोळ तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत डॉक्टर प्रकाश गोरखनाथ दीपंकर यांनी " जीवन प्रकाश पब्लिक स्कूल "ची स्थापना केली. विद्यार्थ्यांच्या सुसंस्कार रुजावेत यासाठी आई-वडिलांचे महत्त्व समजावे यासाठी शाळेमध्ये पालकांचे वाढदिवस साजरे करतात. हे त्यांचे कार्य पाहून, या सर्वांच्या विक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. श्री सय्यद नासिर अहमद यांनी महान मुस्लिम सैनिकांनी जे दिले यांची सर्वांची माहिती एकत्र करून "युनिक ट्रिब्यूट टू इंडियन फरगॉटन हिरोज" लिहिल्यामुळे त्यांचेही नाव या यादीत आलेले आहे. संजय येरने लिखित संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावरील चरित्रात्मक, ऐतिहासिक आणि रोमांचक मांडणी केल्यामुळे ही जगातील पहिली कादंबरी ठरली व तो विक्रम संजय येरने यांच्या नावावरून नोंद झाला. डॉक्टर संजय नरेंद्र कुंडेटकर हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी किचकट अशा महसूल कायद्यावर सर्वाधिक लिखाण करून ते सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत मध्ये मोफत प्राप्त करून दिले आहे. त्यांच्या या असामान्य अशा योगदानामुळे 2018 मध्ये त्यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डने विशेष राज्य पुरस्कार सन्मानपूर्वक बहाल केला. अनेक ठिकाणी विविध प्रकारची संमेलने नेहमी होत असतात. महाराष्ट्रातील पहिले तंत्रस्नेही शिक्षिका संमेलन रविवार दिनांक 2018 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी उपक्रमशील शिक्षिका ( आम्ही सावित्रीच्या लेकी )समूहामार्फत महाराष्ट्रातील पहिले महिलांनी महिलांसाठी तंत्रज्ञान कार्यशाळा व संमेलन आयोजित केले होते. त्यामुळे त्यांना 2018साली महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् ने विशेष राज्य पुरस्कार दिला.वाचनाचा पुरस्कार करण्यासाठी सौ.अरुंधती महाडिक यांनाही एकाच दिवशी 11 वाचनालयांचे उद्घाटन केले व वाचनचळवळीला हातभार लावरा म्हणून त्यांना8 मार्च 2018 मध्ये तर सर्वाधिक प्यतिनिधिक कवितांचे संपादन केले व मराठी कवितेच्या इतिहासात एक क्रांतिपर्व उभे केले म्हणून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मधे नोंद केली गेली.तसेच बिनविरोध निवडणुकीची 20 वर्षांची परंपरा राखण्याचे काम निसर्गरम्य गोलीवडे गावाने केली यांची नोंदही या पुस्तकात केली आहे. त्याचबरोबर डॉ. सुनील पाटील यांनी बुके नव्हे तर बुक द्या ही संकल्पना राबवून आपल्या मुलाचा प्रिन्सचा वाढदिवस ग्रंथतुला करुन साजरा करतात या त्यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल घेउन त्यांनाही इडीयाबुक ऑफ रेकॉर्डस् ने घेतली आहे याचाही उल्लेख या पुस्तकात आहे. तसेच लेखकांची स्वाक्षरी असलेल्या 2000 पुस्तकांचा संग्रह केल्यामुळे ही त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. कविता लिहिताना एकाच अक्षराद्वारे काव्यनिर्मिती केल्यामुळे योगेश रमेश पाटील यांना ही महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मधे नोद करण्यात आली आहे.
सर्वात मनाला भावलेला या पुस्तकातील भाग म्हणजे डॉ. सुनील दादा पाटील यांनी सुरु केलेला " युनिव्हर्सल फ्री लायब्ररी" हा होय.कारण ते स्वतः सभासदांना पुस्तक पोस्टाने पाठवतात व वाचून झाल्यावर ते पुस्तक परत पाठवण्यासाठी आणखी एक कोरे पाकीट पाठवतात.तेही पोस्टाचे तिकीट लावून !! छान व अभिनव व धाडशी उपक्रम आहे. शिवाय यातून वाचकांबद्दलचा विश्वास अधोरेखित होतो. त्याचप्रमाणे या पुस्तकात महाराष्ट्राची विक्रमी वृक्षलागवड, खैंदुळ नाट्यप्रयोगाचे सलग 36 तास सादरीकरण,Largest collection of Objects Bearing 786 बद्दल माहिती, Fruit bearing apple tree din terrace garden बद्दलची माहिती,महाराष्ट्रातील सर्वात मोठा ध्वजस्तंभ, महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गांव भिलार,पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लांब पदयात्रेची नोंद, यांचा उल्लेख या पुस्तकात केला आहे.तसेच. ब्रेल लिपीतील ग्रथांचा विशेष विभाग असणारे देशातील पहिले जिल्हा ग्रंथालय म्हणून नावारूपाला आलेल्या करवीर नगरवाचनालयाची नोंदही महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् ने घेतली आहे.तसेच ग्रंथमित्र डॉ. सुनील पाटील यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात 3000 मराठी कवितासंग्रह असल्याने लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् मधे नोंदवण्यात आला आहे.महाराष्ट्रातील पहिले मराठानगर म्हणजेच गुंडेवाडीची नोंद तर सर्वाधिक नाट्यलेखन करणारा शिक्षक म्हणून अशोक भिमराव रास्ते यांची नोंद तर कवितेचे पहिले इंटरनॅशनल जर्नल ची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् 2015 मधे नोंद घेण्यात आली आहे याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे.
असे हे आगळेवेगळे विक्रमांच्या नोंदी ठेवणारे पुस्तक सर्वांनाच माहितीचा खजानाच उपलब्ध करून देतो.महाराष्ट्राची थोडक्यात माहिती ही यांत विशद केली आहे. व शेवट महाराष्ट्राची महती सांगणाऱ्या दोंन कवितांनी केला आहे.मुखपृष्ठावर महाराष्ट्राचा नकाशा व त्यापाठीमागे पृथ्वीचा गोलाकार भाग ,त्यावर फडकणारे निशाण पताका ,तिरंगा व खाली असेलेले उघडे पुस्तक ज्यातून वैचारिक पक्षी मुक्तपणे विहार करण्यासाठी बाहेर झेपावताना दिसतात.खूपच प्रभावी मुखपृष्ठ आहे. तर मलपृष्ठावर विक्रमांच्या बातम्यांचे फोटो व कात्रणे शोभून दिसतात.एकुण 64 पानांचे हे पुस्तक वाचकांना भरपूर माहिती देते.एकुणच महाराष्ट्र व महाराष्ट्रातील माहिती मिळवून देण्याचे काम डॉ. सुनील पाटील यांनी केले आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. व त्यांच्या भविष्यातील साहित्य प्रवासाला लाखलाख शुभेच्छा.
रसग्रहण
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment