Sunday, 30 June 2019

लेख ( शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची परवड )

स्पर्धेसाठी

लेख

शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची परवड

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा,
गुरु साक्षात परब्रम्हं तस्मै श्री गुरवे नमः।

  असे शिक्षकांच्या बद्दल पूर्वीपासूनच म्हटले जाते. गुरूमध्ये साक्षात परब्रम्हां ला पाहिलं जायचं. पूर्वी विज्ञान युगाचा, तंत्रज्ञानाचा एवढा विस्फोट झालेला नव्हता. त्यामुळे ज्ञान मिळवण्याचे एकमेव साधन गुरुच होते. शिकलेले लोकही जास्त नव्हते, त्यामुळे सर्व गाव शिक्षकांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाने, चालायचा. पण आजचे युग हे संगणकाचे विज्ञानाचे युग असल्यामुळे आज आपणाला एका क्‍लिकवर सर्व माहिती सहजरीत्या मिळू शकते लोकही आता शिकून शहाणे विचार करणारे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी शिक्षकांच्यावर, गुरूंच्या वरच अवलंबून राहण्याची गरज भासत नाही.परंतु त्या ज्ञानापर्यंत कसे पोहोचायचे हे ज्ञान घेण्यासाठी गुरुची आवश्यकता ही कायम राहणारच. कारण गुरू हा भावनाशील, संवेदनशील मनाचा असतो. तशा भावना कोणत्याही यांत्रिक उपकरणात आपल्याला पाहायला मिळत नाहीत.

आज-काल शिक्षण क्षेत्रामध्ये बरेच बदल झालेले आहेत. आज भरपूर संदर्भ साधने उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक हा सहजच वाढलेला आहे. शाळा ही डिजिटल झालेली आहे. ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात झालेली आहे.शिक्षकांना ऑनलाईन ट्रेनिंग दिले जात आहे.  हा बदल तरी चांगला असला तरी बरेच पूर्वीचे शिक्षक ज्यांना याबद्दल काहीच माहिती नसते त्यांना हे फार अवघड जाते. पण यांना दुसरा मार्गच नसतो. नाईलाजास्तव कसे तरी त्यांना ट्रेनिंग पूर्ण करावे लागते. शिक्षणाचे पवित्र काम करत असताना आज शिक्षकांना पूर्णवेळ लक्ष देऊन शिकवण्यासाठी वेळ मिळेनासा झालेला आहे. त्यातच शालाबाह्य उपक्रमांची , परीक्षांची , विविध स्पर्धांची संख्याही खूप वाढत असल्यामुळे व शिक्षकांना इतर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढत असल्यामुळे त्यांना पूर्णवेळ वर्गामध्ये लक्ष देऊन शिकवण्यास मिळत नाही. आता जरी तो कायदा  अमलात  आणण्याचा विचार  जरी चालू असला तरी आतापर्यंत पर्यंत नापास न करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थी चिंतामुक्त होऊन निवांत राहिला.पण शिक्षकाला मात्र अध्यापनाचे मिळेनासे झाले.  हल्ली शाळांचे प्रमाण इतके वाढलेले आहे की एका गावात चार चार शाळा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ओढाओढ सुरू आहे. शिक्षकांना आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना घाला असे लाचार पणे सांगत विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या दरवाजात जावे लागत आहे.  त्यामुळे शिक्षकांच्या बद्दलची आदराची भावना कमी झालेली आहे. आपोआपच शिक्षकांची शाळेत व समाजात ही परवड होत आहे. अनेक कायम विनाअनुदानित शिक्षकांची कथा तर विचारायलाच नको.  पंधरा ते वीस वर्ष कमी पगारावर अध्यापनाचे कार्य करीत आहेत.  त्याची मानसिक स्थिती कशी असेल याचा विचारच न केलेला बरा.मी एक असा शिक्षकांचा नेता पाहिलेला आहे  त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी गेली अडीच वर्ष चप्पल न घालता उन्हातानात ते फिरत आहेत, प्रचंड त्रास सहन करत आहेत.  तरी पण त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. त्यांनी हे किती सोसायचं ? कुठवर त्यांची परवड होणार आहे ?  आहे उत्तर याचं कुणाकडे ?  संगणक, टीव्ही, मोबाइल यांचा वाढता वापर व त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष व त्यातच पालकांची उदासीनता किंवा आपल्या पाल्याकडे वेळ द्यायला पालकांच्याकडे वेळच नसणे. या सर्व कारणांमुळे शिक्षण क्षेत्रात होणारे अधोगती व याला सर्वस्वी जबाबदार धरला जातो तो म्हणजे शिक्षक. पण एकट्या शिक्षकाला दोष देऊन चालणार नाही. यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्याच्यावर विचारविनिमय केला पाहिजे. व शिक्षकांची होणारी परवड कमी करण्याचा प्रयत्न करून त्यांना शिक्षणासाठी जास्त वेळ कसा देण्यात येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. असे जर झाले तरच येणारी भावी पिढी सुसंस्काराने, शिक्षणाने, विचाराने प्रगल्भ होईल. व माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारताचे रुप पहायला मिळेल.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

रसग्रहण ( महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् )

स्पर्धेसाठी          

         पुस्तक परीक्षण

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्

एखादं रेकॉर्ड करायचा म्हणजे त्यासाठी  इतरांच्यापेक्षा वेगळी, जी सहजासहजी शक्य नसते अशी गोष्ट करणे होय.आज आपल्या नावावर कोणते ना कोणते तरी रेकॉर्ड असावे अशी  प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लागते जबरदस्त इच्छाशक्ती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड हे आपणाला माहीतच आहे. आता त्यात भर टाकली आहे महाराष्ट्र  बुक ऑफ रेकॉर्डस् ने. आणि या सामाजिक संस्थेची निर्मिती केली जयसिंगपूर येथील कविता प्रकाशन चे मालक, संस्थापक, लेखक माननीय श्री डॉक्टर सुनील पाटील यांनी. त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. व तीच सवय त्यांना पुढील आयुष्यात उपयोगी पडली. वाचन ,लेखन करता करता प्रकाशनाचे कार्यही ते उत्तम रीतीने करतात. महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्  या  पुस्तकामध्ये मराठी माणसाचे महत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर जावे व त्यांना प्रसिद्धी मिळावी  हाच निरपेक्ष भाव या पाठीमागे आहे. राज दुधाट यांनी इंग्रजी पुस्तकांचे सर्वात जास्त मराठी मध्ये अनुवादन केल्यामुळे, अनिल तुकाराम शिनकर  यांनी  सर्वाधिक दिवाळी अंकाचा वैयक्तिक संग्रह केल्यामुळे, अभिषेक ज्ञानेश्वर ठमके हे मराठीतील सायफाय लेखक यांनी एकाच वेळी 11 प्रकाशकाकडून त्यांचे पुस्तक  "पुन्हा नव्याने सुरुवात "प्रकाशित केल्यामुळे , योगेश रमेश पाटील भाषिक कलाविष्कार मराठी कविता संग्रह "वेलांटी"  कवितासंग्रह की ज्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये वेलांटी आपल्याला पाहायला मिळेल. शुक्राचार्य महादेव उरुणकर यांनी सर्वाधिक ऐच्छिक म्हणजे 82 वेळा रक्तदान केल्यामुळे, या सर्वांच्या विक्रमाची नोंद  महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् ने घेऊन त्यांना विशेष राष्ट्रीय पुरस्कार 2019 सन्मानपूर्वक दिला आहे. त्याचबरोबर या पुस्तकात भारताचे पहिले रेल्वे विद्यापीठ - बडोदा, जगातील सर्वात श्रीमंत गाव-हुआस्की, भारतातील सर्वात श्रीमंत गाव -धरमाज, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गाव -अजनाळे, याचीही सविस्तर माहिती देऊन वाचकांच्या ज्ञानात भर पाडली आहे. तसेच सर्वाधिक जास्त मर्दानी खेळाचे मोफत प्रशिक्षण रोहित कुंतीनाथ गाडवे यांनी दिल्यामुळे, अधिक गणित विषयक उपक्रम राबविणारा शिक्षक दिपक मधुकर शेटे 18 वर्षापासून गणित हा विषय  विविध उपक्रमांनी शिकवतात त्यामुळे त्यांचा निकाल नेहमी शंभर टक्के असतो, त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे, शिरोळ तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत डॉक्टर प्रकाश गोरखनाथ दीपंकर यांनी " जीवन प्रकाश पब्लिक स्कूल "ची स्थापना केली. विद्यार्थ्यांच्या सुसंस्कार रुजावेत यासाठी आई-वडिलांचे महत्त्व समजावे यासाठी शाळेमध्ये पालकांचे वाढदिवस साजरे करतात. हे त्यांचे कार्य पाहून, या सर्वांच्या विक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.  श्री सय्यद नासिर अहमद  यांनी महान मुस्लिम सैनिकांनी जे दिले यांची सर्वांची माहिती एकत्र करून "युनिक ट्रिब्यूट टू इंडियन फरगॉटन हिरोज"   लिहिल्यामुळे त्यांचेही नाव या यादीत आलेले आहे. संजय येरने लिखित संताजी जगनाडे महाराज  यांच्या जीवनावरील चरित्रात्मक, ऐतिहासिक आणि रोमांचक मांडणी केल्यामुळे ही जगातील पहिली कादंबरी ठरली व तो विक्रम संजय येरने यांच्या नावावरून नोंद झाला. डॉक्टर संजय नरेंद्र कुंडेटकर हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी किचकट अशा महसूल कायद्यावर सर्वाधिक लिखाण करून ते सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत मध्ये मोफत प्राप्त करून दिले आहे. त्यांच्या या असामान्य अशा योगदानामुळे 2018 मध्ये त्यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डने विशेष राज्य पुरस्कार सन्मानपूर्वक बहाल केला. अनेक ठिकाणी विविध प्रकारची संमेलने नेहमी होत असतात. महाराष्ट्रातील पहिले तंत्रस्नेही शिक्षिका संमेलन रविवार दिनांक 2018 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी उपक्रमशील शिक्षिका (   आम्ही सावित्रीच्या लेकी )समूहामार्फत महाराष्ट्रातील पहिले महिलांनी महिलांसाठी तंत्रज्ञान कार्यशाळा व संमेलन आयोजित केले होते. त्यामुळे त्यांना 2018साली  महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् ने विशेष राज्य पुरस्कार दिला.वाचनाचा पुरस्कार करण्यासाठी सौ.अरुंधती महाडिक यांनाही एकाच दिवशी 11 वाचनालयांचे उद्घाटन केले व वाचनचळवळीला हातभार लावरा म्हणून त्यांना8 मार्च 2018 मध्ये तर सर्वाधिक प्यतिनिधिक कवितांचे संपादन केले व मराठी कवितेच्या इतिहासात एक क्रांतिपर्व उभे केले म्हणून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मधे नोंद केली गेली.तसेच बिनविरोध निवडणुकीची 20 वर्षांची परंपरा राखण्याचे काम निसर्गरम्य गोलीवडे गावाने केली यांची नोंदही या पुस्तकात केली आहे. त्याचबरोबर डॉ. सुनील पाटील यांनी बुके नव्हे तर बुक द्या ही संकल्पना राबवून आपल्या मुलाचा प्रिन्सचा वाढदिवस ग्रंथतुला करुन साजरा करतात या त्यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल घेउन त्यांनाही इडीयाबुक ऑफ  रेकॉर्डस् ने घेतली आहे याचाही उल्लेख या पुस्तकात आहे. तसेच लेखकांची स्वाक्षरी असलेल्या 2000 पुस्तकांचा संग्रह केल्यामुळे ही त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. कविता लिहिताना एकाच अक्षराद्वारे काव्यनिर्मिती केल्यामुळे योगेश रमेश पाटील यांना ही महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मधे नोद करण्यात आली आहे.

सर्वात मनाला भावलेला या पुस्तकातील भाग म्हणजे डॉ. सुनील दादा पाटील यांनी सुरु केलेला " युनिव्हर्सल फ्री लायब्ररी" हा होय.कारण ते स्वतः सभासदांना पुस्तक पोस्टाने पाठवतात व वाचून झाल्यावर ते पुस्तक परत पाठवण्यासाठी आणखी एक कोरे पाकीट पाठवतात.तेही पोस्टाचे तिकीट लावून !! छान व अभिनव व धाडशी उपक्रम आहे. शिवाय यातून वाचकांबद्दलचा विश्वास अधोरेखित होतो. त्याचप्रमाणे या पुस्तकात महाराष्ट्राची विक्रमी वृक्षलागवड, खैंदुळ नाट्यप्रयोगाचे सलग 36 तास सादरीकरण,Largest collection of Objects Bearing 786 बद्दल माहिती, Fruit bearing apple tree din terrace garden बद्दलची माहिती,महाराष्ट्रातील सर्वात मोठा ध्वजस्तंभ, महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गांव भिलार,पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लांब पदयात्रेची नोंद, यांचा उल्लेख या पुस्तकात केला आहे.तसेच. ब्रेल लिपीतील ग्रथांचा विशेष विभाग असणारे देशातील पहिले जिल्हा ग्रंथालय म्हणून नावारूपाला आलेल्या करवीर नगरवाचनालयाची नोंदही महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् ने घेतली आहे.तसेच ग्रंथमित्र डॉ. सुनील पाटील यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात 3000 मराठी कवितासंग्रह असल्याने लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् मधे नोंदवण्यात आला आहे.महाराष्ट्रातील पहिले मराठानगर म्हणजेच गुंडेवाडीची नोंद तर सर्वाधिक नाट्यलेखन करणारा शिक्षक म्हणून अशोक भिमराव रास्ते यांची नोंद तर कवितेचे पहिले इंटरनॅशनल जर्नल ची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् 2015 मधे नोंद घेण्यात आली आहे याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे.
असे हे आगळेवेगळे विक्रमांच्या नोंदी ठेवणारे पुस्तक सर्वांनाच माहितीचा खजानाच उपलब्ध करून देतो.महाराष्ट्राची थोडक्यात माहिती ही यांत विशद केली आहे. व शेवट महाराष्ट्राची महती सांगणाऱ्या दोंन कवितांनी केला आहे.मुखपृष्ठावर महाराष्ट्राचा नकाशा व त्यापाठीमागे पृथ्वीचा गोलाकार भाग ,त्यावर फडकणारे निशाण पताका ,तिरंगा व खाली असेलेले उघडे पुस्तक ज्यातून वैचारिक पक्षी मुक्तपणे विहार करण्यासाठी बाहेर झेपावताना दिसतात.खूपच प्रभावी मुखपृष्ठ आहे. तर मलपृष्ठावर विक्रमांच्या बातम्यांचे फोटो व कात्रणे शोभून दिसतात.एकुण 64 पानांचे हे पुस्तक वाचकांना भरपूर माहिती देते.एकुणच महाराष्ट्र व महाराष्ट्रातील माहिती मिळवून देण्याचे काम डॉ. सुनील पाटील यांनी केले आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. व त्यांच्या भविष्यातील साहित्य प्रवासाला लाखलाख शुभेच्छा.

रसग्रहण
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

हिंदी लेख ( साने गुरुजी )

माँ को भगवान मानने वाला महापुरुष-- साने गुरुजी

हमारा जीवनसागर में तैरने वाली जीवननौका जैसा है। उस पर जाने के लिए अनेक लहरों का सामना करना पड़ता है। हम मानव भी इस जीवनौका में सफर करने वाले मुसाफिर हैं। पुस्तकों के द्वारा हमें जीवन में अनेक संघर्षों का सामना करने का ज्ञान प्राप्त होता है। पुस्तके हमारा जीवन बनाती है। इसी तरह एक पुस्तक है विश्व में  प्रख्यात हुआ है। साने गुरुजी की  "श्यामची आई " यह किताब। इस किताब के द्वारा साने गुरुजी ने पूरे विश्व में लोगों को संस्कारों का ज्ञान दिया है। ऐसे महान व्यक्ति साने गुरुजी का जीवन परिचय सबको प्रेरणा देने वाला है।

24 दिसंबर को पालगड गाँव में उनका जन्म हुआ। उनके पिता का नाम सदाशिव था और माता का नाम यशोदा था। उनके जन्म के समय उनके घर की अच्छी थी। लेकिन बाद में उसमें परिवर्तन होता गया। फिर भी माता यशोदा ने साने गुरुजी को जिसे वह बचपन में शाम कहते थे, अच्छे संस्कार दिए। गरीबी में भी किस तरह स्वाभिमान से जीना चाहिए यह सिखा कर शाम को स्वावलंबी बनाया। माँ की दी हुई यह शिक्षा का साने गुरुजी ने पूरे जीवन में उसका उपयोग किया। साने गुरुजी मातृहृदयी थे। माँ की वजह से ही उनके मन में सात्विक भावनाओं का विकास हो गया था। स्वतंत्र संग्राम में जब जब भी वे  कारावास में जाते, तब तब वे अपना समय यूं ही बर्बाद नहीं करते। वे वहाँ लिखने का काम करते थे। "  श्यामची आई "  यह किताब भी उन्होंने कारावास में ही लिखी है। इस किताब में उन्होंने माँ की ममता, संस्कार, भारतीय संस्कृति का परिचय दिया है। जब भी हम यह पुस्तक पढ़ते हैं तब हमारे आंखों से आँसू अनायास ही निकल जाते हैं। यह सब साने गुरुजी की लेखनी का कमाल है। उनके लिए अपनी माता महान थी ही,  साथ ही साथ वे अपनी भारतमाता धरनीमाता को भी महान मानते थे। उसकी रक्षा करने में उन्हें धन्यता प्रतीत होती थी।  उनके मन में कभी भी किसी के बारे में भी द्वेष ,मत्सर की भावना नहीं थी। उनका मन हमेशा से प्रेम दया ,करुणा से भरा होता।  वह हमेशा से कहते ,अगर हमें हमारा  मन शुद्ध करना है तो हमारे आँसू से प्रभावी और कोई दवा नहीं है। मानवजाति पर, प्रकृति पर ,वृक्षोंपर, पंछियों पर, फल -फूलों पर, यहाँ तक कि जानवरों पर भी वे प्रेम करते थे। पूरे विश्व में कोई भी दुखी ना रहे, सबसे प्रेम पूर्ण व्यवहार करना चाहिए, ऐसा उन्हें लगता था।और वे उसीतरह जीते भी थे। उन्होंने एक गीत भी लिखा है," खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे "   इस गीत द्वारा उनके मन में पूरे मानव जाति के प्रति  सद्भावना थी यह दिखाई देता है। प्रेम जीवन का तत्वज्ञान है ऐसा वे मानते थे। प्रेम लेने के बदले देने में सही आनंद मिलता है ऐसा उनका मानना था। और उन्होंने अपने जीवन में हमेशा से सबको आनंद ही दिया है।वे कहते हैं, कि  बचपन में ही हमपर अच्छे संस्कार होते हैं तो वे हमें जीवन भर साथ देते हैं। जिस तरह हम अपने शरीर को गंदगी लगने से बचाते हैं उसी तरह मैं अपने मन को भी  गंदे विचारों से दूर रखना चाहिए ऐसा उनका मानना था। मोह अपने मन को दुखी बनाता है इसलिए कभी भी हमें किस चीज का मोह अपने मन में नहीं रखना चाहिए यह उनकी सीख थी। कोई भी अच्छा काम करने में उन्हें लज्जा का अनुभव नहीं होता था। वे कहते , बुरा काम जब हम करते हैं तब हमें लज्जा का अनुभव होना चाहिए। अच्छा काम कैसा भी हो उसे छोटा या बड़ा ना मानकर मन लगाकर करना चाहिए। उनका स्त्री पुरुष समानता का संदेश भी महत्वपूर्ण है। उनका साहित्य भी प्रचुर मात्रा में है। जिसमें हमें संस्कारों की सीख मिलती है, प्रकृति के प्रति प्यार दिखाई देता है। जब भी हम उनका साहित्य पढ़ते हैं, तो ऐसा लगता है की किताब का जो प्रसंग है आँखों के सामने ही है।  हम उसे अनुभव कर सकते हैं।ऐसा उनका साहित्य सबको मन लगाकर पढना चाहीए। संसार में व्याप्त अनेकों कुप्रथाओंके प्रति उन्होंने अपनी लेखनी चलाई है। समाज को प्रभावित किया है, प्रबोधित  किया है। उनका मन बहुत संवेदनशील था। महात्मा गांधी के स्वतंत्रता संग्राम में भी भाग लिया।वे खद्दर के कपडे पहनते थज।स्वतंत्रता संग्राम में उन्होंने जब भाग लिया था तो अनेक गीतों द्वारा लोगों के मन में देश प्रेम की ज्वाला प्रज्वलित की थी। हरिजनों के प्रति भी उनके मन में दयाभावना थी। उन्होंने अपने पूरे जीवन में अपने माँ के संस्कारों का हाथ नहीं छोड़ा। संघर्षों का सामना किया,  गरीबी का सामना किया।उसीके सहारे छात्रावासमें जब वे काम करतज थे तब छात्रों को बहुत अच्छे संस्कार  दिए। वे उनकी माता के समान सेवा करते थे। उनका अध्यापन भी प्रभावी था।अपने कार्य से वे महान बने थे।उनका कार्य सबके लिए आदर्श था।और हमेशा से रहेगा भी ।पर बार-बार प्रयास करने पर भी, कहने पर भी समाज में कुछ प्रभाव नहीं होता। यह देख कर उनका कोमल,संवेदनशील मन आक्रंदित हो उठता था। उदासी मन पर छा जाती थी। और ऐसे ही एक उदास वातावरण में उन्होंने अपनी जीवन यात्रा 11 जून 1950 को समाप्त की।

कथा ( तिच्या घरी सुखी राहूदे )

शिर्षक - तीच्या घरी सुखी राहूदे

सूर्य मावळतीला चालला होती .पिवळा सोनेरी प्रकाशाला अंधाराची किनार लाभत होती.कडुसं पडायला लागलं होतं.शेतावरची कामं आवरुन आयाबाया गावाकडं बिगीबिगी जायला निघाल्या. शेतकरी गडी आपली औजारं सावरत बैलगाडी हाकू लागली.बैलं दुडकत गावाकडं निघाली.त्यांच्या गळ्यातील घुंगुरमाळा गोड आवाज काढू लागल्या.घुंगरांच्या आवाजाने त्यांच्या चालीला एक लय आली होती .घरी जायची सर्वांनाच घाई होती.दिवस बुडायच्या आत गावशिवारात एकेकजण येत होता.गडी माणसं मधेच पारावर टेकत होती अन् गप्पा मारण्यात दिवसभराचा शिण घालवत होती .बाया हातपाय धुवून जरा अंगणात टेकल्या.ज्यांच्या सुना होत्या त्यांना आयताच चहा मिळाला.ज्यांच्या नव्हत्या त्यांनी थोड्यावेळाने करुन पीला.मग सुरु झाली संध्याकाळच्या स्वैपाकाची तयारी.जेवणखाण झालं की मग सगळ्या आयाबाया अंगणात येऊन बसायच्या मग त्यांचा ऊशीरपर्यंत गप्पांचा फड रंगायचा.

गावात सातवीपर्यंतच शाळाअसल्यामुळं बऱ्याच मुलींना सातवीनंतर घरीच रहावं लागे.घरकाम करावं लागे.त्यासुद्धा आनंदाने कामं शिकायच्या.एकमेकांच्या घरी जाणयेणं असायचं .सुशी , पिंकी , कमली ,शरी शबाना , आशिया अशा सर्वजण आपसात खेळत.मुलंही त्यांच्याबरोबर खेळायची.सगळच आलबेल चाललेलं.त्यांच्यातीलच एक  म्हणजे सातवी झालेली
शबाना अल्लड वयातील पोर.घरच्या परिस्थिती मुळं जास्त शिक्षण घेता न आल्यामुळं घरीच आईला कामात मदत करत असे.कशाची दगदग ना घाईगडबड , त्यामुळे निवांत सगळे चालायचे . दुपारचा वेळ कामाची आवराआवर झाल्यावर सगळे आरामात असायचे , कुणी वामकुक्षी घ्यायचे.पडवीत झोपायचे.

शबाना मग कधी घरात दूरदर्शनवर कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवी कींवा शेजारच्या काकूंच्या घरी जाई.सुनील वीस वर्षाचा देखणा तरुण.बोलायलाही छान होता.तसे दोघेही अल्लड वयातीलच .दोघेही एकमेकांशी बोलायची . गप्पा मारायची. हळूहळू दोघांना एकमेकांबरोबर बोलणं , सहवास चांगला वाटू लागला .मग दोघांच्या नजरेची भाषा व भावनांची देवाणघेवाण नकळत सुरु झाली. दोघेही हळूहळू एकमेकांकडे ओढले जाऊ लागले. सुनील च्या घरी शबाना चे येणेजाणे वाढलं.
माळ्यावर पिकायला टाकलेलं आंबा जसा हळूहळू पिकतो व त्याची गोडी वाढते अगदी तसच सुनील आणि शबाना च प्रेम गोड होत होतं..जशी झाडावरच्या चिंचे ची गोडी एखाद्या मुलीला लागावी तशी गोडी सुनील ला लागत होती..गावातून हिंडून फिरून दमून आलेला सुनील शबाना दिसली की अगदी चिंचेच्या झाडासारखा मोहरून जायचा.. खेड्यातल हे उनाड प्रेम मोगऱ्यारखं फुलत होतं

सुनिल ची आई विधवा स्त्री , चार घरची भांडी , धुणी करुन मुलांना तीने वाढवले होतं .तीला आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा होत्या. बापाचे छत्र नसलं की धाक दाखवायला कुणी नसलं तर मग मुलं अंदाज घेतात व नकळत ती वाईट मार्गाला लागतात. त्यांच्यावर योग्य वेळी अंकुश नाही ठेवला तर कालांतराने ती निर्ढावतात व नंतर हाताबाहेर गेले की आवरता आवरत नाहीत.पण आईने जर योग्य वेळी खंबीर होऊन कडक निर्णय घेतले तर मुलांना जरब बसते.याचाच फायदा सुनील च्या लहान भावाने घेतला.तो वाईट संगतीला लागला . चोऱ्या माऱ्या करु लागला. पोलीस एकदादोनदा घरी येऊन गेलं.आजूबाजूला बदनामी झाली.सुनील ने त्याला वडीलकीच्या नात्याने खूप समजावून सांगितलं, पण सारे व्यर्थ गेलं.

याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्याप्रसंगानंतर असा झाला की शबाना च्या घरचं तीला त्या घरी पाठवनासे झाले. आता दोघांच्या भेटी होत नव्हत्या.दोघांच्या ही नकळत प्रीतफुलाचा सुगंध दरवळत होता.त्यांना एकमेकांची ओढ लागली होती. पण भेटणार कसं ? प्रश्न निर्माण झाला. मग काहीतरी कारण काढून शबाना बाहेर जाऊन ऊभं राहू लागली. माळावर , देवळाच्या मागं एकमेकांशी भेट घेऊ लागले.मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून आणाभाका,शपथा घेतल्या जाऊ लागल्या.मोगऱ्याच्या फुलासारखं शबाना सुनीलला मोहवू लागली.तोपण वेड्यासारखं तीच्या मागं मागं करु लागला." शबाना, मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही गं " असे तो तिला म्हणायचा.शबाना मोहरुन जायचीव म्हणायची, " सुनील, मला तरी तुझ्याशिवाय कुठं गमतं रे ? "पण शबाना मला भिती वाटते,आपलं हे प्रेम जर घरच्यांना समजले तर कसं होईल ? " सुनील च्या या प्रश्नावर शबाना ही घाबरायची व म्हणायची, " मग आपण काय आणि कसं करायचे रे ? " त्यांच्या मनात आलेले विचार काही निराधार नव्हते.त्यांच्यातील हे प्रेम हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागले.

शबाना च्या घरच्या लोकांच्या नजरेस ही गोष्ट आली.मग काय तीच्यावर बंधनांचा डोंगर आला." अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही तू." तिचे वडील शबानाला ओरडले.सतत पाळत ठेवणं आलं.पण दोघांमधला प्रेमांकुर अजूनच रुजत होता.प्रेम हे स्प्रींगाप्रमाणे असतं.त्याला जेवढं दाबाल तेवढं ते जास्त वेगाने ऊसळतं.तसेच दोघांचही झालं.एकमेकाबद्दलची अनावर ओढ शांत बसू देत नव्हती. भर ऊनात तापून आल्यावर सावलीची अपेक्षा आसते व ती नाही मिळाली की तगमग जास्तच वाढते.अगदी तसच या दोघांचही झालेलं .समाजबंधनामुळे ते भेटू शकत नव्हते.थोडं जरी बाहेर गेलं की आई ओरडायची ," बाहेर काय काम आहे ? आत ये आधी " नजर चुकवून कधीतरी ती बाहेर आली व ते घरच्यांना दिसले की मग तिला मारहाण होऊ लागली. जवळच घर असल्यामुळे सुनिलला हे सर्व समजत होतं.पाण्याविना तडफडणाऱ्या माशांप्रमाणे दोघांचीही हालत झाली होती. एकदिवस सुनील ने धाडस करुन एक चिठ्ठी लिहली व शबानाच्या घरात दुपारी कोण बाहेर नाही हे पाहून शबाना बाहेरच्या खोलीत असताना टाकून दिली. शबानाच्या मनात ती चिठ्ठी पाहून आनंद झाला. त्यात सुनील ने आपला फोन नंबर दिला होता.घरात सगळे विश्रांती घेत होते. शबानाने घाबरत हळू आवाजात फोन केला."हॅलो,मी शबाना" .सुनील शबानाच्या आवाजाने आनंदित झाला.तो म्हणाला, " शबाना,अगं तुझ्या आवाजाने माझे कान तृप्त झाले बघ.कशी आहेस ? " शबानाच्या भावनांचा बांध तुटला व ती रडू लागली.सुनीललापण रडू येऊ लागले.बराच वेळ बोलल्यानंतर मग त्यांनी घेतला एक भयंकर निर्णय .घरातून पळून जाण्याचा.!!!दिवस ठरला ,!! वेळ ठरली . !!

शबाना आईबरोबर बाहेर गावी गेली होती . शबानाने फोनवर सुनीलला सांगितले होते.त्यांचे सर्व ठरले होते.ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी सुनील गाडी घेऊन ऊभा राहीला.खूप वेळ तो वाट पहात उभा होता.फोन तरी कसा करायचा ?  फोन तीच्याकडे नव्हता .संपर्क कसा साधणार ? त्याने खूप वेळ वाट पाहीली.शेवटी तो तिथून जायला निघाला.तेवढ्यात फोन वाजला. गडबडीने सुनील ने फोन उचलला.फोन शबानाचा होता.तिने " आपण ठरवलेल्या ठिकाणी मी आले आहे, तू कुठायसं? " त्याचे नियोजन सगळे कोलमडले होते.तरीपण त्यांनी नियोजन केले.दोघांची भेट झाली .आता वेळ घालवण्यात अर्थ नव्हता . दोघांनी मिळून गाव सोडून जायचे ठरवले व तातडीने निघाले... धाडशी निर्णय ! कुठे जायचे ? काय खायचे ? सर्व प्रश्न गौण होते यावेळी.

शबानाच्या आईनच्या थोड्या वेळाने लक्षात आले की शबाना दिसत नाही. " शबाना, शबाना " तिने हाका मारल्या. पण काहीच पत्युत्तर नव्हते.ती घाबरली व आरडाओरडा करु लागली.घरातले सगळे शोधू लागले.तिने मग आपल्या नवऱ्याला कळविलं. ती डोकं बडवून घेऊ लागली.तीचा तो आकांत ऐकायला शबाना कुठं होती ? ती निघाली होती एका अनिश्चित अशा प्रवासाला.!!गांव तसं छोटच होत पण एका कार्यक्रमामुळे आज थोडी गर्दी होती.शबानाचे वडील आपल्या मित्रांना सोबत घेऊन आले.शोधाशोध झाली, पण व्यर्थ ! शेवटी रितसर पोलीसांत तक्रार नोंदवण्यात आली.

पोलिसांनी तपास सुरु केला.तपासचक्रे वेगात फीरु लागली.विविध ठिकाणी चौकशा सुरु झाल्या.शक्यता वाटणाऱ्या सर्व ठिकाणी शोधून झाले. इकडे शबाना व सुनील एकमेकांना पहात नजरेस नजर भिडवून भविष्यातील स्वप्ने रंगवत होते." सुनील आपल्याला पकडले तर काय करायचे रे? "शबानाने विचारले. सुनील म्हणाला, " हे बघ शबाना, काही झाले तरी तू विचार बदलायचा नाही. दोघांनी एकच उत्तर द्यायचे." दोघांचेही काय बोलायचे हे ठरले. पण हे जास्त काळ टीकले नाही. दोनचार दिवसातच पोलिसांनी त्या दोघांना शोधून काढले.सुनील च्या एका मित्राच्या घरातून दोघांना पकडून आणलं गेलं.दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हतं.शबानाचे वडील ,त्यांचे मित्र व नातेवाईकांच्याबरोबर पोलीसस्टेशनमध्ये आले.त्यांचा तो अवतार पाहील्यावर शबानाने सांगितलं की, " मी जर घरी गेले तर मला वडील मारून टाकतील.मला सुनीलबरोबरच रहायचे आहे." पोलीसांनी समजावून सांगितले. वडीलांच्या समोर तीला आश्वस्त केल.खूप मिनतवाऱ्या करुन शेवटी ती घरी जायला तयार झाली.तीचं लग्न सुनीलबरोबरच करु पण नंतर ,असे सांगून तीला घरी नेण्यात आलं.

शबाना तर घरी गेली.मात्र सुनीलला अज्ञान मुलीला पळवल्याबद्दल शिक्षा झाली. तुरुंगवास झाला.त्याच सारे भविष्य अंधारात बुडाले.पण आता ऊपयोग काय ?भावनेच्या भरात आपण काय केलं हे सुनील ला कळतं होतं पण आता वेळ निघून गेली होती.त्याच्या नोकरीवर पण गदा आली.प्रेम पोटाला घालत नाही हे परत एकदा सिद्ध झालं. तो तुरुंगात असतानाच काही महीन्यानंतर शबानाचे त्यांच्याच जातीत लग्न लावून दिल गेलं.तीने खूप विरोध केला पण काय ऊपयोग झाला नाही. सुनीलला हे जेव्हा कळाले तेव्हा त्याला खूप दूःख झाले. पण तो समझदार होता.त्याने शबानाला आपल्या मनातच ठेवले.त्याचे प्रदर्शन केलं नाही. तेवढा शहाणपणा दाखवला.दुधाने पोळले की ताक पण फुंकून पितात,तसेच त्याचे झाले होते.त्याला आयुष्यात एक चांगला अनुभवाचा धडा मिळाला होता.

मध्ये एकदा दोनदा शबानाने सुनीलला फोन करुन बोलण्याचा प्रयत्न केला पण यावेळी सुनील ठाम राहिला. त्याला आपल्याबरोबर शबानाचे आयुष्य बरबाद करायचे नव्हते.तो म्हणाला, "हे बघ शबाना, तुझे आता लग्न झाले आहे.तुला तुझ्या संसारात लक्ष घातले पाहिजे. मी तुला असे सांगत नाही की तू मला विसर म्हणून.ते शक्य ही नाही. मीही तूला कधीच विसरणार नाही. पण आतापर्यंत आपले मार्ग वेगवेगळे झाले आहेत.मी सुखी असेनही नसेनही पण निदान तू तरी तुझ्या घरी तू सुखी रहा " सुनील चे बोलणे ऐकून शबानाच्या हृदयात एक सल उठली.तिलाही ते पटले.मनाशी निर्धार करुन तिने डोळ्यात आलेले अश्रू पुसले.मनाच्या एका कोपऱ्यात सुनीलला कायमचे बसवून ती संसारात रमली.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.