Monday, 30 April 2018

अभंग ( व्यसनाचा भस्मासूर )

राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धेसाठी

विषय - व्यसनाचा भस्मासूर

व्यसन जडले । मादक द्रव्याचे ।
वाईट नशेचे । मानवाला ।। १ ।।

वारंवार त्याचे । सेवन करतो ।
धुंदीत राहतो । तो व्यसनी ।। २ ।।

नशा ती चढते । विसरते नाती ।
दारु जे पीती । आपलीच ।। ३ ।।

भस्मासूर पहा । आज व्यसनांचा।
फास जीवनाचा । आवळला ।। ४ ।।

झाली हो चाळण । पहा शरीराची।
लाज ना कशाची । वाटायाची ।। ५ ।।

दारु अफू गांजा । तंबाखू कोकेन।
नको हेराँईन । या देहाला ।। ६ ।।

हो व्यसनमुक्त । घे जबाबदारी ।
तुझ्या शिरावरी । कायमची ।। ७ ।।

आगामी पीढीला । संदेश चांगला
करु देश भला । निर्व्यसनी ।। ८ ।।

रचनाकार
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड . ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

Sunday, 29 April 2018

हास्यकविता ( शिक्षक )

स्पर्धेसाठी

हास्यकविता

शिर्षक -- शिक्षक

ऑनलाईन झाली व्यवस्था ,
ऑफलाईन शिक्षक झाला .
तरीही निघतोच फतवा ,
मेसेज व्हाटस अपवर आला .

सुधारायचाय दर्जा शिक्षणाचा ,
वर्गावर जाउन कसं चाललं ?
माहीती देऊन देऊन खरचं ,
शिक्षक पुरेपूर हो दमलं .

एकच माहिती दहावेळा लिहा ,
शिकवायच सोडून गुरुजी तुम्ही .
नसताना कुणीही वर्गात ,
विद्यार्थी म्हणतात शिकतो आम्ही.

नापास कुणाला करायचे नाही ,
रागाने बघायचसुद्धा नाही.
ऊगवला दिवस तुमचाच आहे,
तक्रार मात्र करायची नाही .

आदेशावर आदेश आता ,
रोजच येऊन धडकतात ,
तणावामुळे कामाच्या या ,
रोज एक शिक्षक गचकतात .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

कविता ( स्वामी विवेकानंद )


काव्यस्पर्धेच्या 10 फेरी

फेरी क्र. 9

विषय -- साईबाबा कींवा स्वामी विवेकानंद

स्पर्धा कोड क्र. VBSS KP 13

शिर्षक - स्वामी विवेकानंद

जीव परमात्म्याचा अवतार ,
मिळाला परमहंसांचा विचार .
आध्यात्मिकतेकडे झुकले ,
विवेकानंदांचे थोर आचार .

माता भुवनेश्वरी धार्मिक ,
जोड तर्कसंगत विचारांची .
पिता दुर्गाचरण विद्वान ,
घडण महान व्यक्तीमत्वाची .

लालसा मनी जागली ,
तीव्र ईश्वर प्राप्तीची .
कुशाग्र बुद्धीच्या जोरावर ,
चढली शिखरे यशाची .

गुरुभक्ती गुरुसेवेची ,
आदर्शवत संस्कारमूल्ये अंगी .
घडविले स्वव्यक्तीत्व निर्दोष ,
जातीभेदरहीत समाज स्वप्नरंगी .

बंधुभगिणीचा घोष दुमदुमला ,
जगी वंदनीय तो झाला .
स्मरण तयांचे स्फूरण देते ,
देशहिताचा विचार तो आला .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

Thursday, 26 April 2018

चारोळी ( काळीपट्टी )

स्पर्धेसाठी

विषय - काळीपट्टी

निषेधासाठी बांधली काळीपट्टी
अत्याचार व बलात्कार विरोधी
गांधारी , न्यायदेवतेने बांधली
डोळ्यावर पट्टी अन्यायाविरोधी .

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

Tuesday, 24 April 2018

हायकू ( हा छंद तुझा )

स्पर्धेसाठी

विषय - हा छंद तुझा

देतो आनंद
मनाला छंद माझा
नी छंद तुझा

छंद आगळा
विरंगुळा मनाला
शांती जीवाला

निसर्गात या
निवांत न्याहाळावे
मन सुखावे

शांत मनाने
जगी या विहरावे
निसर्ग भावे

असा हा छंद
दे आनंद मनाला
या जीवनाला

असावा छंद
एखादा मानवाला
रिझवायला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , तख. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर

Monday, 23 April 2018

कविता ( गरज पुस्तकांची )

स्पर्धेसाठी

विषय - गरज पुस्तकांची

अज्ञानाच्या अंधःकारातून ,
ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्यास.
गरज आहे पुस्तकांची खास ,
जीवनमार्ग विकासाकडे नेण्यास.

पुस्तकच घडवतात मस्तक ,
सारासार विचार जागवतात .
संघर्षाच्या या दुनियेत ,
रस्ता यशाचा दाखवतात.

पुस्तकच आहेत खरे मित्र ,
एकाकीपणा आपला घालवतात.
दुःखात सुद्धा सुखाच्या ,
राजमार्गाचा दरवाजा उघडतात.

पुस्तकच आहेत मार्गदर्शक ,
विवेकबुद्धी जागृत ठेवतात .
नैतिकतेच्या झुल्यावर ,
अलवारपणे झुलवतात .

पुस्तकच आहेत आपला आरसा ,
मनातील भावनांच्या प्रतिबिंबांचा
गोंधळलेल्या मनावरील आवरण ,
बाजूला करणाऱ्या विचारांचा .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

Slogan

For the Competition

We love Mother Earth

Love Mother Earth truly
all direction affecinately
Plant trees more & more
She will keep you safely
Make her beautiful
Without pollution nicely.

Smt. Manik Nagave
Kurundwad , Tal. Shirol ,
Dist Kolhapur

Sunday, 22 April 2018

कविता ( मी बंदिस्त )

स्त्री जीवनावर आधारित भव्य काव्यस्पर्धेसाठी

विषय - मी बंदिस्त

नारी मी बंदिस्त जगते ,
जीवन हे परावलंबी .
वाटत राहते नेहमीच ,
व्हावे मी स्वावलंबी .

पाहता समाजव्यवस्था आजची,
शहारते रोज माझे अंग .
मानसिकता पुरुषी पाहून ,
ऊडतात चेहऱ्यावरील रंग .

दिला धडा धैर्याचा मज ,
जिजाऊ अन् सावित्रीने .
पण पेटलीय आज जनता ,
वावरते ती वासनांधपणे .

बरे वाटतयं बंदिस्त जीवन ,
पाहून निरागसतेवरील बलात्कार.
कानही झालेत बहिरे आता ,
नाही ऐकू येत ते चित्कार .

मी बंदिस्त परंपरेतून ,
बाहेर येण्या धडपडतेय .
समाजकंटकांच्या टोमण्यांनी ,
आपसूकच घायाळ होतेय .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

कविता ( वणवण )

काव्यस्पर्धेसाठी

फेरी क्र.    ०८

कोड क्र.  VBSS KP 13

विषय - पाणी

शिर्षक - वणवण

ऊजाड ओसाड माळावर ,
वणवण फिरते भरभर .

तापला सूर्यदेव माथ्यावर ,
मिळेना पाणी वाटीभर .

चिमुरडी माझी अनवाणी ,
पाण्याविना झाली दीनवाणी .

पाय भाजतात माझे आई ,
नाही चपला माझ्या पायी .

काळजी नको जाईन मी भरभर,
आणिन पाणी मी कळशीभर .

घे आता डोक्यावर तुझ्या हंडा ,
तुडवू आपण माळ हा फोंडा .

वणवण पाण्याची थांबावी ,
गरज जलसमृद्धीची भागावी .

बदलण्या मानसिकता लोकसहभाग हवा ,
मंत्र माणुसकीचा हा
अनमोल ठेवा .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर.

Thursday, 19 April 2018

काव्यांजली ( अनमोल )

स्पर्धेसाठी

काव्यांजली

विषय -- अनमोल

अनमोल आहे
नाते गुरु शिष्याचे
एकात्म भावाचे
सदोदित   ( १ )

जपून ठेवा
ही आदराची नाती
अभिमानाने छाती
फुलावी   ( २ )

स्त्री पुरुष
समानता नेहमी जपा
विषमतेला कापा
विनयाने    ( ३ )

सन्मान करा
माता भगिनी नारीचा
सन्मान शिलाचा
करावा    ( ४ )

सुरक्षित असावी
कोणत्याही वर्गातील नारी
स्त्रीत्वाची चोरी
नकोच    ( ५ )

कर्तव्य आपले
सुजाण आम्ही नागरिक
जनतेचे पाईक
नेहमीच     (  ६ )

चला उठा
आता लागा कामाला
धैर्य लेकीला
द्यावया  ( ७ )

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

Monday, 16 April 2018

चारोळी ( सदिच्छा )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - सदिच्छा

आयुष्य सदा बहरु दे , फुलु दे
राजयोग सदैव दारी झुलु दे
आरोग्यासह संपन्नताही अशी
जीवनी तुमच्या नेहमी डोलू दे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 15 April 2018

शिरोमणी ( आई )

शिरोमणी

आई
प्रेरणा देणारी
माझी प्रेमळ जन्मदात्री
सतत साथ धीर देणारी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Saturday, 14 April 2018

कविता ( संघर्षाचा नेता )

स्पर्धेसाठी

       संघर्षाचा नेता

दीनदलित , पददलितांसाठी,
उदयास एक तारा आला .
बाबासाहेब नांव तयाचे ,
जगामध्ये अमर तो झाला .

विचारमग्न बालमन झाले ,
विषमता पाहून समाजातील .
दूर करण्या ही खोल दरी ,
व्यक्त विचार मनातील .

प्रगाढ अभ्यासक कीर्तीवंत
जगी ठरले थोर विचारवंत .
संविधानाची कीर्ती दिगंत ,
झाले मसिहा ते यशवंत .

बाबासाहेब एक संघर्ष ,
आदर्श ठेविला समाजापुढे .
शिका , एकजुटीने संघर्ष करा ,
हाक दिली बांधवांपुढे .

पाठपुरावा करु विचारांचा ,
सिद्ध करु महामानवाला .
प्रणाम वीरा तव बुद्धीला ,
तेवत ठेवू तव ज्योतीला .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

चारोळी ( हृदयातील बाबासाहेब )

लेखणी माझी देखणी समुह तर्फे आयोजित खुल्या राज्यस्तरीय चारोळी स्पर्धेसाठी

विषय -- हृदयातील बाबासाहेब

नमन महामानवाला करु या
हृदयातील बाबासाहेबांना लक्ष
कैवारी दीनदलितांचे खंबीर
पददलितांसाठी कर्तव्यदक्ष .

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

Friday, 13 April 2018

चारोळी ( महाराष्ट्र माझा )

स्पर्धेसाठी

विषय - महाराष्ट्र माझा

सह्याद्रीच्या या कडेकपारीतून
घुमतो एकच तो नाद गर्जतो
महाराष्ट्र माझा अतिसुंदर हा
मनामनात हा सदैव घुमतो.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर.

सुधाकरी ( साहित्य संसार )

स्पर्धेसाठी

सुधाकरी प्रकार

विषय - साहित्य संसार

प्रवास साहित्य ।
साहित्य संसार ।
हे अपरंपार ।
रे मानवा ।। १ ।।

लेखणी प्रवास ।
चाले निरंतर ।
झरे झरझर ।
भावगर्भ ।। २।।

भावना मनीच्या ।
दाटून त्या आल्या ।
पहा उतरल्या ।
साहित्यात ।। ३ ।।

प्रकार ते खूप ।
लेख , काव्य , भाव ।
कल्पना प्रभाव ।
मनातला  ।। ४ ।।

सशक्त लेखणी ।
असावी सर्वाची ।
नाही सोडायची ।
नितीमत्ता   ।। ५ ।।

कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 11 April 2018

चारोळी ( गुलामगिरी )

स्पर्धेसाठी

गुलामगिरी

नकोच जीणे पारतंत्र्याचे
असहनीय  गुलामगिरी
घास हवा सुखाचा मजला
स्वातंत्र्यातील गरीबाघरी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर

Monday, 9 April 2018

लेख ( चला मानवतेचा मंत्र जपूया )

स्पर्धेसाठी

लेख -      चला मानवतेचा मंत्र जपूया

मानवता कीती महान शब्द . या शब्दातच कीती वजन आहे . मानवतेसाठी अनेक थोर विचारवंतांनी , संतांनी , समाजसुधारकांनी अथक प्रयत्न केले आहेत , व करतही आहेत.मानवता म्हणजे एकमेकांच्या बद्दल असलेला प्रेमभाव , सहसंवेदना , सहानुभूती    होय . मानवता म्हणजे विनाकलह गुण्यागोविंदाने एकत्र राहणे होय .

आज दहशतवादी संघटना आणि समाजविघातक लोक दंगाधोपा , दंगल माजवून सामाजिक ऐक्य व शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.अशावेळी भारतीय जनतेची मानवता आपल्याला दिसून येते.अनेक मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मानवतेचा संदेश लोकांपर्यंत जातो

मानवतेचा मंत्र जपण्यासाठी आपण सर्व एकत्र येण्याची गरज आहे.आजपर्यंत आपण जसे वागलो तसेच वागूया व परकीय व दहशतवादी कारवायांना दूर सारून भारतीय जनतेला शांत वातावरण निर्माण करुन देऊया .

जयहिंद.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

Sunday, 8 April 2018

षटकोळी ( ऊनवारा )

उपक्रम
षटकोळी

ऊनवारा

आला मार्चचा महीना
सगळीकडे ऊनवारा चैत्राचा
झाली उन्हानं काहिली
सोसवेना आता उकाडा
थंड वा-याची झुळुक
तगमग पावसाने थांबली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

षटकोळी ( दुष्काळ )

उपक्रम

षटकोळी

दुष्काळ

दुष्काळाचे सावट आता
हळूहळू निघून जातय
पावसाच्या गोड चाहुलीने
आसमंतातील या बदलांनी
वाट पाहणा-या डोळ्यात
चमक आलीय आनंदाने

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

कविता ( आभाळागत माया )

स्पर्धेसाठी

आभाळागत माया

नाही अंत आभाळाला ,
वाटे टेकले क्षितीज .
पाहू जाता पुढे पुढे ,
जाई पुढेच जसे गतीज .

प्रेम आई बाबांचे असेच ,
जशी आभाळाची माया .
ना संपे ,ना आटे कधीच ,
शब्द अपुरे कौतुक गाया .

असाच राही वाहत ,
वात्सल्याचा अखंड झरा.
जसा वाहतो चोहीकडे ,
बेधुंद , आनंदी हा वारा .

दाटुन मळभ आल्या ,
धुंद पावसाच्या धारा .
मायबापाची माया जशी ,
सुखवी स्नेहाचा हा वारा .

सुखी ठेव देवा आता ,
मागणे एकच हे ऊरी .
संपन्न आरोग्याची कास ,
लाभो हीच प्रार्थना खरी.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

Saturday, 7 April 2018

महिलांचा विकास गरजेचा ( लेख )

शासकीय स्तरावर महिलांच्या विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात खचून न जाता सर्व निराशाजनक परीस्थितींना बाजूला सारून येणाऱ्या दुःखांना हसतखेळत सामोरे जाण्यासाठी एकविसाव्या शतकातील महिलांना सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.लोकसंख्येमध्ये जवळपास निम्म्या संख्येने असणारा स्त्रीवर्ग हा देशाच्या विकासाचा कणा म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गतकाळातील स्त्रीयांची महती गाऊन फक्त चालणार नाही तर त्यासाठी आजच्या स्त्रीवर्गाच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.ग्रामीण भागातील समस्या आजही पूर्णपणे संपुष्टात आल्या नाहीत.सुखसुविधांचा , शिक्षणाचा अभाव व असुरक्षित सामाजिक परिस्थिती , समाजातील बदलती मानसिकता यामुळे खेड्यातील सातवी पर्यंतच्या शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवण्याची मानसिकता पालकांच्या मनात जोर धरू लागली आहे.जेव्हा पटसंख्येसाठी आजूबाजूच्या खेडेगावात आम्ही फीरतो तेव्हा हे विदारक चित्र आम्ही पाहतो.त्यांना खूप समजावून सांगावे लागते.तेव्हा दहावी पर्यंत शिक्षण कसेबसे पूर्ण करतात . पुढे लग्न लावून दिले जाते.आजवर जे चर्या पहात आलेल्या आहेत ,सोसत आलेल्या आहेत त्यामुळे स्वविकास व आरोग्य याकडे दुर्लक्ष केले जाते.

  सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो तिच्या आरोग्याचा .कर्ता पुरुष सकाळी लवकर उठून शेतावर कींवा इतर व्यवसायासाठी बाहेर जातो , तेव्हा जर तिला काही समस्या निर्माण झाल्या तर तिला त्यांची घरी येईपर्यंत वाट पहावी लागते.त्रास सोसावा लागतो.कुणीतरी सांगीतलेले घरगुती उपचार केले जातात.पण काहीवेळा हे उपाय जीविवरही बेतू शकतात.यासाठी शासनाने ग्रामीण भागात आरोग्य केंद्र उभारण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.आरोग्यसेविकांची नेमणूक करून गावातील महिलांना वरचेवर भेटी देऊन प्रत्येक महिलेची आरोग्याची माहिती घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.प्रत्येक महिलेच्या आरोग्यासंबंधीची माहिती जर नोंदवली गेली तर शासकीय स्तरावरून त्याचे निराकरण करणे सोपे जाईल.घराघरामध्ये संडास असलेच पाहिजेत याची सक्ती करायला हवी. ब-याचवेळा संडास बाथरूम नसल्यामुळे महिलांना सकाळी लवकर उठून कींवा संध्याकाळी अंधार पडल्यावर बाहेर जावे लागते. तोपर्यंत तिला त्रास करावा लागल्यामुळे पोटदुखी कींवा पोटासंबधी आजारांना तोंड द्यावे लागते.हल्ली शासकीय योजनांच्या मुळे ब-याच प्रमाणात संडास बांधलेले आहेत पण शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मासिक पाळी संदर्भात सुद्धा अनेक गैरसमज ग्रामीण भागात आहेत.त्यासाठी शासकीय स्तरावर महिलांच्या सुरक्षेसाठी व आरोग्यासाठी महिला कर्मचारी नेमण्यात आले पाहिजेत व जागृती निर्माण केली पाहिजे.कारण या काळात ग्रामीण  महिलांना शारीरिक कष्टाची कामे करावी लागतात.याबद्दलही जागरूकता शास्त्रीय माहिती देऊन मासिक पाळी संदर्भात माहिती सांगितली जावी व याबद्दल चे गैरसमज दुर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.कारण तिच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी असते.ती जर तंदुरुस्त असेल तर ती आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांकडे , मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देउन भावी नागरिक सक्षम बनवू शकेल.परिणामी भारत देश संकर्षण बनेल व योग्य पिढीद्वारे विकास करु शकेल.

विविध सरकारी योजनांची माहिती देऊन त्यांना कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन हवं आहे हे पाहून त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक पातळीवर बचत गट व महिला मंडळे स्थापन करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.यासाठी सतत प्रयत्नशील राहून पाठपुरावा करणे गरजेचे आहे,कारण सातत्य हे गरजेचे आहे.यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.महिला काहिही करु शकते गरज आहे ती फक्त तिला जागृत करण्याची , प्रेरणा देण्याची , जबाबदारी सोपविण्याची.सर्वात महत्त्वाचे तिला आदर देण्याची. आदर द्या,आदर घ्या. घडला सशक्त भारत.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ९८८१८६२५३०

षटकोळी ( कल्पनाशक्ती )

उपक्रम

षटकोळी

कल्पनाशक्ती

अफाट आहे माझी
कल्पनाशक्ती ही थोर
अकल्पीत घटना आज
घडल्या मनाच्या कोंदणात
पाहून धुंद झाले
वेगळा त्यांचा बाज

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर

Friday, 6 April 2018

षटकोळी ( आसमंत )

उपक्रम

षटकोळी

आसमंत

जणू फुलला आसमंत
चोहोबाजूंनी पहा तेजाळला
नभी सूर्यदेव आला
प्रभा सगळीकडे पसरली
धुंद दाही दिशा
अंधार नाहीसा झाला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Thursday, 5 April 2018

आठोळी ( स्मृती )

उपक्रम

आठोळी

विषय -- स्मृती

जागवल्या गोड स्मृती
मनाच्या या गाभाऱ्यात
विसरले देहभान
नाचू लागले तो-यात

स्मृतीच जागवतात
भूतकाळातील जाणिवा
समजतात सहजच
आपल्यातील उणिवा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 4 April 2018

शेल रचना

शेल रचना

चालू आहे परीक्षा आता
आता लिहायचे खूपच
वर्षभराच्या ज्ञानाचा या
या करुया  उपयोगच
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

चित्रचारोळी ( बहिणाबाई )

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

बहिणाबाई खानदेशाची शान
मांडल्या भावना तिने शब्दातून
मानवी, संवेदना मानवतेचा
मेळ सुखावतो तन मनातून

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 3 April 2018

चित्रचारोळी ( अंकुर )

स्पर्धेसाठी

चित्रचारोळी

अंकुर

जरी पडले बंद नळ ते
देती मज आशा जगण्याची
आधाराने त्याच्या उगवले
नाही भिती आता मरण्याची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

काव्यांजली ( उन्हातला पाउस )

स्पर्धेसाठी

काव्यांजली

विषय - उन्हातला पाउस

उन्हातला पाउस
की पाउस उन्हातला
आनंद मनाला
जाहला

आकाशी सुंदर
इंद्रधनुष्य ते अवतरले
रंग खुलले
सप्तरंगी

सोसल्या झळा
खूप या उन्हाच्या
व्यथा मनाच्या
प्रकटल्या

शितल वारा
जोडीला गार धारा
थेंबांचा मारा
सुखावला

सप्तरंग अवतरले
मन मोहून गेले
आनंदी झाले
आपसूकच

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

काव्यांजली ( अंगारकी )

स्पर्धेसाठी

विषय - अंगारकी

अंगारकी चतुर्थी
आली पहा मंगळवारी
नैवेद्य घरी
मोदकाचा

धरु उपवास
दुर्वा मोदक बाप्पाला
आनंदी जाहला
गजानन

पूजू गणेशाला
आकाशी चंद्र पाहू
आरती करु
गजवदनाची

जास्वंदीचे फुल
आवडे लाल रंगाचे
करु मंत्रांचे
उच्चारण

अग्निहोत्री ऋषी
भारद्वाजांनी हो दिला
पृथ्वीगर्भातून जन्मला
अंकारक

स्थान मिळे
त्याला ब्रम्हांडात मंगळाचे
महत्त्व पुण्यलहरींचे
मानवाला

करुन चंद्रदर्शन
भक्तजण उपवास सोडी
जेवणाची गोडी
सुखावते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर

षटकोळी ( माहेर )

उपक्रम
षटकोळी

विषय - माहेर

माहेर माझे भाग्याचे
माझ्या मनाचा आनंद
सदा आसुसलेली मी
आईबाबांच्या रोज भेटीला
जाते मी घाईघाईने
लेक लाडकी मी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Monday, 2 April 2018

षटकोळी ( संयम )

उपक्रम
षटकोळी
संयम

धीर धरावा नेहमी
सयंम दुसरे नांव
यातच दडला आहे
शांतीचा नवा मंत्र
समजून घे मानवा
सुखाचे मर्म आहे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

हायकू ( गुलमोहर )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय - गुलमोहर

गुलमोहर
दारी या बहरला
आनंद झाला    १

आनंदी मन
पाहून याला झाले
नाचू लागले    २

गुलमोहर
सुख देतो मनाला
शांत जीवाला    ३

सुंदरतम
आकार या फुलांचा
जोश मनाचा      ४

केसरी लाल
रंगांची ही झलक
मनमोहक.          ५

     रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा.कोल्हापूर

Sunday, 1 April 2018

कविता ( कष्टाचे मोल )

स्पर्धेसाठी

विषय - कष्टाचे मोल

जाऊ सफलतेच्या गावा ,
खाऊ तेव्हा कष्टाचा मेवा .
नको थकूस तू कधीच ,
सतत काम कर भावा .

जीवन हे क्षणभंगुर ,
तरी लागतंय राबायला .
स्वावलंबनाच्या जोडीने ,
लागू जीवन फुलवायला .

क्रियाशीलता येईल अंगी ,
कर हालचाल अवयवांची .
कष्टाचे मोल समजून घे ,
चांदी होईल आयुष्याची .

कष्टकरी बाप सर्वांचा ,
पोशिंदा तो उभ्या जगाचा .
सलाम करुन त्यांच्या जीवनाला ,
पाया घालून तू यशस्वीतेचा .

स्वकष्टाची चवच न्यारी ,
परावलंबीत्व म्हणजे मरणे .
सोडून तू लाग कामाला ,
झूगारुन लाचार जगणे .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.
९८८१८६२५३०

षटकोळी ( सत्यवचन )

उपक्रम
सत्यवचन

सत्यवचनी राम माझा
वल्ली सीता हर्षाने
ठेविले पावलावर पाऊल
वनवासही तीने पत्करला
नव्हते ठाऊक तीजला
येणा-या संकटाची चाहूल

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

षटकोळी ( संकटमोचन )

उपक्रम
संकटमोचन

संकटमोचन तू असशी
हे लंबोदरा गजानना
वंदन तुजला करते
वदनी तुझीच आरती
मनोभावे मी पूजीते
सतत तूला स्मरते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

कविता ( मी तुमची अर्धांगिनी )

काव्यस्पर्धेच्या १० फेरी साठी

     स्पर्धेसाठी फेरी क्र. ०५

कोड नंबर-- VBSS KP १३

विषय - मी तुमची अर्धांगिनी

सागरात संसाराच्या दोघे ,
वल्हवायची नाव होती .
संसारवेलीवरील दोन फुलांची,
सजवायची रोज प्रित होती.

साथ तुमची या वेलीला ,
शेवटपर्यंत हवी होती .
आधाराची तुमच्या मला ,
खरंच खूप गरज होती .

रंगवली होती स्वप्ने खूप ,
यशस्वी जीवनाच्या वाटेवर .
डाव होता खेळायचा अजून ,
सोडून गेलास तू अर्ध्यावर .

आठवणीने रोज जीव कासावीस,
रोजच्या हुंदक्यांनी भरलाय गळा.
थोपवून अश्रूंना खोचलाय पदर ,
फुलवण्या हा माझा संसारमळा .

मी तुमची अर्धांगिनी नारी ,
बनलीय आता लेक सावित्रीची.
सारून टक्केटोणपे समाजातील ,
पार करतेय मी वाट प्रगतीची .

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.
९८८१८६२५३०