Saturday, 6 October 2018

हायकू ( सागरी तट )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय - सागरी तट

सागरी तट
मोहवितो मनाला
छान शिंपला

तो फेसाळला
दुधाळवर्णी लाटा
आवेश खोटा

सागरी लाटा
झेपावती किनारी
मनी लहरी

गातात रोज
गीत हे जीवनाचे
या सागराचे

येते प्रेरणा
सागरी भव्यतेने
सहजपणे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment