Tuesday, 16 October 2018

आरती ( दुर्गा शक्ती )

स्पर्धेसाठी

आरती

विषय- दुर्गा शक्ती

जय देवी जय देवी जय दुर्गाशक्ती
नमितो भक्तीभावे तूझ्याच पायी।।धृ।।

अगाध महिमा तूझी भक्त गाती।
नावाने तुझीया उपवास करती।।
सर्वांना तू आशिर्वाद देती ।
चरणी तूझीया अशीच राहो भक्ती
।। १।।

प्रेमभावे तूला सर्व वंदिती ।
आयुधे तूझ्या हाती असती ।।
दुष्टांना तू सहजच मारीती ।
मिळो सर्वांना यातून मुक्ती ।।२।।

नऊरुपे तूझी रोज पुजिती ।
नऊरसाने तूला न्हाऊ घालीती।।
नैवद्य नवीन हे रोजच देती ।
राहू दे तूझी छाया हे कृपाशक्ती।।३।।

दुर्गाशक्ती तू आहेस महान ।
तूझ्यापुढे आम्ही सर्व लहान।।
पेलती तू सर्व आव्हानं ।
मग्न सदा तू करण्या नाना युक्ती।।४।।

संहारक तू दुष्टशक्तींचा ।
पालनकर्ती तू शरणार्थींचा ।।
असूदे वरदहस्त तुझ्या प्रेमाचा।
कामना करीतो तूझ्या आशिर्वादाचा ।।५।।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment