Thursday, 11 October 2018

कविता ( पाऊलखुणा )

स्पर्धेसाठी

मुक्तछंद

फेरी क्रमांक - 1

विषय - पाऊलखुणा

इतिहासाचा बोध घेत ,
खुणावतात पाऊलखुणा मनाला.
काही सुखाच्या काही दु:खाच्या...
काही वाटणाऱ्या हव्याहव्याशा,
आमंत्रण देतात पुढे चालण्याला...

पाऊलखुणा वडीलधाऱ्यांच्या,
येणाऱ्या पिढीला सांगत असतात
अनुभवाच्या बोलातून तुम्ही..
आतातरी शहाणपण घ्या रे....
विनवतात थोडं सुधारा रे.....

पाऊलखुणा वर्तमानाच्या,
समाजमनाच्या प्रतिबिंबाच्या
न्याय अन्यायाच्या खेळातील
आपलीच सोंगटी जपणाऱ्या
डाव जिंकायला लावणाऱ्या....

पाऊलखुणा समाजाच्या
रोज विचार करायला लावतात
सुरक्षितता आयाबहिणींची ?
उत्तरासाठी गोंधळून जातात
नाहक वेळ खर्ची घालतात...

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment