Sunday, 23 July 2017

श्रावणमास

स्पर्धेसाठी

          काव्यस्पर्धा

विषय -- श्रावण मास

आला आला श्रावण मास ,
हर्ष मनी दाटुन आला .
उनसावल्यांच्या खेळात ,
शिण सगळा निघून गेला .

धरतीमाता तृप्त झाली ,
तगमग जीवाची शांत झाली.
श्रावणधारांच्या सरीमध्ये ,
अंगअंग न्हाऊन निघाली .

बहरली सृष्टी चहुबाजूने ,
पोपटी ,हिरवा रंग पसरला.
नयनमनोहर दृष्य पाहता ,
मनमंदिरी आनंद जाहला .

ऊनसावल्यांच्या खेळामध्ये ,
सानथोर हे हरवून गेले .
पृथ्वीवरच्या कणाकणातून ,
सोनपिवळे रंग बरसले .

श्रावणमास असा बहरला ,
फुलपानांची नक्षी सजली.
निसर्गमाता हासुन बोले ,
मीच तुमची मायमाऊली .

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

No comments:

Post a Comment