Sunday, 16 July 2017

गरीब पालकाचे शिक्षकांना पत्र

स्पर्धेसाठी

          लेख स्पर्धा

विषय -- गरीब पालकांचे शिक्षकास पत्र

    आदरणीय गुरुजी ( सर )

    सप्रेम नमस्कार ,

    आज ब-याच दिवसांनी तुम्हाला पत्र लिहीत आहे . शाळा सुरु होऊन दोन महिने होत आलेत .माझा मुलगा व मुलगी दोघेही आपल्या शाळेत शिकतात. मे महिन्यातच दोघांनी वह्या, पुस्तके , नविन गणवेश यासाठी तगादा सुरु केला होता .आपल्याला माझी परिस्थिती माहीतच आहे.

कसतरी नियोजन करुन अभ्यासाचा खोळंबा नको म्हणून मी वह्या व पुस्तके घेऊन दिली आहेत . पण गणवेश घ्यायला जमत नाही.आता पंधरा दिवस झाले ती रोज घरात येऊन सांगत आहेत की," शाळेची शिस्त आमचा गणवेश नसल्यामुळे मोडत आहे .
आम्हाला गणवेश द्या नाहीतर आम्ही शाळेला जात नाही."

     हे ऐकुण काळजात चर्र झाल बघा.कारण दोघेही अभ्यासात खूप हुषार आहेत.त्यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत.मला खात्री आहे की माझ्या अपेक्षा हे नक्कीच पूर्ण करतील .पण आजचे त्यांच बोलण मनाला लागल हो !!

     सर एक विनंती आहे एका गरीब पालकाची की फक्त एवढ्या एका कारणांमुळे त्यांचा अपमान करु नका .मी पुढच्या महिन्यात नक्की घेते. आजपर्यंत तुम्ही सहकार्य करत आलात , मी आपली ऊपकृत आहेच.अजून थोडे सहकार्य करा.

     माझ्या मुलांचे भविष्य तुमच्या हाती आहे.

    समजून घेऊन सहकार्य कराल हीच अपेक्षा .

      धन्यवाद सर .

               आपली विश्वासू

       श्रीमती माणिक नागावे


श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

No comments:

Post a Comment