Thursday, 27 July 2017

वारुळ

स्पर्धेसाठी

विषय -- वारुळ

आला सण पंचमीचा ,
पूजा करु नागोबाची .
नका शोधू नागोबाला ,
करु पूजा वारुळाची .

बांधीयला सुंदर छान ,
कामसू मुंग्यानी सुंदर .
मोहवते मनी सकलांच्या ,
भासते त्यांना ते मंदिर .

पूजा नागोबाची करण्या ,
चला पूजू वारुळाला .
दूध , लाह्या, पोळ्या वाहू ,
वाटे संतोष मनाला .

फेर धरुनी गाणी गाऊ ,
झिम्मा,फुगडी ,झोका घेऊ.
करु मुक्त मनीच्या भावना,
नको ताई मनी तुझ्या ठेऊ.

नका मानू एक दिवसाचा ,
भाऊ वारुळाच्या नागोबाला
सखा मित्र माना त्याला ,
हाच संदेश या सणाला .

✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .
9881862530

No comments:

Post a Comment