स्पर्धेसाठी
ये जीवलगा
घेऊन हाती गंध फुलांचा,
धुंद मोगरा बघतो हासून.
जीवलग हा त्या सजनीचा
जीवनी येतो बहर घेऊन .
कुशीमध्ये ह्या निसर्गाच्या ,
चराचरात मी तुला पाहते .
मनमंदिराच्या गाभा-यात,
मूर्ती तुझीच रे वसते .
गाईन रे तुझीच गाणी ,
ओठावरती नाव तुझे .
जीव बावरला सख्या ,
भांबावले मन माझे .
जीव गुंतला तुझ्यात ,
बाहेर कधी येईन का ?
परतूनी या जगी आता ,
तू कधी येशील का ?
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ,
जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment