स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
दळण
नेसून ईरकल मी नार ,
दळण दळते जात्यावर .
शेव पदराचा गोंड्याचा ,
शेणसारवल्या जमीनीवर.
कानात कुडी, गळ्यात माळ
बांधून बुचडा डोईवर .
लाल कुंकु शोभून दिसते ,
धन्याचे समाधान चेहऱ्यावर
बांगड्या भरल्या हाताने ,
धान्य टाकते मूठ मूठभर .
हात दुसरा तयार खुंटीवर ,
फीरवायला जाते गरगर .
डबा पिठाचा माप शेजारी ,
धान्य, पिठाची ताटं सजली.
शुभ्र पांढरी पिठाची धार ,
भरभर बाहेर पडू लागली.
पायात पैंजण शोभून दिसते,
मुडपला पाय दुसरा झोकात
दळता दळता दळण बाई ,
ओवी सुचली ओठात .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment