Sunday, 23 July 2017

दिप उजळूया प्रेमाचे

स्पर्धेसाठी

      कवितास्पर्धा

विषय - दिप उजळूया प्रेमाचे

पारखा झालाय मानव ,
सुखाच्या चार शब्दाला .
दिप उजळूया प्रेमाचे ,
शांतता लाभूदे मनाला .

आधुनिकतेचा लेऊन बाज ,
तरुणाई बेभाण वावरते .
दिप उजळूया प्रेमाचे  ,
घालू संस्कृतीचे बंध ते .

संवेदनारहीत माणुसकीची ,
उघडूया बंद कवाडे आज .
दिप उजळूया प्रेमाचे ,
दाखवूया भावनांचा बाज .

भावी पिढी उभारण्यासाठी ,
गुंफु माळ मुल्य विचारांची .
दिप उजळूया प्रेमाचे गरज, सुजाण नागरिक घडण्याची.

संस्काराचा दिप दारी लावू
धुंद मानसिकता आवरायला
दिप उजळूया प्रेमाचे ,
सुंदर भारत घडवायला .

✍ कवयित्री ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

No comments:

Post a Comment