Sunday, 23 July 2017

आजची जागृत स्त्री -लेख

लेखस्पर्धा

     आजची जागृत स्त्री

        "यत्र नार्यस्तु पूज्यंत्ये रमन्ते तत्र देवता "असे प्राचीन कालापासून स्त्रीसंदर्भात म्हटले जाते . ते खरेही होते .कारण त्याकाळी मातृसत्ताक पद्धती असल्यामुळे स्त्री ही एक देवताच आहे असे समजले जायचे.तिला मान होता.अनेक शोध तिच्या नावावर आहेत.ती विद्याविभूषित होती.अनेक सभांमध्ये त्यांनी विद्वानांना वादविवाद स्पर्धेत हरवलं आहे .याचाच अर्थ असा होतो की स्त्री कालची असुदे नाहीतर आजची असुदे ती जागृत व महानच आहे.

      मध्ययुगीन काळात ती बंधनात अडकत गेली , व तिचा विकास हळुहळु खुंटत गेला व ती पुर्णपणे दुर्लक्षित झाली.पण महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले यांसारख्या महान  समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नातून महीला त्यांच्या  दास्यत्वातून बाहेर आल्या.

    आजची स्त्री सजग , सफल , जागृत आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कारण आज आपण पाहतो ती सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे .अनेक स्त्रीया घरच्या कामांबरोबरच बाहेरील कामे लिलया पार पाडत आहेत. शिक्षणामुळे ती आता विचार करु लागली आहे.आपला व कुटुंबातील सर्वांचा विकास कसा साधायचा हे सहज ती शक्य करुन दाखवून देत आहे.

    घरपण सांभाळता सांभाळता राजकारण , व समाजकारण ही क्षेत्रेपण तीला आता नविन नाहीत सहजच ती हे सर्व करु शकते. घरातील सर्व महत्वाचे निर्णय आता तिला  विचारुन घेतले जातात.

    शहरातील महिला किंवा खेड्यातील महिला असुदे आज आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत जागरुक आहेत.त्यांच्या भवितव्याचा विचार त्या करु शकतात . कित्येक विधवा , परित्यक्ता स्त्रीया या एकट्याने राहून समर्थपणे कुटुंबाला  सांभाळतात.हे सर्व शिक्षणामुळे शक्य आहे. हेही तीला ऊमजले आहे. घरातील कर्ता पुरुष जर हवालदील , दुःखी , निराश झाला तर आपले दुःख बाजूला सारुन ती त्याचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करते व परत त्याला उभे करते.हे एक जागृत स्त्रीच करु शकते.

    सलाम तिच्या कर्तृत्वाला.
व सबलीकरणाला .

     लेखिका

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ, जि. कोल्हापूर , 416106

No comments:

Post a Comment