Sunday, 30 July 2017

प्रेमऋतू

स्पर्धेसाठी

       झटपट चारोळी

       विषय -- प्रेमऋतू

मोरपीसापरी हलके मन
कल्पनांच्या जगात वावरते
प्रेमऋतू म्हणती त्यास जिथे
वेडे चंचल मन हे बावरते.

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,

प्रेम

स्पर्धेसाठी 

                     चारोळी

                         प्रेम

                          ( 1 )

  शोधतोय जो तो आज

  प्रेम एकमेकांत लपलेलं

  माणुसकी गहाण पडलेली

  आपुलकीपासून दुरावलेलं

  

                       ( 2 )

  प्रेम सांधतो दुरावा

  जीवनात  रंग भरताना

  समजूतदारीच्या कुंचल्याने

  चित्र आयुष्याचे काढताना.

    रचना

श्रीमती माणिक नागावे 

कुरुंदवाड , ता. शिरोळ ,

जि. कोल्हापूर ,416106 

9881862530 

कारगिल यशोगाथा

स्पर्धेसाठी

          चारोळी

विषय - कारगिल यशोगाथा

देशासाठी लढत असता
नाही केली तमा संघर्षाची
प्रतिकूलतेतून यश मिळवले
वाढवली शान भारत देशाची

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Friday, 28 July 2017

दळण

स्पर्धेसाठी

             चित्रकाव्य

               दळण

नेसून ईरकल मी नार ,
दळण दळते जात्यावर .
शेव पदराचा गोंड्याचा ,
शेणसारवल्या जमीनीवर.

कानात कुडी, गळ्यात माळ
बांधून बुचडा डोईवर .
लाल कुंकु शोभून दिसते ,
धन्याचे समाधान चेहऱ्यावर
बांगड्या भरल्या हाताने ,
धान्य टाकते मूठ मूठभर .
हात दुसरा तयार खुंटीवर ,
फीरवायला जाते गरगर .

डबा पिठाचा माप शेजारी ,
धान्य, पिठाची ताटं सजली.
शुभ्र पांढरी पिठाची धार ,
भरभर बाहेर पडू लागली.

पायात पैंजण शोभून दिसते,
मुडपला पाय दुसरा झोकात
दळता दळता दळण बाई ,
ओवी सुचली ओठात .

    कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Thursday, 27 July 2017

वारुळ

स्पर्धेसाठी

विषय -- वारुळ

आला सण पंचमीचा ,
पूजा करु नागोबाची .
नका शोधू नागोबाला ,
करु पूजा वारुळाची .

बांधीयला सुंदर छान ,
कामसू मुंग्यानी सुंदर .
मोहवते मनी सकलांच्या ,
भासते त्यांना ते मंदिर .

पूजा नागोबाची करण्या ,
चला पूजू वारुळाला .
दूध , लाह्या, पोळ्या वाहू ,
वाटे संतोष मनाला .

फेर धरुनी गाणी गाऊ ,
झिम्मा,फुगडी ,झोका घेऊ.
करु मुक्त मनीच्या भावना,
नको ताई मनी तुझ्या ठेऊ.

नका मानू एक दिवसाचा ,
भाऊ वारुळाच्या नागोबाला
सखा मित्र माना त्याला ,
हाच संदेश या सणाला .

✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .
9881862530

Wednesday, 26 July 2017

माझा श्रावण

स्पर्धेसाठी

           चारोळी

विषय -- माझा श्रावण

हर्ष मनी दाटुन आला
रोम रोम माझे शहारले
सणउत्सवांचा माझा श्रावण
निसर्ग मन हे मोहरले.

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.
9881862530

वीरमरण

झटपट चारोळी स्पर्धेसाठी

विषय -- वीरमरण

नाही डगमगला शूर जवान
देताना देशासाठी प्राण
पंचप्राणाची देऊन आहुती
पत्करले त्याने वीरमरण.

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर

Tuesday, 25 July 2017

बेकारी

स्पर्धेसाठी

         चारोळी

     विषय ---- बेकारी

शिक्षणाच्या दुकानदारीत
वाढू लागलीय बेकारी
नोकरीसाठी फिरे दारोदारी
पदव्यांचा शिक्का फक्त शिरी

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

पीक

स्पर्धेसाठी

          चित्रचारोळी

पीक पाहून सोन्यावाणी
जीव माझा हारखून गेला
खतपाणी योग्य देतो मी
हाच आधार भविष्याला

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

मन उधाण वा-याचे

स्पर्धेसाठी

         चारोळी

विषय - मन उधाण वा-याचे

मन उधाण वा-याचे आज
बेभाण होऊन वावरते
लगाम ना याला कुणाचा
स्वैर संचार ते करत असते.

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

आग पोटाची

स्पर्धेसाठी

       चित्रचारोळी

       आग पोटाची

आग पोटाची शमविण्यास
बिस्कीटाचाच आधार आहे
परिस्थिती सुधारण्या माझी
मदतीचा हात हवा आहे.

  रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

Sunday, 23 July 2017

अभिषेक

स्पर्धेसाठी

      चित्रचारोळी

दुग्धाभिषेक हा भक्तांचा
शिवलिंगावर असा जाहला
भस्म कपाळी लेऊन जसा
शिवशंकर सामोरी आला.

  रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर

श्रावणमास

स्पर्धेसाठी

          काव्यस्पर्धा

विषय -- श्रावण मास

आला आला श्रावण मास ,
हर्ष मनी दाटुन आला .
उनसावल्यांच्या खेळात ,
शिण सगळा निघून गेला .

धरतीमाता तृप्त झाली ,
तगमग जीवाची शांत झाली.
श्रावणधारांच्या सरीमध्ये ,
अंगअंग न्हाऊन निघाली .

बहरली सृष्टी चहुबाजूने ,
पोपटी ,हिरवा रंग पसरला.
नयनमनोहर दृष्य पाहता ,
मनमंदिरी आनंद जाहला .

ऊनसावल्यांच्या खेळामध्ये ,
सानथोर हे हरवून गेले .
पृथ्वीवरच्या कणाकणातून ,
सोनपिवळे रंग बरसले .

श्रावणमास असा बहरला ,
फुलपानांची नक्षी सजली.
निसर्गमाता हासुन बोले ,
मीच तुमची मायमाऊली .

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

ज्ञानदीप

स्पर्धेसाठी

      आठोळी

विषय - ज्ञानदीप

अज्ञानरुपी अंधारात या
ज्ञानदीप हा लावू चला
विचारांच्या वातीला आता
कृतीचे तेल घालू चला

प्रकाशाने ज्ञानदीपाच्या
नवक्रांतीचे वारे वाहील
नवयुगातील नवयुवक
नवतेजाने ऊजळून जाईल

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

आजची जागृत स्त्री -लेख

लेखस्पर्धा

     आजची जागृत स्त्री

        "यत्र नार्यस्तु पूज्यंत्ये रमन्ते तत्र देवता "असे प्राचीन कालापासून स्त्रीसंदर्भात म्हटले जाते . ते खरेही होते .कारण त्याकाळी मातृसत्ताक पद्धती असल्यामुळे स्त्री ही एक देवताच आहे असे समजले जायचे.तिला मान होता.अनेक शोध तिच्या नावावर आहेत.ती विद्याविभूषित होती.अनेक सभांमध्ये त्यांनी विद्वानांना वादविवाद स्पर्धेत हरवलं आहे .याचाच अर्थ असा होतो की स्त्री कालची असुदे नाहीतर आजची असुदे ती जागृत व महानच आहे.

      मध्ययुगीन काळात ती बंधनात अडकत गेली , व तिचा विकास हळुहळु खुंटत गेला व ती पुर्णपणे दुर्लक्षित झाली.पण महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले यांसारख्या महान  समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नातून महीला त्यांच्या  दास्यत्वातून बाहेर आल्या.

    आजची स्त्री सजग , सफल , जागृत आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कारण आज आपण पाहतो ती सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे .अनेक स्त्रीया घरच्या कामांबरोबरच बाहेरील कामे लिलया पार पाडत आहेत. शिक्षणामुळे ती आता विचार करु लागली आहे.आपला व कुटुंबातील सर्वांचा विकास कसा साधायचा हे सहज ती शक्य करुन दाखवून देत आहे.

    घरपण सांभाळता सांभाळता राजकारण , व समाजकारण ही क्षेत्रेपण तीला आता नविन नाहीत सहजच ती हे सर्व करु शकते. घरातील सर्व महत्वाचे निर्णय आता तिला  विचारुन घेतले जातात.

    शहरातील महिला किंवा खेड्यातील महिला असुदे आज आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत जागरुक आहेत.त्यांच्या भवितव्याचा विचार त्या करु शकतात . कित्येक विधवा , परित्यक्ता स्त्रीया या एकट्याने राहून समर्थपणे कुटुंबाला  सांभाळतात.हे सर्व शिक्षणामुळे शक्य आहे. हेही तीला ऊमजले आहे. घरातील कर्ता पुरुष जर हवालदील , दुःखी , निराश झाला तर आपले दुःख बाजूला सारुन ती त्याचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करते व परत त्याला उभे करते.हे एक जागृत स्त्रीच करु शकते.

    सलाम तिच्या कर्तृत्वाला.
व सबलीकरणाला .

     लेखिका

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ, जि. कोल्हापूर , 416106

पाऊस आणि धरणी

उपक्रम

विषय - पाऊस आणि धरणी

पाऊस आणि धरणी ,
जन्मजन्मांतरीचे नाते .
एकमेकांच्या अलवार भेटीने
गीत नवनिर्मितीचे गाते .

आतुर धरणीमाता झाली ,
वाट पाहते पावसाची .
पोटातील बिजांकुराची ,
सोसवेना तळमळ पाण्याची

आला पाऊस असा बरसत,
तृप्त धरणी तृप्त चराचर.
शांत निवांत धरणीमाता ,
सुख समाधान चेहऱ्यावर .

सजल सुखी धरणी झाली,
सृष्टीत पसरे नवी हिरवाई
पाहून पाऊस निवतो आणि,
साठवतो डोळ्यात नवलाई.

✍ कवयित्री ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

दिप उजळूया प्रेमाचे

स्पर्धेसाठी

      कवितास्पर्धा

विषय - दिप उजळूया प्रेमाचे

पारखा झालाय मानव ,
सुखाच्या चार शब्दाला .
दिप उजळूया प्रेमाचे ,
शांतता लाभूदे मनाला .

आधुनिकतेचा लेऊन बाज ,
तरुणाई बेभाण वावरते .
दिप उजळूया प्रेमाचे  ,
घालू संस्कृतीचे बंध ते .

संवेदनारहीत माणुसकीची ,
उघडूया बंद कवाडे आज .
दिप उजळूया प्रेमाचे ,
दाखवूया भावनांचा बाज .

भावी पिढी उभारण्यासाठी ,
गुंफु माळ मुल्य विचारांची .
दिप उजळूया प्रेमाचे गरज, सुजाण नागरिक घडण्याची.

संस्काराचा दिप दारी लावू
धुंद मानसिकता आवरायला
दिप उजळूया प्रेमाचे ,
सुंदर भारत घडवायला .

✍ कवयित्री ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Saturday, 22 July 2017

मन व बुद्धी

आजचा उपक्रम

      चित्रचारोळी

       बुद्धी व मन

बुद्धी आणि मनाची दोस्ती
असेल तरच जीवन सुंदर
समतोल त्यांचा राखून
तोलुया आपले मनमंदिर

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड  , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,416106

इंद्रधनुष्य

संध्याकाळच्या शांत समयी
इंद्रधनुष्य फुलले गगनी पहा
असाच आनंद मिळो तुम्हा
बहरु दे आयुष्य तुमचे अहा!

श्रीमती माणिक नागावे

पाण्याची साठवण व रक्षण

स्पर्धेसाठी

             चारोळी

विषय - पाण्याची साठवण व रक्षण

साठवण पाण्याची  खरंच
गरज आहे आज काळाची
करु रक्षण त्यासाठी वृक्षांचे
जबाबदारी ही मानवाची

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि.कोल्हापूर, 416106

दुर्लक्षित जगणे

काव्यरत्न आयोजित

राज्यस्तरीय भव्य अॉनलाईन स्पर्धा

विषय - समाजातील दुर्लक्षित स्त्रीया (वेश्या )

     दुर्लक्षित जगणे

भरण्या पोटाची खळगी ,
देह माझा मी वापरते .
जरी सजला वरुन तो ,
आतून गेलाय पोखरुन .

भावनांचा माझ्या आज ,
मांडलाय मी बाजार .
सुखदुःखाच्या फे-यात ,
राहिल्यात त्या दबून .

गरजा तुमच्या भागवता ,
प्राण कंठाशी आला .
माझ्या मनाचा विचार ,
नेहमी गौणच राहिला .

दुर्लक्षित आमचे जगणे ,
मानहानीचीच सोबत .
वाट पाहतोय आम्ही ,
आमच्या सुदैवी सूर्याची .

विचार तुमचे बदला ,
नजर आपोआप बदलेल .
वावरताना या समाजात ,
श्वास मोकळा थोडातरी घेऊ

   कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
9881862530
mknagave21@gmail.com

Friday, 21 July 2017

हरवलेलं प्रेम

स्पर्धेसाठी

          चारोळी

विषय --हरवलेलं प्रेम

अधुनीकतेची पांघरुण शाल
माणुसकी चाललोय विसरत
हरवलेल प्रेम शोधण्यात
चाललीय आपली कसरत.

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ,
जि. कोल्हापूर , 416106

Thursday, 20 July 2017

जीव तुझ्यात गुंतला

उपक्रम

विषय - जीव तुझ्यात गुंतला

जीव हा तुझ्यात गुंतला
गुंतला असा जसा मोगरा
मोग-याचा सुगंधी वास
वासानेच खुलला चेहरा.

✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

जीव तुझ्यात गुंतला

उपक्रम

विषय - जीव तुझ्यात गुंतला

जीव हा तुझ्यात गुंतला
गुंतला असा जसा मोगरा
मोग-याचा सुगंधी वास
वासानेच खुलला चेहरा.

✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

आठवण

उपक्रम

        चारोळी

विषय -- आठवण

तू नसताना मजला येते
ती आहे रे खरी आठवण
सदैव असते विचारांची
माझ्या मनातील साठवण

   ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

निसर्ग

स्पर्धेसाठी

            हायकू

            निसर्ग

         सळसळ ही
   पानांची ऐकू आली
        आनंदी झाली

        वारा सुटला
    गारवा हा वाढला
        तो शहारला

         पाऊस आला
        सरी वरुन सरी
         ती शिरशिरी

          थंडी गुलाबी
     ती साथ निसर्गाची
          एकमेकांची

         निसर्ग माझा
     सखा आहे नेहमी
         निसर्ग प्रेमी

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

वसुंधरा

उपक्रम

       वसुंधरा

वसुंधरा नटली सजली
पानाफुलांनी ही बहरली
हिरवी सृष्टी अवतरली
पाऊस अंगी झेलू लागली

  ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

माझे कुटुंब

स्पर्धेसाठी

           चारोळी

विषय -- माझे कुटुंब

एकदिलाचे माझे कुटुंब
माया ममतेचा असे झरा
इथे नांदतो प्रेम जिव्हाळा
जीवनार्थ हा सापडे खरा.

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

Tuesday, 18 July 2017

सागरी किनारा

ऊपक्रम

            चारोळी

विषय-- सागरी किनारा

बोलवे मज सागरी किनारा
किना-यावरील ते शिंपले
शिंपल्यातील सुंदर मोती
मोत्यांची माळ गळा घातले

    रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Sunday, 16 July 2017

गरीब पालकाचे शिक्षकांना पत्र

स्पर्धेसाठी

          लेख स्पर्धा

विषय -- गरीब पालकांचे शिक्षकास पत्र

    आदरणीय गुरुजी ( सर )

    सप्रेम नमस्कार ,

    आज ब-याच दिवसांनी तुम्हाला पत्र लिहीत आहे . शाळा सुरु होऊन दोन महिने होत आलेत .माझा मुलगा व मुलगी दोघेही आपल्या शाळेत शिकतात. मे महिन्यातच दोघांनी वह्या, पुस्तके , नविन गणवेश यासाठी तगादा सुरु केला होता .आपल्याला माझी परिस्थिती माहीतच आहे.

कसतरी नियोजन करुन अभ्यासाचा खोळंबा नको म्हणून मी वह्या व पुस्तके घेऊन दिली आहेत . पण गणवेश घ्यायला जमत नाही.आता पंधरा दिवस झाले ती रोज घरात येऊन सांगत आहेत की," शाळेची शिस्त आमचा गणवेश नसल्यामुळे मोडत आहे .
आम्हाला गणवेश द्या नाहीतर आम्ही शाळेला जात नाही."

     हे ऐकुण काळजात चर्र झाल बघा.कारण दोघेही अभ्यासात खूप हुषार आहेत.त्यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत.मला खात्री आहे की माझ्या अपेक्षा हे नक्कीच पूर्ण करतील .पण आजचे त्यांच बोलण मनाला लागल हो !!

     सर एक विनंती आहे एका गरीब पालकाची की फक्त एवढ्या एका कारणांमुळे त्यांचा अपमान करु नका .मी पुढच्या महिन्यात नक्की घेते. आजपर्यंत तुम्ही सहकार्य करत आलात , मी आपली ऊपकृत आहेच.अजून थोडे सहकार्य करा.

     माझ्या मुलांचे भविष्य तुमच्या हाती आहे.

    समजून घेऊन सहकार्य कराल हीच अपेक्षा .

      धन्यवाद सर .

               आपली विश्वासू

       श्रीमती माणिक नागावे


श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Friday, 14 July 2017

प्रमाण

स्पर्धेसाठी

         चारोळी

     विषय -- प्रमाण

गरज असते प्रमाणाची
सिद्ध करण्या एखादी गोष्ट
नाहीतर संकल्पनाच त्या
होत नाहीत कधीच स्पष्ट

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Thursday, 13 July 2017

लेखणीतून संवेदना

स्पर्धेसाठी

            चारोळी

     लेखणीतून संवेदना

मनाच्या गाभा-यातील स्वप्ने
शांती देतात जेव्हा मनाला
ज्यामुळेच खरा अर्थ येतो
लेखणीतल्या संवेदनाला

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106 .

Wednesday, 12 July 2017

आभास

स्पर्धेसाठी

        चारोळी

   विषय -- आभास

तुझ्या असण्याचा आभास
आनंद देतसे माझ्या मनाला
नसतानाही तू या जगी
सहवास सुखावतो जीवाला

      रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Tuesday, 11 July 2017

धुंद धुके

स्पर्धेसाठी

        चित्रचारोळी

धुंद धुक्याच्या प्रहरी सख्या
हातात हात घेऊन तुझा
शुभ्रसोनेरी लेवूनी साडी
निवांत, निसर्गी जीव माझा

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Sunday, 9 July 2017

जीवनातील गुरुचे महत्व

स्पर्धेसाठी

       लेख स्पर्धा

विषय -- जीवनातील गुरुचे महत्व आणि संस्कार , संस्कृती

गुरुर्ब्रम्हा , गुरुर्विष्णू , गुरुर्देवो महेश्वरा , गुरुःसाक्षात परब्रम्हं , तस्मैश्री गुरुवेनमः

   गुरु ब्रम्हा , विष्णू , महेश आहे. अशा गुरुंना वंदन 🙏   गुरुची महानता अवर्णनीय आहे . अज्ञानाचा अंधःकार दूर करुन ज्ञानाच्या प्रकाशाची वाट गुरु दाखवतो.

  प्राचीन काळी गुरुगृही शिष्य अध्ययनासाठी , विद्या ग्रहण करण्यासाठी  जात असे.तेथे त्याला शिक्षणासोबत सर्व प्रकारची कामे करावी लागत.त्यामुळे आपोआपच नैतिक मूल्य व श्रमप्रतिष्ठा हे गुण अंगी बाणले जायचे.गुरुंना तेव्हा राजदरबारीही मान होता.

   गुरु ज्योतिसारखा आहे, कारण तो सन्मार्ग दाखवतो. शिष्याच्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश पसरवतो.गुरु म्हणजे जो " लघु " नाही. गुरु संस्काराची खाण आहे.

  आई  ही पहीली गुरु असते.साने गुरुजींनी आपल्या आईलाच गुरुस्थानी मानले होते . त्यांनी  " श्यामची आई " हे मातृप्रेमाचे महन्मंगल स्त्रोत्र असलेले व संस्कारमोतींनी  भरलेले पुस्तक लिहून आईला परमोच्चस्थानी नेऊन ठेवले व तीला सा-या जगात प्रसिध्द व अजरामर केले. आपल्या आईचे संस्कार अंगी बाणवले व त्याप्रमाणे ते वागले.

   निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही गुरुचे म्हणजेच शिकवण्याचे व संस्काराचे काम करते . पशुपक्षी , वृक्षवल्ली आपले गुरुच आहेत.ते आपल्याला दातृत्व शिकवतात.आपल्या दोन्ही हातांनी भरभरून देतात.वृक्ष आपल्याला    "जगा व जगू द्या " हा संदेश देतात.ग्रंथही आपले गुरुच आहेत.ते आपल्याला जीवनात सफलता प्राप्त करण्याचा मार्ग सांगतात.चांगल्या वाईटाची जाणीव करुन देतात.ज्यांच्याकडून आपल्याला घेण्याची भावना होते ते सर्व आपले गुरुच असतात.तसे पहायला गेले तर मुंगी व भुंगा हे दोघेही आपले गुरुच आहेत.कारण ते आपल्याला सतत कार्यरत राहण्याचा संदेश देतात.

  गुरुवरील आपले प्रेम व निष्ठा प्रकट करण्याकरीता गुरुंचा सत्कारच करायला पाहीजे असे नाही , तर गुरुच्या शिकवणुकीचा अंगीकार केला म्हणजे गुरुचा सम्मान केल्यासारखे आहे.

   गुरु संस्कारदेवता आहे.आपल्या आचरणाने आपल्या शिष्यांवर संस्काराचे काम तो करीत असतो.आजच्या युगात जरी अनेक साधने आली तरी गुरुचे महत्व काही कमी झाले नाही.कारण ती साधने चालवायला , शंकांचे निरसन करायला गुरुची गरज आहेच.अद्ययावत ज्ञानाने युक्त गुरु शिष्यांचा विकास सहज घडवून आणू शकतो.शिष्यानेही गुरुची शिकवण अंमलात आणून आपल्यातील चुका जर बाजूला केल्या तर गुरुज्ञान सत्कारणी लागेल.

    अशा या गुरुच्या चरणी लीन होऊया व आदरभावे वंदन करुया.

    लेखिका

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Saturday, 8 July 2017

गुरु

स्पर्धेसाठी

      चारोळी

           गुरु

गुरु महामेरु संस्काराचा
दिपस्तंभ ज्ञानसागरातील
त्रिवार वंदन करु तयाला
भाव साकारुया मनातील

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

Friday, 7 July 2017

आईची माया

स्पर्धेसाठी

         चित्रकाव्य

       आईची माया

शांत निरव सरोवरात ,
विहरतो राजहंस एक .
घेऊन पिलांना पाठीशी ,
कर्तव्य करतो तो नेक .

पंखांच्या गादीवरती ,
निवांत पिले विसावली .
नाही भीती आता कशाची ,
कुशीत आईच्या स्थीरावली.

शुभ्र धवल कापसापरी ,
मऊ मुलायम तुझे अंग.
शोभतसे पहा छान कसा ,
चोचीचा लाल काळा रंग .

थोर ही आईची माया ,
जपे प्राणाहूनही पिले .
स्वर्गही फिका पडे ईथे,
पाहुन प्रेमाचे छान झुले .

   ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि.कोल्हापूर , 416106

Thursday, 6 July 2017

प्रोत्साहन

स्पर्धेसाठी

         आठोळी

     विषय - प्रोत्साहन

यशोशिखर गाठण्यासाठी
हवी पराकाष्ठा प्रयत्नांची
अपयश आले जरी वाटेत
साथीला मदत प्रोत्साहनाची

जीवननौका तरुन जाईल
संघर्षाच्या या सागरात
प्रोत्साहनाच्या वल्ह्याने
यशपताका उंच भवसागरात

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जि. कोल्हापूर ,416106

आक्रंद

स्पर्धेसाठी

          चारोळी

          आक्रंद

आक्रंद हे जनतेचे
ऐकणार कोण आता ?
बोथट झाल्या संवेदना
अश्रुंचा कोण आहे त्राता ?

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Wednesday, 5 July 2017

शांत निखार

स्पर्धेसाठी

      चित्रचारोळी

कोमेजल बालपण भुकेने
शांत चुलीतला निखार
लज्जारक्षण दूरच राहीले
सतावतोय पोटातला अंगार

  रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर,416106

Monday, 3 July 2017

सावळा विठ्ठल

स्पर्धेसाठी

         चित्रचारोळी

सावळा विठ्ठल कटेवरी कर
लल्लाटी टिळा ऊभा मंदिरी
शोभे गळामाळा ,ते पीतांबर 
तृप्त मन माझे झाले श्रीहरी

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

Sunday, 2 July 2017

शाळा

स्पर्धेसाठी

कोणत्याही एका शब्दाने संपलेली ओळ

           शाळा

लळा लाविते मुलां ही शाळा
प्रेम एकता शिकवे ही शाळा
सहकार्याची साक्ष ही शाळा
ज्ञानाचे भांडार ही शाळा

कलहविरहीत ही शाळा
शांततेचे प्रतिक ही शाळा
आनंदाचे भरते ही शाळा
सुहास्य वदनांची ही शाळा

उत्साहाचे भरते ही शाळा
जिव्हाळा वाढवते ही शाळा
कौशल्याचे भांडार ही शाळा
अज्ञान घालवी ही शाळा

ज्ञानरचनावादी ही शाळा
घडवी भावी पिढी ही शाळा
ऊत्सुकतेला थारा ही शाळा
प्रश्नांचे उत्तर देते ही शाळा

देशाचे भविष्य  ही शाळा
भावीपिढीची मूळ ही शाळा
योग्य दिशादर्शक ही शाळा
आभिमान मला माझी ही शाळा

      ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106