*एका पुरुष आणि स्त्री ची निखळ मैत्री होऊ शकते की नाही*
स्त्री व पुरुषाची निखळ मैत्री असू शकते . समाजात एक मानसिकता झाली आहे की स्त्री व पुरुष कोणत्याही नात्याशिवाय मैत्री करु शकत नाही.पण हे खरे नाही.माझ्या मते स्त्री व पुरुष हे एकमेकांचे चांगले मित्र बनू शकतात .मैत्रीला लिंगभेदाचे बंधन नसते . मैत्रीत एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं.
एक स्त्री व पुरुष जर विचारांच्या पातळीवर एकत्र आले तर त्यांच्यात वैचारिक नाते निर्माण होते .विचारांची देवाणघेवाण , एकमेकांना समजून घेणे , भावनांची कदर करणे , संकटसमयी मदत करणे हे सर्व ओघाने येतेच .
पण समाजातील मानसिकता हे मान्य करत नाही.जे या वैचारिक पातळीवर पोहोचले आहेत त्यांना यावर आक्षेप मुळीच नसतो .समाजाने बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे .सर्व नात्यांना एकाच मापात तोलून चालणार नाही .महत्त्वाचे म्हणजे स्त्री व पुरुष या दोघांनीही एकमेकांना पूर्ण ओळखले पाहिजे.मैत्रीत अंधविश्वास कामी येत नसतो . सुज्ञास सांगणे न लगे .
बदलत्या समाजव्यवस्थेत बदलत्या काळानुसार आपणही सामाजिक व वैचारिक पातळीवर बदलले पाहिजे.स्त्री व पुरुष यांची निखळ मैत्री असू शकते हे आपल्या वागण्यातून व व्यक्तिमत्वातून दाखवून दिले पाहिजे.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ
जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment