स्पर्धेसाठी
प्रेमकाव्य
माझी प्रिया
आज आठवण आली प्रियेची ,
दिवस पाहून खासम खास .
भेट पहीली दोघांचीही होती,
आता लागलाय तिचाच ध्यास.
संस्कारांच्या मेळाव्यातून ,
ती अलवार होती आली .
लाजेच्या पापणीतून ,
नजर तीची नेहमीच खाली.
झाली एकदा नजरानजर ,
सगळेच प्रकटले भाव .
दुरुन जरी दिसली तरी ,
घेऊ लागले मन धाव .
मनापासून प्रेम केले ,
सांगणार कोण तिला ?
मनातील भावना तिच्या ,
कळणार कसे आता मला ?
बंध समाजाचे आडवे होते ,
पाऊल पुढे कोण टाकणार ?
प्रित माझी प्रियेला माझ्या ,
जाऊन कोण सांगणार ?
भेटून एकदा बोललो मी,
भावना माझ्या मनातली .
हळूच हसली गालामध्ये ,
तार छेडली हृदयातली .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment