Sunday, 4 February 2018

विवाहितेचा छळ

स्पर्धेसाठी

विषय - विवाहितेचा छळ

आई बाबांची लाडकी लेक ,
भावांची ती पाठीराखी .
आज चालली हो सासरी ,
अश्रू डोळ्यातील चाखी .

केला मानपान कुवतीप्रमाणे,
गोड मानला लाडक्या लेकीने.
पण सासरी पाहता ते सर्व ,
वागवू लागले ते बेकीने .

रोज टोचून आले बोलणे ,
कधी होई उपासमार .
आतातर रोजच झाला ,
पतीदेवांचा तो मार .

भावनांची नाही केली कदर ,
तिने पसरला होता पदर .
माहेरची परिस्थती सादर ,
नाही फुटला मायेचा पाझर .

कधी भडकली शेगडी ,
कधी विहीरीत सापडली .
लाडकी चिमणी पित्याने ,
फासावर लटकताना पाहिली .

      कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment