Monday, 19 February 2018

हिंदवी स्वराज्य

शिवकाव्य स्पर्धेसाठी

विषय - हिंदवी स्वराज्य

जिजाऊचा पुत्र महान ,
दिवा वंशाचा शहाजींचा .
प्रज्वलीत ज्योत जाहली ,
पाया हिंदवी स्वराज्याचा .

करुन संघटीत मावळ्यांना ,
शिक्षण दिले लढण्याचे .
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ,
तंत्र गनिमी काव्याचे .

साम्राज्याचा विस्तार केला ,
तंत्र युद्धनितीचे नविन .
युद्धकला अन् राजनीती ,
व्यवहारातही ते प्रवीण .

सन्मान स्त्री जातीचा ,
मूल्य ठरले जगी महान .
संस्कारांच्या मुशीतून उभारले,
हिंदवी स्वराज्य छान .

कुशल प्रशासक जनतेचा ,
जाणता राजा रयतेचा .
ठरला जगी आदर्श ,
थोर उपासक मानवतेचा .

    कवयित्री
श्रीमती माणिक नागावे,
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

No comments:

Post a Comment