स्पर्धेसाठी
रास
भात आले काढणीला ,
लोंब्या लोंबू लागल्या .
सोन्यागत पिवळ्याधमक ,
पाती बोलावू लागल्या .
भात कापून पेंढ्या ,
छान की हो बांधल्या .
झोडपणीसाठी आता ,
पहा त्या तयार झाल्या .
शेतकरी दादा टाकून खाट ,
झोडपतो पेंढ्या जोरात .
दाणा दाणा होतो बाजूला ,
पडतो राशीच्या ढीगात .
जमली रास खाटेखाली ,
वरून झोडपणी चालूच राही .
रिकाम्या पेंढ्या होती बाजूला ,
त्यांचाही ढीग वाढत राही .
हासून बंगला पाही कौतुकाने ,
कष्टाचं चीज शेतकऱ्यांचे .
रास धान्याची आनंद देई ,
भरून वाही घर शेतकऱ्यांचे .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
No comments:
Post a Comment