Sunday, 4 February 2018

तरुणाईच्या वळणावरती

स्पर्धेसाठी

          चाचणी फेरी

विषय -  तरुणाईच्या वळणावरती

संस्कारांच्या मुशीतून ,
घडते अवघे जीवन .
हाती असते आपल्या ,
पाप करावे की पावन .

लहानपणीचे अनुभव ,
कामी येतात तरुणपणी .
तरुणाईच्या वळणावरती ,
कोसळती ते क्षणोक्षणी .

उत्साह जोम असतो ,
शिगोशीग भरलेला .
विचारांचे वारु मात्र ,
बांधलेला असतो खुंटीला .

विवेकबुद्धी ठेवून गहाण ,
स्वातंत्र्याचे कर्ज काढून .
स्वैराचाराचे भरत व्याज ,
रसातळाला नेते ओढून .

योग्य दिशा स्विकारताना ,
अनुभव ज्येष्ठांचे ऐकून घ्या .
यशस्वी जीवनाच्या मंत्राने ,
भविष्यकाल उज्वल करुन घ्या.

    कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

No comments:

Post a Comment