Friday, 9 February 2018

सोनेरी पहाट

स्पर्धेसाठी.

              चित्रकाव्य

         सोनेरी पहाट

पसरली चोहीकडे आज ,
सुंदर सूर्यकिरणे सोनेरी .
पाहून डोलते मन माझे ,
शोभे वर आकाश चंदेरी .

तेजाळला आसमंत सारा ,
प्रभा उजळून निघाली .
निरव शांततेत आता ,
सूर्यकिरणे नाचू लागली .

झाडांच्या फांदीतून पसरे ,
किरणांचा सुंदर पसारा .
उजळून वृक्ष गेला ,
पाहून आनंदी नजारा .

धरती ही प्रकाशली ,
सुवर्ण किरणांच्या धारेत .
तेज:पुंज भास्कर आता ,
सामावला सहजच धरेत .

रंग जीवनाचे सोनेरी ,
मनमयूर नाचू लागले .
मनमोहक दृश्य पाहून ,
सहजच ते नाचू लागले .

    कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment