स्पर्धेसाठी
विषय -- बळीराजा
शिर्षक - क्षारपड
बावनकशी सोनं म्हणून ,
सगळीकडे सांगत होतो .
अभिमानाने उर माझा फुलला ,
जो तो वळून वळून पाहतो .
नजर कुणाची का , कशी ,
कधी ती लागली ?
का माझंच काय चुकलं ?
का रीत चुकीची वापरली ?
काळ्या मातीचा काळा रंग,
कळेना काय माझे चुकले ?
झालो मी माझ्यातच दंग .
पण हाय हे काय झाले ?
पांढरी माती पाहून
जीव हा फाटला .
मायेचा झरा माते तुझ्या ,
असा कसा गं आटला ?
बावनकशी सोनं आता ,
छारपड की हो झाली .
पोटच्या पोरांची ती मग,
परवडच फार झाली .
हे धरणीमाता,सांग तू ,
आता मी काय करू ?
अभिमान अगतिक झाला ,
सांग आता कसं फिरु ?
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड .ता. शिरोळ
जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment