षटकोळी
माय मराठी
माझी माता मराठी
खूपच महान आहे
गीत गाईन मराठीचे
सतत मी जगी
ठेवीन स्थान उंच
सुंदर माझ्या भाषेचे.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जि. कोल्हापूर
षटकोळी
माय मराठी
माझी माता मराठी
खूपच महान आहे
गीत गाईन मराठीचे
सतत मी जगी
ठेवीन स्थान उंच
सुंदर माझ्या भाषेचे.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जि. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
विषय -- लाभले भाग्य
लाभले भाग्य
जन्मलो तुझ्या पोटी
भरतो तुझी ओटी
प्रेमाने
हे माते
मी तुझा वंश
खरा अंश
आहे
सांभाळून तूला
घेईन मी सदा
हाच वादा
सदोदित
नको काळजी
करु तू उद्याची
गरज विश्वासाची
आहे
कर्तव्य माझे
मी तर करणारच
सुखी ठेवणारच
तूला
पांग तुझे
मी नक्की फेडीन
पाश तोडीन
संसाराचे .
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.
स्पर्धेसाठी
हायकू
विषय -- अंकुर
अंकुर नवा
जमीनीतून आला
पक्ष्यांचा थवा
कोंब वरती
पोपटी व हिरवा
मूळं खालती
पालवी आली
सळसळू लागली
डोलू लागली
अंकुर आता
रोप छानच झाले
हसले स्वत:
सुंदर फुल
रोपावर सजले
कानात डूल
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ता.शिरोळ
जि.कोल्हापूर .
स्पर्धेसाठी
षटकोळी
विषय -- विस्मृती
विस्मृतीत जाऊ द्या
वाईट प्रसंग जीवनातले
पाठपुरावा करून चांगल्याचा
अहंकारी वृत्तीला गाडून
नम्रतेला देऊ थारा
हाती कलश मांगल्याचा.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जि. कोल्हापूर.
स्पर्धेसाठी
आठोळी
विषय -- मायेचे पाश
बांधून ठेवतील एकत्र
मायेचे पाश एकमेकांना
हवी त्यासाठी हृदयातच
प्रेमरुपी गोड संवेदना
पाश मायेचे हो गरजेचे
कुटुंब ऐक्य सांधण्यासाठी
आलेख प्रगतीचा आपल्या
सतत उंचच नेण्यासाठी.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर
उपक्रम
अहंकार
द्या सोडून मीपणा आपला
बाजूला जाईल अहंकार
मानापमानाच्या दुनियेत
स्वकर्तृत्वाचा झेंडा पार
अहंकारी मनामधूनच
प्रसवतात फक्त वेदना
मनमिळावू स्वभावामुळे
छेडल्या मनातल्या या ताना
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ता .शिरोळ
कोल्हापूर
उपक्रम
षटकोळी
तुझ्या सोबत असताना
शांत निवांत मी
निर्धास्त तुझ्या खांद्यावर
तुझ्या सोबत असताना
जगाची फिकीर कशाला
सोबत बाबा असताना
सूर सापडतील गाताना
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ता.शिरोळ
जि.कोल्हापूर.
उपक्रम
विषय -- क्षणिक भेट
क्षणिक भेटीनेसुद्धा होते
जीवाची या कालवाकालव
समजून येत नाही कधी
मनाला या फुटला पालव
भेट क्षणाची चिरतरुण
चेतवीत राहते मनाला
समजत नाही दोघांनाही
सांगावे आता आम्ही कुणाला .
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ता.शिरोळ
जि. कोल्हापूर
काव्यांजली
विषय -- कारण
कारण अभ्यासाचे
परीक्षा जवळ आली
गडबड झाली
सगळ्यांची
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,
उपक्रम
निर्माता
नाविण्यपूर्ण संशोधनाने
नवनिर्मीतीचा तू निर्माता
अनाकलनीय तूझी कृती
तूच कर्ता तूच करविता
सहजच घडविशी धरा
अतुलनीय त्या आश्चर्याने
मानव अचंबित होतसे
पहात बसतो कौतुकाने.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर
उपक्रम
षटकोळी
फक्त ती
आठवणीत राहते नेहमी
फक्त ती आई
जरी विसरली मुले
तरी आशीर्वाद देते
सतत ती त्यांना
समजते त्यांना फुले
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर
शब्दरसिक च्या स्पर्धेसाठी
चारोळी
विषय -- शब्द
शब्द खूपच ताकदवार
घडविण्यासाठी एखाद्याला
रसातळाला ही नेतात ते
मर्यादा ठेवा उच्चारण्याला
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.
उपक्रम
घमेंड
नसावी कधीच घमेंड कुणाला
कर्तव्य आपले करत जावे
समजूतदारीच्या या दुनियेत
समंजसपणे वागत जावे
यशाचा आलेख वरच जातो
प्रयत्न सतत केल्यावर
गर्व नसावा कधीच त्याचा
यश हातात आल्यावर .
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.
उपक्रम
कर्तव्य
कर्तव्य आहे सर्वांचे
जबाबदारी आपली सांभाळणे
सोपविलेले काम करावे
पळवाट न शोधता
तरच मिळेल यश
नेहमी आनंदानेच रहावे.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.
उपक्रम
विषय. बिनधास्त
कीती बिनधास्त असतात
निरागस लहान मुले
नाही स्थान कपटाला
असावं असंच सर्वांनी
कलह होतील दूर
आनंद होईल भारतमातेला.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,ता.शिरोळ,
जि. कोल्हापूर
शिवकाव्य स्पर्धेसाठी
विषय - हिंदवी स्वराज्य
जिजाऊचा पुत्र महान ,
दिवा वंशाचा शहाजींचा .
प्रज्वलीत ज्योत जाहली ,
पाया हिंदवी स्वराज्याचा .
करुन संघटीत मावळ्यांना ,
शिक्षण दिले लढण्याचे .
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ,
तंत्र गनिमी काव्याचे .
साम्राज्याचा विस्तार केला ,
तंत्र युद्धनितीचे नविन .
युद्धकला अन् राजनीती ,
व्यवहारातही ते प्रवीण .
सन्मान स्त्री जातीचा ,
मूल्य ठरले जगी महान .
संस्कारांच्या मुशीतून उभारले,
हिंदवी स्वराज्य छान .
कुशल प्रशासक जनतेचा ,
जाणता राजा रयतेचा .
ठरला जगी आदर्श ,
थोर उपासक मानवतेचा .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे,
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .
षटकोळी
क्षत्रपती
थोर राजा शिवछत्रपती
रयतेचा वाली होता
कार्यधुरंधर राजा शिवाजी
प्रजाहितदक्ष मराठमोळा महान
चाड स्त्री-सन्मानाची सदैव
आदर्श जिजाऊ माताजी
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर
स्पर्धेसाठी
काव्यस्पर्धा - फेरी क्रं ०१
कोड नं-.- VBSS KP 1
विषय -. रंग जीवनाचे
कधी हसवे कधी फसवे ,
असतात रंग जीवनाचे .
कधी,कुठे कोणता रंग ,
उमजत नाही कसे भरायचे.
रंग भावभावनांचे ,
हजार असतात छटा .
वापरायलाच विसरत चाललोय ,
हात झालाय थिटा .
बालपणातील निरागसता ,
कुमारांमधील अशांतता .
प्रौढामधील वैचारिकता ,
वृद्धावस्थेतील सहनशीलता.
भविष्यकाळ सुनावतोय ,
घ्या ज्ञान तंत्रज्ञानाचे .
तरच रंग भरतील जीवनात,
युग हे संगणकाचे .
जीवनाच्या रंगात रंगूया ,
सकारात्मकता अंगी बाणवूया.
मानवतेच्या रांगोळीने ,
जीवन सुंदर बणवूया .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,ता. शिरोळ,
जि.कोल्हापूर.9881862530
स्पर्धेसाठी
पावित्र्य प्रेमाचे
पावित्र्य प्रेमाचे आज राखू चला
प्रेमाचा संदेश नवा देऊ चला
मानवता व संवेदनशीलता
अंगी बाणवून जगूया चला
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि. कोल्हापूर
आठोळी
प्रेमगंध
प्रेमगंधाच्या झुल्यावर
हिंदोळे घेतात प्रेमी
भेटीच्या ओढीसाठी
शक्कल लढवतात नामी
सुचतात सहजच त्यांना
कल्पना कीती अफलातून
विश्र्वास नाही बसत कुणाचा
काय निघेल त्यांच्या कल्पनेतून
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
प्रेमकाव्य
माझी प्रिया
आज आठवण आली प्रियेची ,
दिवस पाहून खासम खास .
भेट पहीली दोघांचीही होती,
आता लागलाय तिचाच ध्यास.
संस्कारांच्या मेळाव्यातून ,
ती अलवार होती आली .
लाजेच्या पापणीतून ,
नजर तीची नेहमीच खाली.
झाली एकदा नजरानजर ,
सगळेच प्रकटले भाव .
दुरुन जरी दिसली तरी ,
घेऊ लागले मन धाव .
मनापासून प्रेम केले ,
सांगणार कोण तिला ?
मनातील भावना तिच्या ,
कळणार कसे आता मला ?
बंध समाजाचे आडवे होते ,
पाऊल पुढे कोण टाकणार ?
प्रित माझी प्रियेला माझ्या ,
जाऊन कोण सांगणार ?
भेटून एकदा बोललो मी,
भावना माझ्या मनातली .
हळूच हसली गालामध्ये ,
तार छेडली हृदयातली .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
चारोळी
विरह
विरह तुझा नी माझा
आता संपणार नाही
वाट पाहण्यातही आता
अर्थ काही राहिला नाही .
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, या. शिरोळ,
जि. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
अंतरंगी
अंतरंगी असावे निर्मळ
नको बाहेर सोज्वळ
माथा असावा ऊज्वल
मन असावे प्रेमळ .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
स्पर्धेसाठी
ममता
ममता आईची माझ्या
कधी ना कमी व्हायची
चित्त तिचे माझ्यापाशी
दूर जरी मी जायची .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
भावना मनाची छान
समजून तू घेशील ना
मनातील संवेदना आता
जाणून तू घे ना .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
स्पर्धेसाठी
विषय -- बळीराजा
शिर्षक - क्षारपड
बावनकशी सोनं म्हणून ,
सगळीकडे सांगत होतो .
अभिमानाने उर माझा फुलला ,
जो तो वळून वळून पाहतो .
नजर कुणाची का , कशी ,
कधी ती लागली ?
का माझंच काय चुकलं ?
का रीत चुकीची वापरली ?
काळ्या मातीचा काळा रंग,
कळेना काय माझे चुकले ?
झालो मी माझ्यातच दंग .
पण हाय हे काय झाले ?
पांढरी माती पाहून
जीव हा फाटला .
मायेचा झरा माते तुझ्या ,
असा कसा गं आटला ?
बावनकशी सोनं आता ,
छारपड की हो झाली .
पोटच्या पोरांची ती मग,
परवडच फार झाली .
हे धरणीमाता,सांग तू ,
आता मी काय करू ?
अभिमान अगतिक झाला ,
सांग आता कसं फिरु ?
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड .ता. शिरोळ
जि. कोल्हापूर
स्पर्धेसाठी.
चित्रकाव्य
सोनेरी पहाट
पसरली चोहीकडे आज ,
सुंदर सूर्यकिरणे सोनेरी .
पाहून डोलते मन माझे ,
शोभे वर आकाश चंदेरी .
तेजाळला आसमंत सारा ,
प्रभा उजळून निघाली .
निरव शांततेत आता ,
सूर्यकिरणे नाचू लागली .
झाडांच्या फांदीतून पसरे ,
किरणांचा सुंदर पसारा .
उजळून वृक्ष गेला ,
पाहून आनंदी नजारा .
धरती ही प्रकाशली ,
सुवर्ण किरणांच्या धारेत .
तेज:पुंज भास्कर आता ,
सामावला सहजच धरेत .
रंग जीवनाचे सोनेरी ,
मनमयूर नाचू लागले .
मनमोहक दृश्य पाहून ,
सहजच ते नाचू लागले .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.
स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
बाजार
मांडलाय बाजार भाजीपाल्यांचा
पण नाही आनंद चेहऱ्यावर
मिळेना हमीभाव मालाला माझ्या
संसार माझा चालला वाऱ्यावर.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर.
स्पर्धेसाठी.
काव्यांजली
विषय -- आभास
आभासी दुनिया
छळते रोज मला
माहित कुणाला
नाहीच
आभासी परिस्थिती
वाटते मला खरी
तरीही बरी
थोडीशी
आभास स्वप्नांचा
आनंद , दु:ख देतो
सहजच घेतो
मनावर
आभास मानवतेचा
वाटतो आहे सर्वांना
मूल्य कृतींना
शून्यच
आभास लोकशाहीचा
काही प्रसंगी जाणवतो
खून होतो
पदोपदी
जागवा माणुसकी
गाडून खोल असत्याला
घालवून भ्रष्टाचाराला
कायमचाच
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ,
जि. कोल्हापूर
भव्य चारोळी स्पर्धा
विषय - प्रेम करावे शतदा
यशस्वी जीवनासाठी नेहमी
जोड हवी जिद्द चिकाटीची
प्रेम करावे शतदा जीवनावर
गरज निरोगी आयुष्याची
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर
झटपट चारोळी स्पर्धा
विषय - व्यसन
करते शरीराची नासाडी
रहा दूर व्यसनापासून
व्यसनाने होते अधोगती
समजून घ्या पहिल्यापासून
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,ता.शिरोळ
जि.कोल्हापूर
*एका पुरुष आणि स्त्री ची निखळ मैत्री होऊ शकते की नाही*
स्त्री व पुरुषाची निखळ मैत्री असू शकते . समाजात एक मानसिकता झाली आहे की स्त्री व पुरुष कोणत्याही नात्याशिवाय मैत्री करु शकत नाही.पण हे खरे नाही.माझ्या मते स्त्री व पुरुष हे एकमेकांचे चांगले मित्र बनू शकतात .मैत्रीला लिंगभेदाचे बंधन नसते . मैत्रीत एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं.
एक स्त्री व पुरुष जर विचारांच्या पातळीवर एकत्र आले तर त्यांच्यात वैचारिक नाते निर्माण होते .विचारांची देवाणघेवाण , एकमेकांना समजून घेणे , भावनांची कदर करणे , संकटसमयी मदत करणे हे सर्व ओघाने येतेच .
पण समाजातील मानसिकता हे मान्य करत नाही.जे या वैचारिक पातळीवर पोहोचले आहेत त्यांना यावर आक्षेप मुळीच नसतो .समाजाने बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे .सर्व नात्यांना एकाच मापात तोलून चालणार नाही .महत्त्वाचे म्हणजे स्त्री व पुरुष या दोघांनीही एकमेकांना पूर्ण ओळखले पाहिजे.मैत्रीत अंधविश्वास कामी येत नसतो . सुज्ञास सांगणे न लगे .
बदलत्या समाजव्यवस्थेत बदलत्या काळानुसार आपणही सामाजिक व वैचारिक पातळीवर बदलले पाहिजे.स्त्री व पुरुष यांची निखळ मैत्री असू शकते हे आपल्या वागण्यातून व व्यक्तिमत्वातून दाखवून दिले पाहिजे.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ
जि. कोल्हापूर
स्पर्धेसाठी आठोळी
विषय - विश्वासघात
विश्वासाच्या धाग्यालाच
लागतो जेंव्हा सुरुंग
विश्वासघात म्हणती त्याला
नसते प्रेम तिथे उत्तुंग
नात्यांची होते बांधणी
याच्याच आधारावर
कुणीच राहणार नाही
मग याच्या भरवशावर .
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
विषय - विवाहितेचा छळ
आई बाबांची लाडकी लेक ,
भावांची ती पाठीराखी .
आज चालली हो सासरी ,
अश्रू डोळ्यातील चाखी .
केला मानपान कुवतीप्रमाणे,
गोड मानला लाडक्या लेकीने.
पण सासरी पाहता ते सर्व ,
वागवू लागले ते बेकीने .
रोज टोचून आले बोलणे ,
कधी होई उपासमार .
आतातर रोजच झाला ,
पतीदेवांचा तो मार .
भावनांची नाही केली कदर ,
तिने पसरला होता पदर .
माहेरची परिस्थती सादर ,
नाही फुटला मायेचा पाझर .
कधी भडकली शेगडी ,
कधी विहीरीत सापडली .
लाडकी चिमणी पित्याने ,
फासावर लटकताना पाहिली .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.
स्पर्धेसाठी
अष्टाक्षरी काव्यस्पर्धा
विषय - माणुसकी हरवली
आजकाल या जगात ,
माणुसकी हरवली .
सगळेच म्हणतात ,
संवेदना गमावली .
दररोज पडतात ,
खून इथे बांधवांचे .
भारतीय आम्ही एक ,
मोल ना या आसवांचे .
बंद ,दंगा , मारामारी ,
रोज होतो संप पहा .
पेटवली ज्योत कुणी ?
लक्ष ते देऊन पहा .
बलात्कार होतातच ,
असो बालिका , तरुणी .
नाती संपवली त्यांनी ,
वासनांध नजरांनी
थांबणार आहे का हे ,
सत्र अमानवतेचे ?
येऊ द्या या पुन्हा जगी ,
रंग हो मानवतेचे .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
स्पर्धेसाठी
चाचणी फेरी
विषय - तरुणाईच्या वळणावरती
संस्कारांच्या मुशीतून ,
घडते अवघे जीवन .
हाती असते आपल्या ,
पाप करावे की पावन .
लहानपणीचे अनुभव ,
कामी येतात तरुणपणी .
तरुणाईच्या वळणावरती ,
कोसळती ते क्षणोक्षणी .
उत्साह जोम असतो ,
शिगोशीग भरलेला .
विचारांचे वारु मात्र ,
बांधलेला असतो खुंटीला .
विवेकबुद्धी ठेवून गहाण ,
स्वातंत्र्याचे कर्ज काढून .
स्वैराचाराचे भरत व्याज ,
रसातळाला नेते ओढून .
योग्य दिशा स्विकारताना ,
अनुभव ज्येष्ठांचे ऐकून घ्या .
यशस्वी जीवनाच्या मंत्राने ,
भविष्यकाल उज्वल करुन घ्या.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .
स्पर्धेसाठी
रास
भात आले काढणीला ,
लोंब्या लोंबू लागल्या .
सोन्यागत पिवळ्याधमक ,
पाती बोलावू लागल्या .
भात कापून पेंढ्या ,
छान की हो बांधल्या .
झोडपणीसाठी आता ,
पहा त्या तयार झाल्या .
शेतकरी दादा टाकून खाट ,
झोडपतो पेंढ्या जोरात .
दाणा दाणा होतो बाजूला ,
पडतो राशीच्या ढीगात .
जमली रास खाटेखाली ,
वरून झोडपणी चालूच राही .
रिकाम्या पेंढ्या होती बाजूला ,
त्यांचाही ढीग वाढत राही .
हासून बंगला पाही कौतुकाने ,
कष्टाचं चीज शेतकऱ्यांचे .
रास धान्याची आनंद देई ,
भरून वाही घर शेतकऱ्यांचे .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
स्पर्धेसाठी
विषय -- धोका
विश्वासावर चालते दुनिया ,
देऊ नका कुणी धोका .
जरी आला तुमच्यावर ,
प्रसंग कितीही बाका .
घात विश्वासाचा होतो ,
जवळच्याच व्यक्तीकडून .
मन आक्रंदत राहते ,
धावते जीव तोडून .
मुलं देतात आईबापांना ,
धोका कीर्ती निर्लज्जपणे .
आनंदी जीवनाच्या स्वप्नात ,
बसून राहतात सुन्नपणे .
जो तो आपल्या सोयीने ,
अर्थ धोक्याचा बदलतो .
चेहऱ्यावर सतत बदलणारा ,
मुखवटा तो लावतो .
आतबाहेर एकच असावे ,
नको कटकारस्थान .
बना नेहमी दुसऱ्यांसाठी ,
कायमचे प्रेरणास्थान .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर