Sunday, 28 January 2018

सोड व्यसनाला

स्पर्धेसाठी

काव्यस्पर्धेच्या १० फेरी -  चाचणी फेरी

कोड क्र. -- VBSS KP 13

विषय - व्यसनमुक्ती

शिर्षक - सोडून व्यसनाला

नको जाऊ तू मानवा ,
व्यसनाच्या आहारी.
नको बनवून शरीर ,
कैक रोगांचे आगर .

दारू , गुटखा , मावा ,
सिगारेट अन् बिडी .
क्षणभर मिळेल आनंद ,
शरीराची होईल चाळण ‌.

नासाडी पैशाची झाली ,
दारी गरीबी आली .
तरीही सुटेना हौस ,
जागा कधी तू होणार ?

सोडून व्यसनाला ,
बन तू सशक्त मानव .
भावी भारताच्या नशिबी ,
येऊ दे व्यसनमुक्तीचा नारा .

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment