Friday, 5 January 2018

दंगा

घे भरारी समूह

फेरी क्रं. 10

विषय -- अष्टाक्षरी

           दंगा

दोष कुणाचा तो होता ?
शिक्षा कुणाला ती झाली ?
सगळेच त्रासलेले ,
लोकं अशी का वागली ?

आज माझा प्रश्न आहे ,
तुम्ही काय हो साधले ?
शांत जनता हो होती ,
विष दंग्याचे पेरले ?

भाऊ भाऊ आम्ही सारे ,
बंधुभाव जोपासावा .
वैरभाव दूर सारा ,
प्रेमभाव बाळगावा .

करु नका दंगे धोपे ,
जाळपोळ , मारहाण .
येतो मग सगळ्यांना ,
अकारण खूप ताण .

नको हिंसा , मारझोड ,
मार्ग शांततेचा छान .
जगी भारताची ठेवा ,
उंच सतत ती मान .

    कोड नं. -- 2284

No comments:

Post a Comment