घे भरारी महास्पर्धा
फेरी क्र 11
विषय -- सैनिक जीवन
शीर्षक --- समर्पित जीवन
भारतमाता माझी माता ,
गातो तीचे गौरवगान .
अर्पून तन मन धन ,
उंच ठेवीन सदा मान .
रक्षणास मातृभूमीच्या ,
दक्ष सदा मी सीमेवर .
लाख संकटे आली तरी ,
समर्पित प्राण देशावर .
देशवासीयांच्या खुशीसाठी ,
त्यागीले आम्ही घरदार .
झेलल्या गोळ्या दुष्मनांच्या ,
छातीवर आमच्या भरदार .
असतात लागलेले डोळे ,
घरच्यांचे आमच्या वाटेकडे .
थकून जाती बायका पोरे ,
दाद मागणार कोणाकडे ?
नका विसरु आम्हाला ,
भावना आमच्या जाणून घ्या .
नका देऊ दुसरे काही ,
पाठीवर कौतुकाची थाप द्या.
कोड क्र -- २२८४
No comments:
Post a Comment