घे भरारी साहित्य मंच
महाकाव्य स्पर्धा - २०१७-२०१८
फेरी क्रं . १२
विषय - माय मराठी वर कविता
शीर्षक -- माय मराठी
स्पर्धक कोड क्रं.- SKS/S 5⃣5⃣5⃣7⃣
माय मराठी माझी माता ,
नाही उणे कुठे सापडणार .
गर्व असणार नेहमीच ,
मान अभिमानाने उंचावणार .
वळवावे तशी वळते ही ,
अर्थ घेऊ समजावून .
गरज आहे त्यासाठी ,
ऐकायची ती मन लावून .
माता जशी समजून घेते ,
पोटच्या लेकराला .
तशी वाट करून देते ही ,
मनातील भावनेला .
बाज हिचा असे वेगळा ,
सान -थोरांची ही भाषा .
नसे वाटे ही परकी ,
आहे सर्वांचीच आशा.
माय मराठीची गाऊ गाथा,
मिळवून एक सूर एक ताल .
कर्तव्य आपले समजून घेऊ ,
सदा ठेऊ हिचे उन्नत भाल.
No comments:
Post a Comment