स्पर्धेसाठी
विषय - सण आनंदाचा
स्नेह वाढला तिळाने ,
गोडवा वाढला गुळाने .
सण आनंदाचा आला ,
साजरा करा आनंदाने .
गोड बोलूया प्रेमाने ,
सौख्य नांदेल घरोघरी .
नाती होतील आपोआप ,
हास्य येईल दारोदारी .
आनंदाने जगूया ,
जगण्यास मदत करुया .
सहकार्याच्या वृत्तीने ,
एकमेका सहाय्य करुया .
हृदयी अमृत भरुया ,
गोड गळ्याने गाऊया .
हर्षित मनाने नाचूया ,
समाधानी सर्वांना करुया .
सण आनंदाचा खरा ,
जसा प्रेमाचा हा झरा .
नका विचारु याचा तोरा ,
मोद देई लहान थोरा .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर ,
9881862530 .
No comments:
Post a Comment