Monday, 1 January 2018

माता सावित्री

स्पर्धेसाठी

       माता सावित्री

माता सावित्री ती महान ,
ठरली स्त्रियांची त्राता .
स्त्रिशिक्षणाचे दरवाजे केले,
उघडे , ती जोतिबांची कांता.

ठरली भारतातील पहिली ,
शिक्षित , शिक्षिका , मुख्याध्यापिका .
महिला,दलितांची ऊद्धारकर्ती .
स्त्रिवर्गाची प्रेमळ अध्यापिका.

साहिला विरोध समाजाचा,
शेणगोळे,दगड स्विकारले.
क्षणभर न डळमळे निर्धार,
चालूच कार्य जे अंगीकारले.

स्त्रिशिक्षणाचे अवघड कार्य,
सहज पेलले क्रांतीज्योतीने.
घडवली क्रांती समाजात ,
ऊजळली ज्योतीच्या प्रकाशाने.

महानायीका प्रणाम तुजला,
लेकी आम्ही सावित्रीच्या .
वसा चालवू पुढेच आम्ही,
स्विकार प्रणाम या लेकीचा.

        कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर .

No comments:

Post a Comment