Friday, 30 June 2017

भेगाळलेली पावले

स्पर्धेसाठी

        चित्रकाव्य

    भेगाळलेली पावले

झोपलो मी निवांत वारकरी,
जरी भेगाळले पाय माझे  .
माखले धुळीने,पडल्या चिरा
तरीही शांततेत मन माझे .

थकलो जरी फिरुनी वारीत,
ऊमेदीत मन जगते आहे .
ना अपेक्षा आंथरुणाची ,
धरतीमाताच पुरेशी आहे .

अनवानी पायी प्रवास करतो
दूर ती पंढरी विठुरायाची .
रक्ताळले तळवे अन् टाचा ,
ना खंत आता मनी कशाची.

साक्ष देती सच्चेपणाची ,
शुभ्र पांढरी अंगी वसने.
बिनघोर झोपणे नशीबी ,
निरागस मनाचे असणे .

  ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

No comments:

Post a Comment