स्पर्धेसाठी
कवितेची विण
बाहेर येण्या धडपडतात ,
मनातील हे भावतरंग .
प्रसवली कवितेची विण ,
मोकळे झाले अंतरंग .
भावभावनांचा खेळ हा ,
शब्दातून अलवार प्रकटतो . मनातील सुप्त विचारांचा,
मेळा चांगलाच भरवतो .
मनमंदिरातील देवता ,
शब्दमूर्तीत घेते आकार .
सौंदर्य तीचे काय वर्णू ?
मंदिराचे जरी अनेक प्रकार.
अव्यक्तांचे व्यक्त होणे ,
सर्व शब्दांत पकडणे .
हीच कवितेची विण असते,
होते सुंदर रचनांचे विणणे .
झाले निरभ्र हे मन ,
मिळाली मनास धन्यता .
विसावा मिळाला पहा , शांत झाली मनाची आर्तता
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment