स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
आधार
धनी तुझा , बाप माझा ,
गेलाय मोर्चात अन् संपावर . खेळवणार कोण मला ?
तू घे मला शिंगावर .
नाही भिती मला तुझी ,
रोज खेळतो तुझ्या संग .
पांढरा ढवळ्या राजा तू ,
अनुकुचीदार लाल शिंगं.
घर जसं चंद्रमौळी झोपडी,
ना खिडकी सदा ऊघड दार.
बाप माझा येईपर्यंत ,
मला तुझाच रे आधार .
जोडी तुमची दोघांची छान,
बांधलाय जाड कासरा .
गळा घुंगुरमाळा शोभे जरी,
दावणीला तुझ्या ना चारा .
आस धरु भविष्याची ,
हिरव स्वप्न होईल साकार.
तुझ्या माझ्या जीवनाला ,
खरा येईल तो आकार .
✍ कवयीत्री ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment