Sunday, 25 June 2017

खाजगी शिकवण्यांचे बाजारीकरण व विद्यार्थी

स्पर्धेसाठी

खाजगी शिकवण्यांचे बाजारीकरण व विद्यार्थी

     गुरु-शिष्याची परंपरा प्राचीन काळापासून आजही अव्याहतपणे चालू आहे. शिष्य गुरुकुलात जात होता व स्वतःची कामे स्वतः करुन ज्ञानग्रहण करत होता यातून शिक्षणाबरोबर स्वावलंबनाचे धडे प्रत्यक्ष ज्ञानातून मिळत असे . ते ज्ञान त्याला आयुष्यातील प्रत्येक प्रसंगी ऊपयोगी पडत असे.
     आजही गुरु-शिष्याची परंपरा पहायला मिळते.पण विद्यार्थ्यापुढे शाळा व गुरुंचे एवढे पर्याय आहेत की ते निवडताना पालक व विद्यार्थी यांच्या नाकी नऊ येत आहे.याचे खरे कारण म्हणजे शाळांचे व खाजगी शिकवण्यांचे वाढते प्रमाण होय.

     शाळेत मिळणारे फुकट ज्ञान व दारात येणारे शिक्षक यामुळे त्यांची कींमत वाटत नाही ,पण खाजगी शिकवण्यांचे भरमसाठ फीचे दर व तिथली विद्यार्थ्यांची गर्दी पाहता एक प्रश्न पडतो की फुकटच्या ज्ञानाची काहीच कींमत नाही का ? याचे ऊत्तर काय ?

   आजच्या  "खा ऊ जा " धोरणामुळे शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे.खाजगी शिकवण्यांचे पेव फुटले आहे.याची खरोखरच गरज आहे का ? याची पालकांनी विचार करण्याची गरज आहे. शाळेत जर विद्यार्थ्यांनी पूर्ण  लक्ष दिले व पालकांनी घरात ऊजळणी करवून घेतली की आपोआपच अभ्यास पक्का होतो व आपल्या मुलांची प्रगतीही कळते.
   खाजगी शिकवणीवाले प्रत्येकाकडून समान फी घेतात व संख्याही कमी असते , वेळ असतो तर सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती व्हायला हवी .हे कधी आपल्या लक्षात येणार ? विद्यार्थ्यांना आयते तयार गाईड , नोट्स दिल्यामुळे त्यांचे सखोल वाचन होत नाही व भावी जीवनात मग ते असफल होतात.निराश होतात . हे सर्व थांबायला हवे

  श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment