काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजीत पितृदिना निमीत्त " बाप " या विषयावर
काव्यस्पर्धेसाठी
माझे बाबा
प्रेमस्वरुप सिंधु ,
आहेत माझे बाबा.
मनावर असतो आमच्या ,
नेहमीच त्यांचा ताबा .
धीरगंभीर संयमी चेहरा,
प्रोत्साहनप्रसंगी होतो हसरा
संदेश जीवनी स्वताः देतसे,
साधी राहणी अंगीकारा .
लेखणीवर आहे ताबा ,
हस्ताक्षर जसे सुंदर मोती.
पाहताच मन मोहून जाते ,
सकलजन निरखून पाहती.
शिक्षणक्षेत्र पवित्र केले ,
विद्यार्थीप्रीय सदा सर्वदा .
निस्वार्थी सेवा विद्यामंदिरात
ज्ञानदानात मग्न सदा .
समाजसेवा पिंड तयांचा,
करुणासागर मायेचा ,सेवेचा
कर्तव्यदक्ष , प्रेरणास्फूर्ती ,
आदर्श व्रतस्थ जीवनाचा .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ.
जि.कोल्हापूर ,416106
No comments:
Post a Comment