* नाव : श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
* पत्ता :कुरुंदवाड, ता.शिरोळ, जिल्हा. कोल्हापूर
416106
* शिक्षण : एम.ए.बीएड.
* जन्मदिनांक : 21/ 12/ 1968
* नोकरी किंवा व्यवसाय :
सहा.शिक्षिका-- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स् , कुरुंदवाड
* आपल्या विषयी थोडक्यात माहिती :
माझे बालपण कुरुंदवाड मध्ये अतिशय आनंदात व्यतीत झाले. माझे आई वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे आमच्या शिक्षणाबरोबरच आमच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आम्ही भावंडे सुसंस्कृत व सुसंस्कारित झालो. राष्ट्र सेवादलाच्या मुशीतून घडलेले आमचे वडील असल्यामुळे नकळतपणे आमच्यावरही तोच पगडा होता.मी लहानपणापासून राष्ट्र सेवादलाच्या शिबिरात जात होते.त्यावेळी मला जेष्ठ समाजवादी विचारवंत मा.श्री.ना.ग.गोरे,मा.श्री.यदुनाथ थत्ते, मा.श्री. एस.एम.जोशी. मा.श्री.निळू फुले,डॉ. श्रीराम लागू,मा.श्री.भाई वैद्य मा.श्री.गजानन केळकर, श्रीमती इंदुमती केळकर,श्री शाम पटवर्धन इ.अनेक मान्यवरांच्या सानिध्यात रहायला मिळाले. थोर स्वातंत्र्य सैनिक साथी सुरेंद्र आलासे यांच्या मार्गदर्शनाने व प्रोत्साहनामुळे मी वाचन, लेखन,भाषण,समाजसेवा इ. मधे सक्रीय सहभाग घेउ लागले.पुढे संपूर्ण इंग्रजी घेऊन महाविद्यालयीन शिक्षण बी.ए.बीएड पूर्ण करुन न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स् , कुरुंदवाड येथे सहा.शिक्षिका म्हणून कार्यरत झाले. हिंदी विषयाची आवड होती म्हणून हिंदी विषय घेऊन परत बी.ए. झाले.इंग्रजी विषयातून एम.ए.ची पदवी घेतली. शाळेत अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहिले व एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून लोकप्रिय झाले. समाजवादी महिला सभा, राष्ट्र सेवादल,व लायनेस क्लब ऑफ कुरुंदवाड , महिला दक्षता समिती सदस्य, कुरुंदवाड पोलीस ठाणे, सकाळ- तनिष्का - ग्रुप लिडर ते समन्वयक अशा माध्यमातून समाजसेवा केली. आनंदवन व हेमलकसा या ठिकाणी जाऊन कपडे दान देऊन भेट देऊन आले.खूप समाधान वाटले व समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला.व एक नवी दिशा मिळाली. समाजप्रबोधन करण्यासाठी मी विविध विषयांवर मार्गदर्शनपर भाषणे देते.विविध विषयांवर मासिके व वृत्तपत्रातून लेखन करते.माझा " भावतरंग " हा कवितासंग्रह व " समतेचे पुजारी एस.एम.जोशी " अशी दोन पुस्तके प्रकाशित केली.अजून काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सांगली आकाशवाणी केंद्रामार्फत विविध विषयांवर माहिती चे प्रसारण झाले आहे. तसेच " साम " टीव्ही वर तनिष्का समन्वयक या नात्याने मुलाखत प्रसारित झाली आहे. विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. तसेच साहित्यिक योगदानासाठी " आम्ही कवयित्री " " राज्यस्तरीय काव्यप्रेमी आदर्श पुरस्कार " प्राप्त झाले आहेत. या सगळ्या आनंदी घटना.सुखाला दु:खाची झालर असते.त्याप्रमाणे ऐन तारुण्यात वयाच्या पस्तीसाव्या वर्षी मिस्टरांचे रस्ते अपघातात निधन झाले. खूप मोठा मानसिक धक्का बसला.समोर दोन लहान चिमुकली मुले पाहून धाय मोकलून रडले. घरच्यांनी समजावून सांगितले. पण सावरायला वर्ष गेले.मनावर दगड ठेवून पुन्हा मुलांच्या साठी ऊभी राहिले. आई व वडील या दोन्ही भूमिका बजावत निर्धाराने दोन्ही मुलांना संस्कारात वाढवले. मुलही समजूतदार निघाली हीच जमेची बाजू आहे.शिक्षणातपण हुशार आहेत. एकटीच्या जीवावर काटकसर करुन त्यांना उच्च शिक्षण दिले . मुलगी एम.ई.ENTC झाली व मुलगा बी.ई.मेकॅनिकल झाला. दोघेही आता बेंगलोर या ठिकाणी चांगल्या कंपनीत नोकरीला आहेत.आता थोडा विसावा मिळाला आहे. मी आता माझ्या जीवनात सुखी व समाधानी आहे.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment